मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचा खेळ रद्द !

मराठीविषयी आंदोलने करणारे कधी देवतांच्या विडंबनाबद्दल आंदोलने करत नाहीत; कारण देवता मतदार नाहीत !

मुंबई, १० सप्टेंबर (वृत्तसंस्था) – मराठी भाषेला हिणवणार्‍या समाजवादी पक्षाच्या खासदार व अभिनेत्री सौ. जया बच्चन यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गेले दोन दिवस हिसका दाखवला. आज श्री. अमिताभ बच्चन यांच्या `द लास्ट लियर’ या चित्रपटाचा पहिला खेळ पीवीआर् सिनेमागृहात होणार होता; मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांनी या चित्रपटगृहावर हल्ला केला व तोडफोड केली. त्यामुळे या चित्रपटाचा पहिला खेळ आज रद्द करण्यात आला.

सौ. जया बच्चन यांनी `हम युपीवाले है । हिंदीमेही बात करेंगे ।’, असे वक्‍तव्य एका जाहीर कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वक्‍तव्यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सौ. बच्चन यांनी एका इंग्रजी नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्राची माफी मागितली होती; मात्र “सौ. बच्चन महाराष्ट्र व मराठी माणूस यांची जाहीर माफी मागत नाही, तोपर्यंत बच्चन कुटुंबियांचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही”, असा इशारा श्री. राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रभर बच्चन कुटुंबियांच्या विरोधात तीव्र पडसाद उमटले. “मुंबईमध्ये `द लास्ट लियर’ या चित्रपटाचा पहिला खेळ होणार नाही”, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते श्री. अरिंदम चौधरी यांनी दिली.

मुंबई कोणाच्या बापाची नाही – मुंबईचे अतिरिक्‍त पोलीस आयुक्‍त

मुंबई कोणाच्या बापाची नाही, ती सर्वांची आहे, असे वक्‍तव्य अतिरिक्‍त पोलीस आयुक्‍त श्री. के.एल्. प्रसाद यांनी केले. “कोणत्याही मुद्यावरून जर शांततेला बाधा आणण्याचा प्रयत्‍न कोणी केला, तर ते खपवून घेतले जाणार नाही”, असे वक्‍तव्य श्री. प्रसाद
यांनी श्री. राज ठाकरे यांचे नाव न घेता केले. “बच्चन कुटुंबियांना त्यांच्या जीवाला धोका आहे, असे वाटत असेल, तर त्यांना सुरक्षाव्यवस्था पुरवणे, हे पोलिसांचे कर्तव्य आहे”, असेही श्री. प्रसाद म्हणाले.

अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी !
लंडन – सौ. जया बच्चन यांनी केलेल्या मराठीविरोधी वक्‍तव्याच्या प्रकरणात अभिनेते
श्री. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या `ब्लोग’वर माफी मागितली आहे. सध्या श्री. बच्चन युरोप दौर्‍यावर आहेत. “बच्चन कुटुंबिय जन्मभूमी व कर्मभूमी यांचा आदर करतात. गेली ४० वर्षे मी मुंबईत वास्तव्य करत असून या शहराने मला मोठे केले”, याची मला जाणीव आहे, असे श्री. बच्चन यांनी त्यांच्या `ब्लॉग’वर म्हटले आहे. श्री. बच्चन यांनी ते महाराष्ट्रनिष्ठ असल्याची अनेक उदाहरणे या `ब्लॉग’वर दिली आहेत.

One Response to “मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचा खेळ रद्द !”

  1. K.T.Bodke Says:

    The Article Was Helpful…


Leave a Reply