गणेशभक्‍तांनी नदीतच गणेशमूर्तीचे विसर्जन करावे !

जे नागरिक हौदात विसर्जन करतात, त्यांनी मात्र हौद व्यवस्थापनाची तपासणी करून विसर्जनाचा निर्णय घेणे गरजेचे आहे. काही शास्त्रज्ञांनी परंपरागत धार्मिक विधींनी कुठलेच प्रदूषण होत नाही, उलट हे सर्व विधी पर्यावरण रक्षणास उपयुक्‍त आहेत, असा निर्वाळा दिला आहे.

आपली मुले-बाळे दुसर्‍यांनी सांभाळावीत, अशी अपेक्षा करणे जितके चूक आहे, तितकेच आपली श्रद्धा दुसर्‍याने सांभाळण्याची व निस्तरण्याची अपेक्षाही चूक आहे. आपली श्रद्धा ही आपणच सांभाळली पाहिजे. मोहरमचे ताबूत विसर्जन करणार्‍यांनी नदी लांब पडते म्हणून कधी ताबूत विसर्जनासाठी हौद बांधायची मागणी केल्याची कोणाला आठवते का ? ताबूत विसर्जन करणारे स्वत:ची श्रद्धा स्वत: सांभाळतात व निस्तरतात. आणि त्यांच्या या वृत्तीमुळेच त्यांच्या धार्मिक विधींविषयी खोटे अपप्रचार झाल्याचे कधी कोणी पाहिले नाही. तेव्हा आपली श्रद्धा दुसर्‍याकडे न सोपवता ती स्वत: सांभाळणे श्रेयस्कर होय.

  निगडीत वृत्त : श्री गणपति विशेष

गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम हौदात करत आहात ! – थांबा ! वाचा !! मगच निर्णय घ्या !!!

दरवर्षी गणेशोत्सव जवळ आल्यावर प्रदूषणाच्या नावाखाली गणेशमूर्तींचे हौदात विसर्जन करण्याचे आवाहन केले जाते. प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक महानगरपालिकाही यात अग्रभागी असते, हे वेगळे सांगायला नको; पण गणेशमूर्तींच्या विसर्जनाने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही, याची इत्यंभूत माहिती पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. अजय वैशंपायन हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत आहेत.

 

त्यांनी संकलीत केलेली ही अभ्यासपूर्ण माहिती आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत. उद्या अनंत चतुदर्शी आहे. हिंदूंनो, या दिवशी श्री गणेशाची मूर्ती महानगरपालिकेने बांधलेल्या हौदात विसर्जन करणार असाल, तर पुढील गोष्टी लक्षात घ्या. काही बाबींवर विचार करा, माहिती घ्या व मगच निर्णय घ्या ! श्री. वैशंपायन यांनी पुणे शहरातील परिस्थितीचा अभ्यास करून हा लेख लिहिला आहे; मात्र त्यांतील निकष सर्वत्र लागू पडतात, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे.


हिंदूंनो, याकडे लक्ष द्या !
१. गणेशमूर्ती व निर्माल्य विसर्जन यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी घातलेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेनेही त्यावर बंदी घातलेली नाही.

२. अनेक पर्यावरणवादी संस्था व अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थी यांनी गणेशमूर्ती विसर्जनाने नदीच्या प्रदूषणात काहीही वाढ होत नाही, असा निर्वाळा प्रयोगांती दिला आहे.

३. `जिप्सम’ नावाच्या खडकातील पाण्याचा अंश बाहेर काढला की, त्याची पावडर बनते. यालाच `प्लास्टर ऑफ पॅरीस’ किंवा `कॅल्शिअम सल्फेट’ असे म्हणतात. हा पदार्थ अल्कली नाही, अँसिडीक नाही, तर तो `न्यूट्रल’ आहे व तो औषधातही वापरतात. एवढेच नव्हे, तर पाणी शुद्धीकरण प्रक्रियेतही त्याचा वापर होतो.

४. `प्लास्टर ऑफ पॅरीस’ विरघळल्यावर इतर मातीसारखीच माती बनते व ही माती ओली असतांना किंवा वाळल्यावरही त्याला परत घट्टपणा किंवा चिकटपणा प्राप्‍त होत नाही. त्यामुळे ते झर्‍यावर वगैरे बसून नदी पात्रातील झरे बुजण्याचा प्रश्‍नच येत नाही.

