दंगलीत ६० जखमी
ठाणे, ३० सप्टेंबर (वार्ता.) – येथील राबोडी परिसरात मशिदीजवळ नवरात्रोत्सवाची कमान लावण्यावर मुसलमानांच्या एका गटाने आक्षेप घेतला. त्यामुळे हिंदू व मुसलमान या दोन समुदायांत वादावादी झाली. नंतर मुसलमानांच्या गटाने गाड्या जाळण्यास व सोडावॉटरच्या बाटल्या फेकण्यास सुरुवात केली. (हिंदूंच्या प्रत्येक धार्मिक उत्सवाच्या वेळी काही ना काही कुरापती काढून दंगली घडवणार्या मुसलमानांना मुसलमानप्रेमी काँग्रेस सरकार कधीच रोखणार नाही. त्यामुळे धार्मिक उत्सव निर्विघ्नपणे साजरे करण्यासाठी हिंदूंनीच आता पुढाकार घ्यायला हवा ! – संपादक) नंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर सोडावॉटरच्या बाटल्या, तसेच दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यात १ जण ठार व ६० जण जखमी झाले.
राबोडी परिसरात असलेल्या उर्दू शाळेसमोर नवरात्रोत्सव साजरा केला जातो. मात्र या ठिकाणी कमान लावण्यास मुसलमानांच्या एका गटाने विरोध केला. (उर्दू शाळेसमोर कमान लावायची नाही, असे कुठल्या कायद्यात म्हटले आहे ? शाळा उर्दू आहे, म्हणजे शाळेच्या आजूबाजूची जमीन मुसलमानांच्या मालकीची झाली कि काय ? वर्षानुवर्षे काँग्रेसने केलेल्या अपरिमित लाडांमुळे मुसलमान शेफारले आहेत, हे या घटनेतून दिसून येते. त्यांना लगाम घालण्यासाठी प्रथम पुढील निवडणुकीत काँग्रेसवाल्यांची राजकीय कारकीर्द संपवायला हवी ! – संपादक) या संदर्भातील धुसफूस गेले दोन-तीन दिवस सुरू होती. ही कमान इतरत्र हालवण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली होती; मात्र तो प्रयत्न अपयशी ठरला. (प्रत्येक वेळी मुजोर मुसलमानांसमोर हिंदूंनी पड खावी, यासाठी मध्यस्थी करणारे हिंदु पोलीस ! पोलिसांना मुसलमानांची एवढी भीती वाटत असेल, तर त्यांनी नोकरीचा राजीनामा द्यावा व पोलीस ठाणे निर्भय हिंदूंच्या हाती सोपवावे ! – संपादक) अखेर काल रात्री उशिरा हा वाद उफाळून आला. मुसलमानांचा खूप मोठा जमाव आल्याने पोलिसांची कुमक कमी पडली. (हिंदूंवर हल्ला करण्यासाठी मुसलमान खूप मोठ्या संख्येने जमतात. हे मुसलमान या देशात हिंदूंशी एकोप्याने कधीतरी रहातील का ? – संपादक) मुसलमानांचा हल्ला सुरू झाल्यावर पोलिसांना आदेश मिळेपर्यंत वेळ लागला. (काँग्रेसच्या राज्यात मुसलमानांना रोखण्याचा आदेश मिळायला वेळ लागणारच ! मुसलमानांवर तात्काळ कठोर कारवाई करायला मुसलमान म्हणजे काय हिंदू आहेत ? – संपादक) मुसलमानांच्या हल्ल्याला हिंदूंनीही प्रतिकार सुरू केला. या वेळी दोन्ही गटांनी केलेल्या दगडफेकीत ८ वरिष्ठ अधिकार्यांसह ३९ पोलीस जखमी झाले. (पोलिसांना दंगेखोरांकडून मार खाण्याएवढे दुबळे बनवून ठेवणारे राज्यकर्ते राज्य करण्याच्या लायकीचे आहेत का ? – संपादक) नंतर जमावाला पांगवण्यासाठी केलेल्या गोळीबारात १ दंगेखोर ठार झाला. जमावाकडून रात्रभर जाळपोळ सुरूच होती. सकाळी पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली; मात्र राबोडीत तणाव कायम आहे.
