दहशतवाद्यांचे रक्षक असणार्या मुसलमानांचे लांगूलचालन करणारी काँग्रेस क्रांती अपरिहार्य करते !
१९ सप्टेंबर रोजी जामियानगर येथे दहशतवाद्यांबरोबर उडालेल्या चकमकीत पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा हे हुतात्मा झाले. “जामियानगरमधील सदनिकेमध्ये वास्तव्य करणारे दहशतवादी हे भोळेभाबडे होते.
पोलिसांनी त्यांच्याशी खोट्या चकमकी घडवून आणल्या”, असे म्हणत मुसलमानांनी व तथाकथित निधर्मीवाद्यांनी थयथयाट केला. याची दखल घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जागा झाला व त्याने दिल्ली पोलिसांना या प्रकरणात नोटीस बजावली. हा सर्व प्रकार सुरू असतांना सुधारणावादी मुसलमानांना मात्र त्याचे सोयर-सुतक नव्हते. आपल्या मुसलमान जातभाईंच्या कुकृत्याचा निषेध करण्याची त्यांना गरज भासली नाही. जेव्हा मुसलमानांच्या गैरकृत्यांना आळा घालण्याची निर्णायक वेळ येते, तेव्हा सुधारणावादी मुसलमान शेपूट घालून गप्प बसतात, हे अनेक उदाहरणांती सिद्ध झाले आहे. `पायोनियर’ या इंग्रजी नियतकालिकात श्री. स्वपन दासगुप्ता यांचा प्रसिद्ध केलेला तथाकथित सुधारणावादी मुसलमानांचा बुरखा फाडणार्या लेखाचे स्वैर भाषांतर येथे देत आहोत.
भारतातील मुसलमान पुरवतात दहशतवाद्यांना सुरक्षाकवच !
जामियानगर येथे पोलीस व दहशतवादी यांच्यात उडालेल्या चकमकीमुळे भारतातील सामाजिक स्थितीचा उलगडा होतो. दहशतवाद्यांनी लपण्यासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून जामियानगरची निवड करण्यामागचे कारण स्पष्ट आहे. जामियानगर येथे त्यांना द्विस्तरीय कवच मिळाले. एक म्हणजे तो परिसर अती गजबजलेला असल्याने त्यांना सुरक्षा मिळाली. तसेच दुसरे म्हणजे त्या भागात मुसलमानांची वस्ती असल्याने दहशतवाद्यांना धार्मिक सुरक्षितताही मिळाली. पोलिसांनी त्या भागात दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम हाती घेतली, तेव्हा स्थानिक मुसलमानांनी पोलिसांना शिव्या घातल्या व धर्मयुद्धाच्या घोषणा दिल्या. तेथील मुसलमानांची ही कृती अस्वस्थ करणारी आहे. मुसलमानांची दहशतवादाच्या विरोधातील मोहिमांना संघटितपणे विरोध करण्याची ही `हैद्राबादी पद्धत’ आता दिल्लीतही रुजल़्याचे यातून स्पष्ट झाले. मुसलमान समुदायाला मिळणार्या राजकीय वरदहस्ताचा दहशतवादी चांगल्या प्रकारे वापर करून घेत आहेत. १९ सप्टेंबर रोजी पोलिसांच्या चकमकीत ठार झालेला महंमद अतिफ या दहशतवाद्याचा त्याचे मुसलमान मित्र व शेजारी यांनी गुणगौरव केला. आझमगड येथे त्याच्या जन्मगावी संतापलेल्या गावकर्यांनी प्रसारमाध्यमाच्या एका पथकाला ओलीस ठेवले.मुसलमानांच्या संघटनाही दहशतवाद्यांची पाठराखण करतात, हे लक्षात घ्या ! भारतात अनेक ठिकाणी साखळी बाँबस्फोट घडवून आणणारा तौकीर याला पकडण्यासाठी भारतातील सुरक्षायंत्रणा जंगजंग पछाडत आहे. “माझा मुलगा निर्दोष आहे. तौकिर हा अल्-कैदाचा दहशतवादी ओसामा बिन लादेन असल्यासारखा भासवण्याचा प्रयत्न भारतातील प्रसारमाध्यमे करत आहेत”, अशी टीका तौकिर याच्या आईने केली होती. यात लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे ही मुलाखत `मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ या संघटनेने आयोजित केली होती. ११ जुलै २००६ रोजी मुंबईमध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांमध्ये २०९ नागरिक ठार झाले होते. हे साखळी बाँबस्फोट घडवून आणण्यात तौकिर याचा हात होता. या बाँबस्फोटांची चौकशी करणार्या पोलिसांच्या विरोधातही मुसलमान संघटनांनी अशीच आरडाओरड केली होती. त्यामुळेच तौकीर त्यावेळी पसार होण्यास यशस्वी झाला. `सिमी’ ही दहशतवादी संघटना देशभर क्रियाशील असल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत व त्यांना मुसलमानांचा पाठिंबा मिळत आहे.
सुधारणावादी मुसलमानांनी त्यांच्या बांधवांचे प्रबोधन करावे
मुसलमानांचा दहशतवाद्यांना पाठिंबा असतोच, याची प्रचीती पुन्हा एकदा १९ सप्टेंबर रोजी जामियानगरमध्ये पोलीस व दहशतवादी यांच्या चकमकीच्या वेळी आली. `दहशतवादाला पोसण्यास मुसलमानांचा हात असतो, हे मुसलमान सुधारणावादी व मुसलमान नेते नाकारू शकत नाही. समाजवादी पक्षातील काही राजकीय नेत्यांची मुले बाँब पेरण्यात सहभागी झाल्याचे उघडकीस आले आहे. यावरून मुसलमान समाजातील वयस्क मंडळींचे त्यांच्या मुलांवरील नियंत्रण सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. मदरशामध्ये शिक्षक म्हणून काम करणारा अबू बशीर व मौलवी म्हणून काम करणारो वालीउल्ला काझमी यांच्यासारखे मुसलमान इंडीयन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले आहे. `इस्लाम हा शांतीचा संदेश देणारा धर्म आहे’, अशी घोषणा मुसलमान नेते व सुधारणावादी मुसलमान करतात. असे असेल, तर सुधारणावादी मुसलमानांनी त्यांचे जातभाई करत असलेल्या कुकृत्यांचा जाहीर निषेध करावा व त्यांचे प्रबोधनही करावे. अन्यथा या मुसलमानांचा सुधारणावादीपणा हाही एक `फार्स’ आहे, असे म्हणणे क्रमप्राप्त ठरेल.
|