`सनातन प्रभात’सारख्या संघटनांवर बंदी घालण्याचे गृहमंत्र्यांचे सुतोवाच !

`सनातन प्रभात’च्या बंदीचा कुटील डाव म्हणजे राष्ट्र व धर्म प्रेमी वृत्तपत्राचा राजकीय छळ !

`सह्याद्री’ वाहिनीने `साडेनऊच्या बातम्यां’मध्ये सांगितलेली माहिती !

 

मुंबई, ४ ऑक्टोबर (वार्ता.) – `सनातन प्रभात’सारख्या संघटनांवर बंदी घालण्याबाबत सरकार गंभीरपणे विचार करत आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री श्री. रा.रा. पाटील यांनी केल्याची माहिती नुकतीच दूरदर्शनच्या `सह्याद्री’ वाहिनीवरून रात्री `साडेनऊच्या बातम्यां’मध्ये वृत्तनिवेदिकेने सांगितली. (`सनातन प्रभात’ ही संघटना नाही, तर ते नियतकालिक आहे ! – संपादक) काल सकाळी `साडेआठच्या बातम्यां’तही ही माहिती वृत्तनिवेदिकेने पुन्हा दिली. कवठेमहांकाळ येथील महाविद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. पाटील यांनी वरील प्रतिपादन केले, असे तिने सांगितले. दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या संदर्भात ते बोलत होते, असे ती म्हणाली. (दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाईच्या संदर्भात बोलतांना गृहमंत्र्यांनी `सनातन प्रभात’वर बंदी घालणार असल्याचे सांगणे, हे आश्चर्यकारक आहे. `सनातन प्रभात’ नियतकालिक हे केवळ राष्ट्र व धर्म यांच्या स्थितीबाबत माहिती देऊन समाजप्रबोधन करते. त्याचे गृहमंत्र्यांना एवढे वावडे असण्याचे काय कारण ? – संपादक)

 

  निगडीत वृत्त : सनातनला विरोध

Leave a Reply