रात्री उशिराने उफाळून आलेल्या या दंगलीत दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. काही घरांना आगी लावण्यात आल्या. सोडा वॉटरच्या बाटल्या फेकण्यात आल्या. ही दंगल सुरू झाल्यावर इतर मुसलमानही रस्त्यावर आले. (दंगल सुरू झाल्यावर लढण्यासाठी संघटित होणारे मुसलमान ! – संपादक) मुसलमानांजवळ तलावरी व चॉपर होते. (कायम शस्त्रसज्ज असणारे मुसलमान ! – संपादक) जमावाने घराबाहेर उभ्या असणार्या गाड्यांना आगी लावण्यास सुरुवात केली. पोलिसांनी व नागरिकांनी हस्तक्षेप करून तात्काळ घरातील लोकांना बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दोन्ही गटांतील जमावाने लहान-मोठ्या सुमारे ३० गाड्या जाळल्या. सकाळी या ठिकाणी गाड्यांचे सांगाडे पडलेले होते.
पोलीस ठाणे व पोलीस यांवर मोठा हल्ला
जमाव बिथरला असतांना पोलीस परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते; मात्र जमावातील मुसलमानांनी पोलिसांवरच दगडफेक करण्यास सुरुवात केली. एका गटाने राबोडी पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला. पोलिसांच्या गाड्या फोडण्यात आल्या. पोलिसांवर दगडफेक केली. हल्लेखोर हातात शस्त्र घेऊन गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणपतराव माडगुळकर यांच्यामागे लागले; मात्र सुदैवाने पुढून पोलिसांची कुमक आल्याने श्री. माडगुळकर बचावले. तर साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. पवार यांना बेदम मारहाण करत हल्लेखोर घेऊन जाऊ लागले. श्री. पवार जोरजोरात ओरडत होते. हे बघून जखमी अवस्थेत असलेले पोलीस उपायुक्त श्री. बाळासाहेब पाटील थेट जमावात घुसले आणि त्यांनी कशीबशी श्री. पवार यांची सुटका केली. त्यामुळे भिवंडीतील पोलिसी हत्याकांडासारखी दुर्घटना होता होता टळली. यात गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्री. सुधीर दाभाडे यांच्यासह आठ वरिष्ठ अधिकारी आणि ३१ पोलीस, दोन होमगार्ड व शीघ्र कृतीदल यांचा एक जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
परिस्थिती हाताबाहार जात असल्याचे पाहून पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. यात मोहसीन खान (२२) हा युवक ठार झाला.
दंगलीत पत्रकारही जखमी !
दंगलीत जखमी झालेले युवा छायाचित्रकार श्री. गौरव कदम यांच्यावर शासकीय रुग्णालयात, तर `ठाणे वार्ता’ वृत्तवाहिनीचे श्री. मनोज सिंग यांच्यावर येथील ज्युपीटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ६० जखमींवर ठाण्याच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
गृहमंत्र्यांची घिसाडघाई !
राबोडी परिसर धुमसत असतांना ठाण्यातील राजकीय नेत्यांनी त्यांच्या परीने जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. (ज्यांनी कुरापत काढली, त्या मुसलमानांना कायमची अद्दल घडावी, यासाठी राजकीय नेत्यांनी काय केले, हे त्यांनी हिंदूंना सांगावे. जमावाला शांत करण्याचे प्रयत्न करण्यासारख्या वरवरच्या कृती राजकीय नेत्यांकडून हिंदूंना अपेक्षित नाहीत ! – संपादक) मध्यरात्री राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. रा.रा. पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी तात्काळ पोलीस उपायुक्त श्री. साहेबराव पाटील यांचे निलंबन केले; परंतु सकाळी वरिष्ठ अधिकार्यांनी सद्यस्थितीची कल्पना देताच उपायुक्त श्री. पाटील यांचे निलंबन मागे घेण्यात आले. (परिस्थितीचा योग्य विचार न करता घाईघाईत निर्णय घेणारे गृहमंत्री राज्याचा कारभार कसा हाकत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी ! – संपादक)
पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. (काही दिवस हे काम चालू राहील. त्यानंतर यथावकाश तपास पूर्ण होईल. काही वर्षे न्यायालयीन खटले चालतील. त्यानंतर कधीतरी दोषींना शिक्षा होईल व पुढे कधीतरी त्या शिक्षेची अंमलबजावणी होईल. देशात सर्वच गुन्ह्यांच्या बाबतीत असाच प्रकार सध्या सुरू आहे. अशाने येथे कधी शांती नांदण्याची शक्यता आहे का ? – संपादक) सध्या या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असून शीघ्र कृती दलाच्या तुकड्या ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात असली, तरी तणाव कायम असल्याचे दिसत आहे.