|
|
गांधीनगर, २५ सप्टेंबर (प्रे.ट्र./वृत्तसंस्था) – साबरमती एक्स्प्रेसचा डबा जाळण्याची घटना हा पूर्वनियोजित कट होता व तो मौलवी उमरजी याने रचला होता, असे नानावटी आयोगाने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
(मुसलमान हे हिंदूंच्या जिवावर उठले आहेत, हे या अहवालाने पुन्हा एकदा स्पष्ट झाले. – संपादक) गोध्रा हत्याकांडाचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जी.टी. नानावटी यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला होता. आज आयोगाने त्याचा पहिला अहवाल विधानसभेमध्ये सादर केला. हा अहवाल सादर होताच काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. (हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसकडून यापेक्षा आणखी कसली अपेक्षा करणार ? – संपादक) गोध्रा हत्याकांड घडवून गुजरातमध्ये दहशत पसरवणे व प्रशासन खिळखिळे करण्याचा मौलवी व त्याच्या सहकार्यांचा डाव होता. गोध्रा हत्याकांड व त्यानंतर उसळलेल्या दंगली यांमधील पीडितांना संरक्षण देण्यास अथवा त्यांचे पुनर्वसन करण्यास मोदी सरकार कुठेही कमी पडले नाही, असेही आयोगाने म्हटले आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सूचनांप्रमाणेच दंगलग्रस्तांचे पुनर्वसन झाले, असेही आयोगाने म्हटले आहे. साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्यासाठी १४० लीटर पेट्रोल वापरण्यात आले, असे आयोगाने स्पष्ट केले. साबरमती एक्स्प्रेसचे सर्व डबे पेटवण्याचा मुसलमानांचा कट होता; मात्र ही योजना यशस्वी झाली नाही. गोध्रा हत्याकांडामध्ये ५९ जण ठार झाले होते. रेल्वेमंत्री श्री. लालूप्रसाद यादव यांनी गोध्रा हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यु.सी. बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. “गोध्रा हत्याकांड हा घातपात नसून अपघात होता”, असा अहवाल या समितीने सादर केला होता. नानावटी आयोगाने अहवाल सादर केल्यानंतर न्या. बॅनर्जी यांनी गोध्रा हत्याकांड हा घातपात नसून अपघात होता, याचा पुनरुच्चार केला. (निवळ मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी लालूप्रसाद यादव यांनी बॅनर्जी यांना हाताशी धरून त्यांना हवा तसा अहवाल तयार करून घेतला, हे अनेक मुद्यांवरून यापूर्वी स्पष्ट झाले आहे. – संपादक)
नानावटी आयोगाने दिलेले दाखले
१. साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार शौकत लालू व महंमद लतिका यांनी एस् ६ व एस् ७ या डब्यांचे दरवाजे उघडले. एस्-६ डब्यामध्ये हसन लालू याने आग लावली. मौलवी उमरजी याने साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्याचा कट रचला व त्यामध्ये रज्जाक कुरकूर, सलीम पानवाला, शौकत अली, इम्रान शेरी, रफीक बटूक व सिराज बाला हे सहभागी झाले होते.
२. साबरमती एक्स्प्रेसचे डबे जाळल्यानंतर मुसलमानांनी १० ते २० मिनिटे दगडफेक केली व डब्यातील प्रवाशांना बाहेर येण्यापासून मज्जाव केला, अशी साक्ष गाडीतील प्रवाशांनी दिली.
३. रज्जाक कुरकूर व सलीम पानवाला यांनी गाडीला आग लावण्यासाठी १४० लीटर पेट्रोल खरेदी केले.
४. गोध्रा येथील अमन गेस्ट हाऊसमध्ये साबरमती एक्स्प्रेस जाळण्याचा कट रचण्यात आला.
हिंदुद्वेष्ट्या काँग्रेससह माकप व तिस्ता सेटलवाड यांना पोटशूळ !
नवी दिल्ली – नानावटी आयोगाने सादर केलेल्या अहवालावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. “नानावटी आयोग ज्या परिस्थितीत स्थापन करण्यात आला, अहवाल सादर करण्यासाठी तारखांवर तारखा वाढवण्यात आल्या, अनेक साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या, या सर्व गोष्टींमुळे अहवालाच्या निष्कर्षांबद्दल मनात संशय निर्माण होतो”, असे काँग्रेसचे प्रवक्ते श्री. अभिषेक सिंघवी यांनी सांगितले. हा अहवाल म्हणजे फार्स आहे, असे वक्तव्य तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या व मुसलमानांच्या पाठीराख्या श्रीमती तिस्ता सेटलवाड यांनी केले. “पुढील निवडणुकांवर लक्ष ठेवून मते मिळवण्यासाठी भाजपने हा कट रचला आहे”, असे त्या म्हणाल्या. “नानावटी आयोगाने सादर केलेला अहवाल हा पक्षपाती आहे. या आयोगाच्या निष्कर्षांना विरोध करणार”, असा कांगावा माकपचे श्री. गुरूदास दासगुप्ता यांनी केला.