५. पुराबरोबर लाखो टन माती नदीत येते. त्यातील काही तळाला बसते, तर काही काठावर जाते. या मातीचा हिशोब आपण जरी सोडून दिला, तरी मुठा नदीत नैसर्गिकरीत्या दररोज ९० टन म्हणजेच वर्षाला ३२ हजार ८५० टन गाळ जमा होतो. पुणे शहरातील सर्व गणेशमूर्ती जरी नदीत विसर्जित केले, तरी त्याचा गाळ जेमतेम ३० टनापेक्षा जास्त होणार नाही. म्हणजेच हा गाळ नगण्य असतो.

६. मुठा नदीत खाजगी व शासकीय ठेकेदार यांनी व पुणे महानगरपालिकेने रस्ते करण्याच्या निमित्ताने नदीच्या पात्रात लाखो टन राडारोडा टाकल्याचे वेळोवेळी आपण वृत्तपत्रातून वाचले असेल व कदाचित काहींना टाकतांना बघितलेही असेल.

७. घट्ट `प्लास्टर ऑफ पॅरीस’ संथ पाण्यात विरघळायला १।। ते २ महिने लागतात; परंतु नदीत प्रवाह असल्याने चार किंवा सात-आठ दिवसांत ते विरघळते.

८. घरात पेल्यातील पाण्यात `प्लास्टर ऑफ पॅरीस’चा खडा विरघळवून कोणीही याची सत्यता पडळातून पाहू शकतो व याविषयी शास्त्रीय माहिती `गुगल केमिस्ट्री’वर पाहू शकतो.

९. पुणे महानगरपालिका आज ५० टक्केच्या वर सांडपाणी थेट नदीत सोडते व बाकीच्या पाण्यावर जुजबी प्रक्रिया करते. त्या सांडपाण्याच्या शुद्धीकरण प्रकल्पात हा रंग बाजूला काढण्याची काहीही यंत्रणा नाही.

१०. या नदीत खाजगी व शासकीय कंत्राटदार यांनी व पुणे महानगरपालिकेने रस्ते करण्याच्या निमित्ताने नदी पात्रात लाखो टन राडारोडा टाकल्याचे वेळोवेळी आपण वृत्तपत्रातून वाचले असेल व कदाचित काहींनी टाकतांना बघितलेही असेल.

११. थोडक्यात, गणेशमूर्तीच्या विसर्जनाने नदीत जाणारी माती व रंग अत्यंत नगण्य असून पर्यावरण किंवा नदी प्रदूषण यांच्या दृष्टीने त्याचा विचार करण्याचीही गरज नाही. तरीसुद्धा विसर्जन व्यवस्थेवर नागरिकांच्या करांतून जवळ-जवळ पंधरा लाख रुपये खर्च होतात व एवढा खर्च करूनही हौदांचे व्यवस्थापन हे जनतेच्या धर्मश्रद्धा दुखावणारे असते.
गणेशमूर्ती हौदात विसर्जन करणार्‍या नागरिकांची कारणे व त्याचा प्रतिवाद
हौदात गणेशमूर्ती विसर्जन करणार्‍यांचे तीन वर्ग आहेत. हौदात गणेशमूर्ती विसर्जन करणार्‍या नागरिकांनी तरी खालील गोष्टींचा विचार करायला हवा.

वर्ग १
नदीचे प्रदूषण होते, म्हणून हौदात विसर्जन करणारे भाविक :
गणेशमूर्ती विसर्जनाने नदी प्रदूषित होत नाही व तसा पर्यावरणीय संस्थांनी पाण्याची तपासणी करून निर्वाळा दिला आहे व सुरुवातीला मी त्याची शास्त्रीय माहितीही दिली आहे. बादलीतील पाणी, विहिरी, नदी व समुद्राचे पाणी या प्रत्येक पाण्यासाठीच्या प्रदूषणाच्या संकल्पना वेगवेगळया असतात. पाण्याचे प्रमाण व विसर्जन होणार्‍या गोष्टीचे प्रमाण हे प्रथम बघावे लागते. बादलीत शाडू माती टाकली, तर पाणी पांढरे दिसणार, लाल माती टाकल्यास पाणी लाल दिसणार व एक थेंब तेलकट रंग टाकल्यास तो पाण्यावर तरंगणार या गोष्टी नैसर्गिक आहेत. बादलीतील पाण्यात एक चमचा कपडे धुण्याचे पावडर टाकले, तर ते पाणी ना प्यायच्या लायकीचे राहते ना चूळ भरायच्या लायकीचे राहते. ज्या गोष्टीने बादलीतील पाणी प्रदूषित होते, त्याने नदी किंवा समुद्र यांतील पाणी प्रदूषित होत नसते. नदीतील मासे विषारी पदार्थ नदीत मोठ्या प्रमाणावर मिसळून प्राणवायू शुन्य झाल्याने मरत असतात, गणेशमूर्ती विसर्जनाने नव्हे. पुण्यातील सर्व गणपती जरी हौदात विसर्जन केले, तरी मुठा नदीच्या प्रदूषणात काडीइतका फरक पडणार नाही. तेव्हा नदी प्रदूषित होईल म्हणून गणपती हौदात विसर्जन करण्याचे काही कारण नाही.

