भारतियांसमोर रासायनिक व जैविक दहशतवादाचे जीवघेणे आव्हान !

आय.एस्.आय. या पाकच्या गुप्‍तचर संघटनेचा पाठिंबा असणार्‍या दहशतवादी संघटनांनी भारतात देशविघातक कारवाया घडवून आणण्यासाठी रासायनिक, जैविक व किरणोत्सर्जक अण्वस्त्रे वापरण्याची तयारी केली आहे, असा अहवाल केंद्रातील गृहखात्याला प्राप्‍त झाला आहे. याबाबत सर्वसामान्य नागरिकांत मोठ्या प्रमाणात जी जागृती राज्यकर्ते व शासन यांनी करायला हवी होती, ती अद्याप केलेली नाही.

किंबहुना जैविक दहशतवाद म्हणजे काय, येथूनच सर्वसामान्य नागरिकाच्या प्रश्‍नांना सुरुवात होते. त्यामुळे त्यावर आवश्यक ठरणारे उपाय करणे, ही फारच दूरची गोष्ट आहे. अशा प्रकारच्या दहशतवादाशी सामना करण्यासाठी इतर कोणत्याही नव्हे, तर केवळ आध्यात्मिक शक्‍तीची गरज आहे. त्याप्रमाणे साधना करून प्र्रत्येक राष्ट्रनिष्ठ भारतियाला या दहशतवादाशी लढण्याचे सामर्थ्य मिळो, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना !


जैविक अस्त्रे म्हणजे काय ?
ज्यांपासून मानवाला हानीकारक असे अनेक सूक्ष्म जीव निर्माण होऊ शकतील, अशा सूक्ष्म जिवांचा किंवा ते फैलावणार्‍या विषारी पदार्थांचा मानवी संहारासाठी ज्या अस्त्रांमध्ये वापर केला जातो, त्याला `जैविक अस्त्रे’ असे म्हणतात. उदा. अँथ्रेक्स, देवी, इन्फ्लुएंझा यांच्या विषाणूंचा फैलाव होऊ देणे. किरणोत्सर्जक अस्त्रांमधून (अणूबाँब) प्रसृत केलेले विषारी किरण मानवी शरिरातील पेशींचा विनाश करून त्यांना जीवन जगणे कठीण करतात.

