हिंदी भाषेतील वृत्तपत्रे प्रारंभी हिंदी भाषिक प्रदेशात निघाली नाहीत; कारण ब्रिटिशांच्या काळात हिंदी भाषिक प्रदेश मागास होता. नेहरूंच्या आणि मुलायमसिंगांच्या काळातही तो मागासच राहिला. `बनारस अखबार’ नावाचे वृत्तपत्र वाराणसीहून १८४५ मध्ये निघाले. ते हिंदी भाषिक प्रदेशातील पहिले वृत्तपत्र.
त्याचे संपादक कोणी बच्चन वगैरे नव्हते, तर ते होते गोविंद रघुनाथ थत्ते नावाचे मराठी गृहस्थ. हिंदी वृत्तपत्रे मराठी माणसांनी नुसती चालवली नाहीत, तर ती लोकप्रिय केली. हिंदी भाषिकांना वृत्तपत्र वाचनाची गोडी मराठी माणसांनी लावली. माधवराव सप्रे, लक्ष्मण नारायण गर्दे, गोविंदशास्त्री दुगवेकर, बाबूराव विष्णू पराडकर, राहुल वारपुते यांनी `हिंदी पत्रकारिता’ समृद्ध केली. हिंदी भाषिक पराडकरांना महर्षी म्हणून पूजतात.
मी `यूपी’ची आहे; म्हणून हिंदीतच बोलणार, मराठीत बोलणार नाही, असे अमिताभ बच्चनची बायको जया बच्चन बरळली, तेव्हा ती किती कृतघ्न आहे, ते कळले. मराठी माणसांनी या उत्तरप्रदेशींना वृत्तपत्र वाचायला शिकवले. ते वाचून `यूपी’वाले मराठ्यांची राजधानी मुंबईत पोटापाण्यासाठी आले. त्यांचे संसार येथे फुलले. मराठी लोकांनी त्यांना मान दिला. डोक्यावर घेतले. त्याची परतफेड त्यांनी `आम्ही `यूपी’वाले आहोत; म्हणून मराठीत बोलणार नाही’, अशी डरकाळी फोडून केली. महाराष्ट्राला त्यामुळे वाईट वाटणे साहजिकच आहे. सर्वसाधारणपणे मराठी माणूस राष्ट्रविरोधी शक्तींशी हातमिळवणी करत नाही. अराष्ट्रीय होत नाही. तो जेथे जातो, तेथील भाषा आपली मानतो. भाषेशी वैर तो करत नाही. उत्तरप्रदेशचे सगळयात यशस्वी मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत हे मूळचे मराठी. तेथे गेल्यावर त्यांची मातृभाषा हिंदी झाली. दाक्षिणात्य नट रजनीकांत मूळचा महाराष्ट्राचा; पण तो तामिळनाडूत स्थायिक झाल्यावर त्याची मातृभाषा तामिळ झाली. शिंदे, होळकर, गायकवाड या मराठी सरदारांनी हिंदी आणि गुजराती प्रदेशांवर कित्येक पिढ्या राज्य केले. त्यांनी तेथे मराठी लादली नाही. हिंदी वा गुजरातीला दाबले नाही. मराठी-हिंदी आणि मराठी-गुजराती संस्कृतीचा सुरेख संगम त्यांनी घडवला. मराठ्यांनी सर्व भारतावर राज्य केले आहे आणि त्यांचा राज्यकारभार ब्रिटिशांपेक्षा वा काँग्रेसवाल्यांपेक्षा वाईट होता, असे म्हणता येणार नाही. शिवाजी महाराजांच्या भाषाशुद्धीच्या आणि हिंदुत्वनिष्ठ धोरणांमुळे उत्तर हिंदुस्थानातील हिंदी तिच्या बोलीभाषांसकट जिवंत राहिली. नाहीतर तिचे `फारसीकरण’ होऊन ती मेली असती, हे जया बच्चनला कळत नसेल, तर ठाकरे पितापुत्रांनी तिला जवळ बसवून समजावून सांगायला हवे. जया बच्चन कृतघ्नच नव्हे, तर खोटारडी आहे; कारण तिचे बालपण आणि बरेचसे शिक्षण नागपुरात झाले आहे. तिचे वडील नागपुरात इंग्रजी वृत्तपत्रात पत्रकार होते. नंतर त्यांना कोलकात्यात नोकरी मिळाल्यानंतर ती तिकडे गेली. मग चित्रपटामुळे मुंबईत आली आणि येथेच राहिली. तिचा बराच जीवनकाळ महाराष्ट्रात जाऊनही मराठी न बोलण्याचा पण तिने केला; कारण ती मुलायमसिंगसारख्या एका पाकिस्तानवाद्याला सामील आहे. सिमीचे बाँबस्फोट आणि बांगलादेशी घुसखोर यांच्या विरोधात हिंदू संघटित होऊ नयेत, म्हणून `मराठी विरुद्ध उत्तरप्रदेशी’ असा वाद तापत ठेवायला तिला सांगितले आहे आणि ती हुकूमाची ताबेदार आहे. तिचा मुलगा अभिषेक `इसाई धर्मप्रसारक हेच गरिबांचे तारणहार आहेत’, असा प्रचार करत फिरतो आहे. पैशासाठी अमिताभ कोणतीही भूमिका वठवणारा आहे. यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचे लोकांनी ठरवले असेल, तर त्यांना कसे आवरणार ?
- सुघोष
| मित्रांना पाठवा | छापील प्रत
निगडीत वृत्त : शरसंधान
|