वर्ग २
नदीचे पाणी अस्वच्छ असते, म्हणून हौदात विसर्जन करणारे भाविक :
नदीवर असलेल्या पहिल्या धरणापर्यंत नदीचे पाणी `ए-१’ दर्जाचे नक्की असते; मात्र त्यापुढे शहरातून नदी वाहतांना नदीचे पाणी `ए-१’ दर्जाचे रहाण्याची शाश्‍वती नसते. कुठल्याही नदीचे पाणी सर्व ठिकाणी पिण्यायोग्य नसते. मुठा नदी, पुणे महानगरपालिकेच्या कर्तृत्वाने प्रदूषित झालेली असली, तरी पावसाळयात ताज्या पाण्यामुळे नदीचे प्रदूषण कमी असते व विसर्जन काळात धरणातून नदीत पाणीही सोडण्यात येते. वाहते पाणी कसेही असले, तरी धार्मिक कार्यासाठी ते पवित्रच असते आणि विसर्जन काळात धरणातूनही नदीत ताज्या पाण्याचा पुरवठा केला जातो. तेव्हा पाणी प्रदूषित असते म्हणून हौदात विसर्जन करतो, हे सांगणे योग्य ठरत नाही.

वर्ग ३
लोकांची सोय व्हावी, म्हणून हौदात विसर्जन करणारे भाविक :
`गणेशमूर्ती विसर्जनामुळे नदीचे प्रदूषण होते म्हणून नव्हे, तर लोकांची सोय व्हावी म्हणून आम्ही हौद बांधतो’, अशी भूमिका पुणे महानगरपालिकेने सध्या स्विकारली आहे. दुर्दैवाने कित्येक लोकही नदी लांब पडते म्हणून हौदात विसर्जन करतात. मुंबईत मात्र लोक ४-५ किलोमीटर अंतरावरून चौपाटीवर विसर्जनासाठी येत येतात. सोय म्हणून हौद स्वीकारणार्‍यांनी हौदातील गणेशमूर्तींचे पालिका पुढे काय करते याची प्रत्यक्ष माहिती घेतली आहे का ?, हा खरा प्रश्‍न आहे. `सोय म्हणून हौदात विसर्जन करणे’, ही आपली धार्मिक जबाबदारी टाळण्याचा व आळशीपणाचा प्रकार आहे. जी व्यक्‍ती गणेशोत्सवावर हजार, दीड हजार खर्च करते, त्याच्याजवळ रिक्क्षा करून नदीवर येण्यासाठी पन्नास-शंभर रुपये नसतात का ? नदीवर आल्यावर स्वत: विसर्जन करण्यासारखी परिस्थिती नसेल, तर विसर्जन करणार्‍या मुलांना किंवा होडीवाल्याला द्यावयास पाच-दहा रुपये नसतात का ? याचा विचार ज्याने त्याने स्वत:शी करणे गरजेचे आहे.

धर्म न मानणार्‍यांकडून धर्मश्रद्धेचा सोयीचा अर्थ !
स्वत:च्या हौद व्यवस्थापनाची भलावण करण्यासाठी पुणे मनपा व काही अधार्मिक मंडळींनी असे तत्त्वज्ञान मांडले आहे की, “गणपतीत प्राण घातलेला असतो व विसर्जन करावयाच्या अगोदर तो काढलेला असतो, त्यामुळे ती मातीच असते. त्यामुळे त्याचे काहीही केले तरी चालते.” बघा! धर्म न मानणारी, मंत्र-तंत्र, जादुटोणा न मानणारी माणसे स्वत:च्या कुकर्मावर पांघरूण घालण्यासाठी प्राण घालणे व काढणे, हे चेटूक मात्र मानतात. शासकीय कार्यालयात ज्या थोर पुरुषांची छायाचित्रे व पुतळे असतात. देवतांच्या प्रतिमा लावलेल्या असतात, तसेच लोकांच्या घरी आपल्या वाडवडिलांचे छायाचित्र लावलेले असते, त्या सर्वांची प्राणप्रतिष्ठा केलेली असते का ? व केवळ प्राणप्रतिष्ठा केली नाही म्हणून येताजाता छायाचित्रांना पायाखाली तुडवतो का ? याचा विचार केला पाहिजे. वृत्तपत्रात आलेल्या देवांच्या चित्रांना सुद्धा आपण पाय लावत नाही.