आण्विक व जैविक अस्त्रांची महाभयानक दाहकता
जपानच्या हिरोशिमा येथे ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने केलेल्या अणूबाँबच्या हल्ल्यात १ लाख ७५ हजार नागरिक मृत्यूमुखी पडले. जे जिवंत राहिले, त्यांना या बाँबच्या किरणोत्सर्गामुळे अनेक शारीरिक व्याधींना तोंड द्यावे लागले. किरणोत्सर्गामुळे शरिरावरील केस जाणे, हागवण, दमछाक होणे, रक्‍तस्राव होणे यांसारख्या आजारांचे रूपांतर रक्‍ताचा किंवा कोणत्याही अवयवाचा कर्करोग होऊन अनेकजण अल्पायुषी ठरले. जपानसारख्या प्रगतशील देशाला यातून सावरण्यासाठी वीस वर्षे खर्ची घालावी लागली. अशीच काही अस्त्रे दहशतवाद्यांकडे असण्याची शक्यता गुप्‍तचर यंत्रणांनी वर्तवली आहे.
अणूबाँब, हायड्रोजन बाँब यांसारखी अस्त्रे जगाचा विनाश घडवून आणण्याइतकी घातक आहेत; मात्र जैविक अस्त्रे त्याहूनही महाभयानक आहेत, कारण बर्‍याचशा सूक्ष्म जिवाणूंचा `परिपाक काल’ हा काही तास, काही दिवस यांपासून काही वर्षांपर्यंत असू शकतो. या अस्त्रांचा वापर झाला आहे, हे कळण्यापूर्वीच अनेकांचा मृत्यू होऊ शकतो.
जैविक अस्त्रांचा इतिहासातील वापर ग्रीक पुराणात सांगितल्यानुसार हर्क्युलसने हायड्राच्या विषारी रक्‍ताचा वापर आपल्या बाणांच्या टोकांना लावण्यासाठी केला होता.
िख्र्तासब्दपूर्व १९० ते १८४ या वर्षांत युमेनेस या परगामनच्या राजाविरुद्ध हनिबलने विषारी सापांनी भरलेले भांडे युमेनेसच्या जहाजांवर टाकले होते.
िख्र्तासब्द १९८-१९९ मध्ये हॅट्राच्या नागरिकांनी रोमन आक्रमणापासून शहराचे रक्षण होण्यासाठी मधमाशा, विंचू व इतर विषारी जंतू, प्राणी आदी रोमन सैन्यावर भिरकावले होते.
१७६७ मध्ये फ्रेंच युद्धात ब्रिटीश जनरल सर जेफरी अँमहर्स्टने फ्रेंच लोकांशी सख्य ठेवणार्‍या भारतियांना देवीचे विषाणू लागलेली पांघरुणे दिली.
पहिल्या महायुद्धात जर्मन सैन्याने इटलीत कॉलरा, पीट्सबर्ग येथे प्लेग तर ब्रिटन येथे जैविक बाँबचा उपयोग केल्याचा आरोप आजही केला जातो.
१९३१, १९३२, १९४०, १९४१ या साली जपानने विविध युद्धांत जैविक अस्त्रांचा वापर केला. १९४५ मध्ये दुसर्‍या महायुद्धाच्या शेवटी युनिट ७३१ वर या अस्त्रांचा वापर केला. यात अमेरिका, कोरिया, ब्रिटन व रशिया यांचे ३ हजार सैनिक मारले गेले.
१९४३ मध्ये अमेरिकेने या अस्त्रांना निकामी करण्यासाठीचा `कॅम्प डेट्रिक’ हा संशोधन प्रकल्प सुरू केला.
१९६२ मध्ये उटाह येथील डग्लस येथे जैविक अस्त्रांवरील संरक्षण यंत्रणा प्रथम कार्यान्वित करण्यात आली.
जून १९९३ मध्ये टोकिओच्या भुयारी रेल्वेत बोटुलियम विषाच्या तीन छोट्या बॅग (ब्रीफकेस) ठेवण्यात आल्या होत्या.
अमेरिकेतील सप्टेंबर २००१ मधील दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर जैविक अस्त्रांचे जिवाणू असणारी पाकिटे यु.एस्. मेलद्वारे पत्रकारांना व अधिसभेच्या दोन सदस्यांना पाठवण्यात आली होती. त्यामुळे २२ जणांना जैविक `अँथ्रेक्स’ची लागण झाली. त्यातील ५ जण मृत्यूमुखी पडले.

जैविक अस्त्रांचा हिंदु धर्मग्रंथांतील संदर्भ
रावणपुत्र इंद्रजित याने लक्ष्मणावर ज्या नागास्त्रांचा वापर केला, त्यावर संजीवनीचा उपाय करण्यात आला.
अर्जुनाला मारण्यासाठी कर्णाने ठेवलेले ब्रह्मास्त्र हे घटोत्कचाला मारण्यासाठी वापरण्यात आले.
कालिया नागाने यमुनेचा डोह विषारी केला होता.
पूतना राक्षसिणीने तिच्या दुधामधून बाळ श्रीकृष्णाला विष पाजण्याचा प्रयत्‍न केला.
रामायण व महाभारत यांतील युद्धांमध्ये विविध प्रकारची विषारी अस्त्रे वापरली गेली होती.

दहशतवादाची झळ आपल्यातील प्रत्येकापर्यंत
नुकतेच अहमदाबाद, बेंगळुरू, जयपूर येथे जे बाँबस्फोट दहशतवाद्यांनी घडवले, ते कोण्या मोठ्या नेत्याला मारण्यासाठी न घडवता, शहरातील सर्वसामान्यांनाच त्यात लक्ष्य ठरवले होते. जैविक अस्त्रांचा वापर हादेखील सर्वसामान्यांना वेठीस धरण्यास केला जातो, हा आजवरचा इतिहास आहे. तशा प्रकारची अस्त्रे दहशतवाद्यांकडे आहेत. हे दहशतवादी कोल्हापूरसारख्या शहरांतही सापडत आहेत. त्यामुळे या दहशतवादाची झळ सर्वसामान्य नागरिकांना म्हणजे आपल्यातील प्रत्येकापर्यंत पोहोचू शकते, हे निश्चित आहे.

