कृत्रिम तलावातील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या मातीपासून विटा तयार करणे सक्‍तीचे – मुंबईच्या महापौर डॉ. (सौ.) शुभा राऊळ

गणेशमूर्तीपासून विटा करण्याची सक्‍ती करणार्‍या महापौरांबाबत शिवसेनेला काय म्हणायचे आहे ?

 

गणेशाची विटंबना केली, तरी हिंदुत्ववादी पक्षांना काही वाटणार नाही; कारण श्री गणेश मतदार नाही !

मुंबई, १२ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदूंचे सण व उत्सव या प्रसंगी प्रदूषणाची बोंब उठवणार्‍या पर्यावरणवाद्यांच्या नादाला लागून महापालिका प्रशासनाने कृत्रिम तलावात विसर्जित शाडू मातीचा वापर उद्यानातील झाडांसाठी करण्याचा धर्मद्रोही निर्णय घेऊन हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा चंग बांधला आहे. या निर्णयानंतर आता मुंबईच्या महापौर डॉ. (सौ.) शुभा राऊळ यांनी कृत्रिम तलावातील विसर्जित प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या अवशेषापासून विटा बनवणे सक्‍तीचे असल्याचे जाहीर केले आहे.

(कृत्रिम तलावाबाबतच्या परिपत्रकात (एम्डीएफ्/९६२९/साधा, दिनांक २५.७.२००८) नियम ७ मध्ये म्हटले आहे, `गणेशमूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर आणि कृत्रिम तलावातील पाणी आजूबाजूच्या जमिनीत पाझरून गेल्यानंतर विरघळलेल्या गणेशमूर्ती आणि त्यांचे अवशेष काळजी घेऊन आणि पावित्र्य भंग होणार नाही, अशा प्रकारे ज्या ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन होते, त्या ठिकाणी समुद्रात/तलावांत विसर्जित करण्यात यावेत.’ असे असतांना स्वत:च्याच नियमांचे उल्लंघन करणारी व पर्यावरणाच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी धर्मद्रोही महापालिका ! – संपादक) महापौरांनी याबाबतची माहिती काल काही पत्रकारांना दिली.
यंदा मुंबई महापालिकेने २५ ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले आहेत. या तलावांतील गणेशमूर्तींचे अवशेष पावित्र्य राखून व विधीवत तलावाबाहेर काढून समुद्रात खोल अंतरावरील पाण्यात विसर्जित केले जातील, असे पालिका अतिरिक्‍त आयुक्‍त श्री. माधव सांगळे यांनी पत्रकारांशी बोलतांना यापूर्वी सांगितले होते. पत्रकारांनी महापौरांना कृत्रिम तलावांतील गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याबाबतच्या नियमावलीतील उल्लेखाबाबत प्रश्‍न विचारला असता महापौर डॉ. (सौ.) शुभा राऊळ यांनी सांगितले, “पालिका कृत्रिम तलावांतील विसर्जित मूर्तींचे अवशेष पुन्हा समुद्रात विसर्जित करणार नाही. मूर्तींच्या अवशेषांपासून स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत विटा तयार करण्यात येतील; कारण यंदा कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लोकांचे म्हणणे आहे, या अवशेषांचा पुनर्वापर व्हावा.” (जनतेचे नाव पुढे करून हिंदु धर्मियांच्या भावना दुखावणारा धर्मद्रोही निर्णय घेणारी महापालिका ! – संपादक) याही पुढे जाऊन महापौरांनी सांगितले, “प्लॅास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या अवशेषांपासून विटा तयार करणे सक्‍तीचे केले जाईल. या विटा कशा बनवायच्या याचे प्रशिक्षण सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर एक कार्यशाळा आयोजित करून देण्यात येईल. सामाजिक स्वयंसेवी संस्था व लोकांना या विटा बनवण्याचे प्रशिक्षण तज्ञांमार्फत दिले जाईल. या विटांचा वापर मंदिराचे बांधकाम, भूमीपूजन आदी प्रसंगी केला जाऊ शकतो.”

 |  मित्रांना पाठवा छापील प्रत

  निगडीत वृत्त : याबाबत बलाढ्य हिंदुत्त्ववादी संघटना काय करणार आहेत?

Leave a Reply