आपली श्रद्धा कोणाच्याही पायदळी तडवू नका !
गणेशमूर्ती नदीत विसर्जन करणारे व हौदात विसर्जन करणारे या दोघांमध्ये एक धागा मात्र समान असतो, तो म्हणजे सगुण-साकार परमेश्‍वराच्या भक्‍तीचा. परमेश्‍वराची सगुण भक्‍ती शांत, दास्य, वीर, प्रेम, सख्य इ. भावाने करावी, असे पुराणात व संतांनीही सांगितले आहे. सगुणभक्‍ती ही सर्वश्रेष्ठ आहे, असाही निर्वाळा दिला आहे. आपण ज्या मूर्तीची उपासना करतो, तिला प्राणापेक्षा जास्त सांभाळून, सर्वस्व समर्पण करावे असे आहे; परंतु आपली श्रद्धा समजून-उमजून, जाणून-बुजून दुसर्‍यांच्या पायदळी तुडवण्यास द्यावी, असे कोठे काही लिहिले नाही.

 |  मित्रांना पाठवा छापील प्रत

  निगडीत वृत्त : श्री गणपति विशेष

कृत्रिम तलावातील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या मातीपासून विटा तयार करणे सक्‍तीचे – मुंबईच्या महापौर डॉ. (सौ.) शुभा राऊळ

गणेशमूर्तीपासून विटा करण्याची सक्‍ती करणार्‍या महापौरांबाबत शिवसेनेला काय म्हणायचे आहे ?

 

गणेशाची विटंबना केली, तरी हिंदुत्ववादी पक्षांना काही वाटणार नाही; कारण श्री गणेश मतदार नाही !

मुंबई, १२ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदूंचे सण व उत्सव या प्रसंगी प्रदूषणाची बोंब उठवणार्‍या पर्यावरणवाद्यांच्या नादाला लागून महापालिका प्रशासनाने कृत्रिम तलावात विसर्जित शाडू मातीचा वापर उद्यानातील झाडांसाठी करण्याचा धर्मद्रोही निर्णय घेऊन हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा चंग बांधला आहे. या निर्णयानंतर आता मुंबईच्या महापौर डॉ. (सौ.) शुभा राऊळ यांनी कृत्रिम तलावातील विसर्जित प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या अवशेषापासून विटा बनवणे सक्‍तीचे असल्याचे जाहीर केले आहे.

(कृत्रिम तलावाबाबतच्या परिपत्रकात (एम्डीएफ्/९६२९/साधा, दिनांक २५.७.२००८) नियम ७ मध्ये म्हटले आहे, `गणेशमूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर आणि कृत्रिम तलावातील पाणी आजूबाजूच्या जमिनीत पाझरून गेल्यानंतर विरघळलेल्या गणेशमूर्ती आणि त्यांचे अवशेष काळजी घेऊन आणि पावित्र्य भंग होणार नाही, अशा प्रकारे ज्या ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन होते, त्या ठिकाणी समुद्रात/तलावांत विसर्जित करण्यात यावेत.’ असे असतांना स्वत:च्याच नियमांचे उल्लंघन करणारी व पर्यावरणाच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी धर्मद्रोही महापालिका ! – संपादक) महापौरांनी याबाबतची माहिती काल काही पत्रकारांना दिली.
यंदा मुंबई महापालिकेने २५ ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले आहेत. या तलावांतील गणेशमूर्तींचे अवशेष पावित्र्य राखून व विधीवत तलावाबाहेर काढून समुद्रात खोल अंतरावरील पाण्यात विसर्जित केले जातील, असे पालिका अतिरिक्‍त आयुक्‍त श्री. माधव सांगळे यांनी पत्रकारांशी बोलतांना यापूर्वी सांगितले होते. पत्रकारांनी महापौरांना कृत्रिम तलावांतील गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याबाबतच्या नियमावलीतील उल्लेखाबाबत प्रश्‍न विचारला असता महापौर डॉ. (सौ.) शुभा राऊळ यांनी सांगितले, “पालिका कृत्रिम तलावांतील विसर्जित मूर्तींचे अवशेष पुन्हा समुद्रात विसर्जित करणार नाही. मूर्तींच्या अवशेषांपासून स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत विटा तयार करण्यात येतील; कारण यंदा कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लोकांचे म्हणणे आहे, या अवशेषांचा पुनर्वापर व्हावा.” (जनतेचे नाव पुढे करून हिंदु धर्मियांच्या भावना दुखावणारा धर्मद्रोही निर्णय घेणारी महापालिका ! – संपादक) याही पुढे जाऊन महापौरांनी सांगितले, “प्लॅास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या अवशेषांपासून विटा तयार करणे सक्‍तीचे केले जाईल. या विटा कशा बनवायच्या याचे प्रशिक्षण सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर एक कार्यशाळा आयोजित करून देण्यात येईल. सामाजिक स्वयंसेवी संस्था व लोकांना या विटा बनवण्याचे प्रशिक्षण तज्ञांमार्फत दिले जाईल. या विटांचा वापर मंदिराचे बांधकाम, भूमीपूजन आदी प्रसंगी केला जाऊ शकतो.”