जैविक शास्त्राशी संबंधित तज्ञांनी याबाबत सुचवलेले उपाय
समाजातील साथीच्या रोगांचा सातत्यपूर्ण अभ्यास, विशिष्ट बदलाची तात्काळ नोंद व धडाडीने शासनाकडून कृती होणे
संभाव्य रोगांच्या साथींना आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रकारच्या वैद्यकीय यंत्रणा, प्रयोगशाळा, औषध साठे सुसज्ज ठेवणे
संभाव्य धोक्यांवर मात करू शकणार्‍या औषधांची निर्मिती सातत्याने करणे
जैविक अस्त्रांबाबत गांभिर्याने विचार करून त्याबाबत नागरिकांत जागृती करणे. त्यासाठी नागरिकांना सतर्क करणे आणि त्याच्याशी लढण्यासाठीचे नियोजनबद्ध प्रशिक्षण नागरिकांना देणे

राज्यकर्त्यांकडून फारशी आशा ठेवणे मूर्खपणाचे
हे सर्व उपाय करण्यासाठी प्रत्यक्षात शासनानेच पुढाकार घ्यायला हवा; मात्र तो घेतलेला नाही. याच शासनकर्त्यांनी आजवर केलेल्या संरक्षणव्यवस्थेतील गलथान कारभारामुळेच दहशतवाद आज गावोगावी रुजला आहे. `अद्ययावत साधनांनिशी लढणार्‍या दहशतवाद्यांशी लढण्याकरिता १८५७ च्या बंडातील बंदुका पोलिसांनी फेकून द्याव्यात’, असे आवाहन महिनाभरापूर्वीच सहकारमंत्री श्री. पतंगराव कदम यांनी सांगली येथे केले. या आवाहनावरूनच प्रत्यक्ष पोलीस किती मदत करू शकतात, हे स्पष्ट होते. परिणामी राज्यकर्त्यांकडून फारशी आशा ठेवणे, हे सर्वसामान्यांच्या दृष्टीने मूर्खपणाचे ठरणार आहे.

देवतेची मदत मिळवण्याइतपत स्वावलंबी होणे आवश्यक !
आता पुन्हा जबाबदारी येते ती सर्वसामान्य नागरिकाकडेच म्हणजे आपल्या सर्वांकडेच ! वरील धर्मग्रंथांतील उदाहरणांकडे पहाता, लक्ष्मण किंवा अर्जुन हे महापुरुष असल्याने या हल्ल्यांतून बचावले; त्यांच्याप्रमाणे सर्वसामान्य व्यक्‍तीही वाचू शकेल, असे नाही. अशा हल्ल्यांनंतर वैद्यकीय उपचार केले, तरी त्या यातना काही वर्षांपर्यंत सोसाव्या लागू शकतात. यातून उपाय एकच आहे, तो म्हणजे आपण स्वत: साधना करून देवतेची मदत मिळवण्याइतपत स्वावलंबी होणे. अशा कसोटीच्या वेळी देवाची मदत मिळवायची, तर आपली साधना योग्य मार्गाने वाढवत नेली पाहिजे.
साधारणपणे २५ वर्षांपूर्वी दिल्ली येथे शीख दहशतवाद्यांनी सैनिकांच्या वस्तीला पाणीपुरवठा करणार्‍या पाण्याच्या टाकीतच विष टाकले. ते पाणी पिऊन प्राणी दगावल्यानंतर हे लक्षात आले. कसोटीच्या प्रसंगी खरी साधना असेल, तर देव वाचवतो, याच्या अनुभूती विविध आध्यात्मिक संस्थांतील साधना करणारे साधक पदोपदी घेताहेत. त्यामुळे प्रत्येकाने अशा दहशतवादाशी लढण्याकरिता शारीरिक व मानसिक सामर्थ्याबरोबर आध्यात्मिक सामर्थ्य वाढवण्याला पर्याय नाही ! हे आध्यात्मिक सामर्थ्य वाढवण्याची सद्बुद्धी ईश्‍वर प्रत्येक राष्ट्रनिष्ठ भारतियाला देवो, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना !
।। श्रीगुरु चरणार्पणमस्तु ।।


Leave a Reply