आतंकवाद आणि मुलायमसिंग

मुलायमसिंग आणि लालूप्रसाद ही जोडी जन्माने हिंदु आहे. जयप्रकाश नारायण यांच्यापासून प्रेरणा घेऊन राजकारणात प्रवेश केल्याचे दोघे कधीतरी सांगत असतात; परंतु एखाद्या `मॉल’मधून चक्कर मारून आल्यासारखे हे दोघे जयप्रकाशजींच्या सहवासात वावरल्यासारखे वाटते. दोघांनीही त्यांच्यासाठीच ही सृष्टीची रचना झाली आहे, असा दर्पयुक्‍त समज करून घेतला आहे. त्यामुळे त्यांना भ्रष्टाचार वाटत नाही. त्यांनी मोडावेत म्हणून या देशात कायदे बनवले जातात, अशी त्यांची प्रामाणिक धारणा आहे.

 

गुणी मुलाचा सावत्र बापाकडून छळ होतो, तसा पाकिस्तान आणि या देशातले मुसलमान यांच्यावर हिंदूंकडून अन्याय होतो, असे फार पूर्वी जयप्रकाशजींना वाटत असे; पण आणीबाणीत रा.स्व. संघाच्या सहवासात ते आले आणि ज्या शिस्तीने, निस्पृहपणे, मोठ्या संख्येने देशव्यापी लढा संघाने दिला, तो पाहून त्यांचे मतपरिवर्तन झाले. `संघ फॅसिस्ट असेल, तर मीही फॅसिस्ट आहे’ इतके ते समरस झाले. तेवढे मुलायम आणि लालूजींनी होण्याची आवश्यकता नाही; पण त्यांनी हिंदुविरोधी आणि पाकिस्तानवादी होण्याचीही आवश्यकता नाही. या दोघांकडून आतंकवादाला आळा घालण्याच्या दृष्टीने ठोस कृती होत नाही, असा समज आहे. तो समज खरा असावा, असे उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी अलीकडे जे वक्‍तव्य केले आहे, त्यावरून वाटते. मायावतींच्या माहितीनुसार देशात सर्वाधिक प्रमाणात आतंकवाद कोठे बोकाळला असेल, तर तो उत्तरप्रदेशात आहे आणि त्याला मुलायमसिंग सत्तेवर होते तो काळ कारणीभूत आहे. उत्तरप्रदेशात आतंकवादी प्रवृत्तींनी स्वत:चे बस्तान बसवायला सुरुवात केली तेव्हा मुख्यमंत्री मुलायमसिंग यांनी हस्तेपरहस्ते त्यांना सहकार्य केले, असा आरोप मायावतींनी केला आहे. उत्तरप्रदेशच्या एकूण ३४ जिल्ह्यांत आतंकवाद्यांनी खोलवर जाळे विणले आहे. जर मायावतींचे आरोप तथ्यपूर्ण असतील, तर मुलायमसिंग यांची जागा कारागृहात आहे, हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे. केंद्र सरकार या आरोपांची चौकशी करणार नाही आणि मुलायमसिंग कारागृहात बंद होणार नाहीत; कारण मुसलमानांविषयी सरकारचे धोरण अत्यंत उदार असून जोपर्यंत मुसलमान आतंकवाद करत नाहीत, तोपर्यंत सरकार दुर्लक्ष करील. हिंदू आतंकवादी होतील तेव्हा सरकार कडक उपाय योजील; पण हिंदूंना आतंकवादी बनवण्याची आवश्यकता नाही. त्यांची संख्या हेच त्यांचे मोठे शस्त्र होऊ शकते. हे शस्त्र वापरून पाकिस्तानी प्रवृत्ती आणि काँग्रेस संस्कृती यांचा सार्वत्रिक निवडणुकीत हिंदूंना पराभव करता येईल !
- सुघोष

  निगडीत वृत्त : शरसंधान