 |  मित्रांना पाठवा छापील प्रत

  निगडीत वृत्त : याबाबत बलाढ्य हिंदुत्त्ववादी संघटना काय करणार आहेत?

काश्मीर तोडू पहाणारे नेते यासीन मलीक यांना पोलिसांनी चोपले !

श्रीनगर, १२ सप्टेंबर (वृत्तसंस्था) – येथील लाल चौकामध्ये आंदोलन करण्यासाठी आलेले काश्मीर तोडण्याची भाषा करणारे विघटनवादी नेते यासीन मलीक यांना पोलिसांनी आज चांगलाच चोप दिला.

काश्मीर भारतात असावे कि पाकिस्तानमध्ये, हा निर्णय घेण्याचा अधिकार काश्मिरी जनतेला देण्यात यावा, या मागणीसाठी काश्मीर खोर्‍यात विघटनवादी संघटना व मुसलमान आंदोलन करत आहेत. (काश्मीरमधील विघटनवादी मुसलमानांचे पाकिस्तानशी साटेलोटे आहे, हे जगजाहीर आहे. काश्मीरला भारतापासून तोडू पहाणार्‍या अशा विघटनवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची बुद्धी काँग्रेस सरकारला होईल, तो
सुदिन ! – संपादक)
त्याअंतर्गत येथे आंदोलन करण्यासाठी जेकेएल्एफ् या देशद्रोही विघटनवादी संघटनेचे नेते यासीन मलीक यांच्यासह ४ हजार मुसलमान आंदोलक
जमले होते. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर करत केलेल्या लाठीहल्ल्यामध्ये मलीक जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात हालवण्यात आले. काश्मीर खोर्‍यात अन्य ठिकाणीही मुसलमानांनी स्वयंनिर्णयासाठी हे आंदोलन पुकारले. (काश्मीर खोर्‍यातील हिंदूंनी कधीही अशी मागणी केली नाही. मुसलमानांचा मात्र भारतविरोधी कट शिजत आहे, हे यातून दिसून येते. – संपादक) आज विघटनवादी संघटनांकडून काश्मीरमध्ये `बंद’चे आवाहन करण्यात आले. जामिया मशिदीमध्ये प्रार्थनेनंतर हुरियत परिषदेचे नेते मीरवैझ फारूख यांनी मुसलमानांना
संबोधित केले. त्या वेळी त्यांनी नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकांवर
बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. (काश्मीरमध्ये विघटनवादाचे विष पसरवणारे फारूख यांच्यावर काँग्रेस सरकार काय कारवाई करणार आहे ? – संपादक) “विघटनवादी संघटनांच्या मोर्च्यांमध्ये सहभागी होणार्‍या मुसलमानांना पोलीस ठाण्यात हजर रहाण्याचे आदेश प्रशासनाने थांबवले नाहीत, तर हुरियत `जेल भरो’ आंदोलन छेडणार”, असे ते म्हणाले.

मुसलमानांच्या राष्ट्रनिष्ठेविषयी रविंद्रनाथ टागोर यांनी उपस्थित केलेले प्रश्‍नचिन्ह !
हिंदु व मुसलमान यांच्यात कधीच एकोपा होऊ शकत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे मुसलमान ते वास्तव्य करत असलेल्या देशाचे देशभक्‍त नसतात ! “मुसलमानांनी भारतावर हल्ला केल्यावर तुम्ही देशाचे संरक्षण करण्यासाठी देशातील हिंदूंना सहकार्य
कराल का”, असा प्रश्‍न मी अनेक मुसलमानांना विचारला. त्यांनी दिलेल्या उत्तराने माझे समाधान झाले नाही ! – गुरुदेव रविंद्रनाथ टागोर (`हैंदव केरळम’ या संकेतस्थळावरून)