मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचा खेळ रद्द !

मराठीविषयी आंदोलने करणारे कधी देवतांच्या विडंबनाबद्दल आंदोलने करत नाहीत; कारण देवता मतदार नाहीत !

मुंबई, १० सप्टेंबर (वृत्तसंस्था) – मराठी भाषेला हिणवणार्‍या समाजवादी पक्षाच्या खासदार व अभिनेत्री सौ. जया बच्चन यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गेले दोन दिवस हिसका दाखवला. आज श्री. अमिताभ बच्चन यांच्या `द लास्ट लियर’ या चित्रपटाचा पहिला खेळ पीवीआर् सिनेमागृहात होणार होता; मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांनी या चित्रपटगृहावर हल्ला केला व तोडफोड केली. त्यामुळे या चित्रपटाचा पहिला खेळ आज रद्द करण्यात आला.

सौ. जया बच्चन यांनी `हम युपीवाले है । हिंदीमेही बात करेंगे ।’, असे वक्‍तव्य एका जाहीर कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वक्‍तव्यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सौ. बच्चन यांनी एका इंग्रजी नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्राची माफी मागितली होती; मात्र “सौ. बच्चन महाराष्ट्र व मराठी माणूस यांची जाहीर माफी मागत नाही, तोपर्यंत बच्चन कुटुंबियांचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही”, असा इशारा श्री. राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रभर बच्चन कुटुंबियांच्या विरोधात तीव्र पडसाद उमटले. “मुंबईमध्ये `द लास्ट लियर’ या चित्रपटाचा पहिला खेळ होणार नाही”, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते श्री. अरिंदम चौधरी यांनी दिली.

मुंबई कोणाच्या बापाची नाही – मुंबईचे अतिरिक्‍त पोलीस आयुक्‍त

मुंबई कोणाच्या बापाची नाही, ती सर्वांची आहे, असे वक्‍तव्य अतिरिक्‍त पोलीस आयुक्‍त श्री. के.एल्. प्रसाद यांनी केले. “कोणत्याही मुद्यावरून जर शांततेला बाधा आणण्याचा प्रयत्‍न कोणी केला, तर ते खपवून घेतले जाणार नाही”, असे वक्‍तव्य श्री. प्रसाद
यांनी श्री. राज ठाकरे यांचे नाव न घेता केले. “बच्चन कुटुंबियांना त्यांच्या जीवाला धोका आहे, असे वाटत असेल, तर त्यांना सुरक्षाव्यवस्था पुरवणे, हे पोलिसांचे कर्तव्य आहे”, असेही श्री. प्रसाद म्हणाले.

अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी !
लंडन – सौ. जया बच्चन यांनी केलेल्या मराठीविरोधी वक्‍तव्याच्या प्रकरणात अभिनेते
श्री. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या `ब्लोग’वर माफी मागितली आहे. सध्या श्री. बच्चन युरोप दौर्‍यावर आहेत. “बच्चन कुटुंबिय जन्मभूमी व कर्मभूमी यांचा आदर करतात. गेली ४० वर्षे मी मुंबईत वास्तव्य करत असून या शहराने मला मोठे केले”, याची मला जाणीव आहे, असे श्री. बच्चन यांनी त्यांच्या `ब्लॉग’वर म्हटले आहे. श्री. बच्चन यांनी ते महाराष्ट्रनिष्ठ असल्याची अनेक उदाहरणे या `ब्लॉग’वर दिली आहेत.

जयावर प्रभाव कोणाचा ?

हिंदी भाषेतील वृत्तपत्रे प्रारंभी हिंदी भाषिक प्रदेशात निघाली नाहीत; कारण ब्रिटिशांच्या काळात हिंदी भाषिक प्रदेश मागास होता. नेहरूंच्या आणि मुलायमसिंगांच्या काळातही तो मागासच राहिला. `बनारस अखबार’ नावाचे वृत्तपत्र वाराणसीहून १८४५ मध्ये निघाले. ते हिंदी भाषिक प्रदेशातील पहिले वृत्तपत्र.

 

त्याचे संपादक कोणी बच्चन वगैरे नव्हते, तर ते होते गोविंद रघुनाथ थत्ते नावाचे मराठी गृहस्थ. हिंदी वृत्तपत्रे मराठी माणसांनी नुसती चालवली नाहीत, तर ती लोकप्रिय केली. हिंदी भाषिकांना वृत्तपत्र वाचनाची गोडी मराठी माणसांनी लावली. माधवराव सप्रे, लक्ष्मण नारायण गर्दे, गोविंदशास्त्री दुगवेकर, बाबूराव विष्णू पराडकर, राहुल वारपुते यांनी `हिंदी पत्रकारिता’ समृद्ध केली. हिंदी भाषिक पराडकरांना महर्षी म्हणून पूजतात.
मी `यूपी’ची आहे; म्हणून हिंदीतच बोलणार, मराठीत बोलणार नाही, असे अमिताभ बच्चनची बायको जया बच्चन बरळली, तेव्हा ती किती कृतघ्न आहे, ते कळले. मराठी माणसांनी या उत्तरप्रदेशींना वृत्तपत्र वाचायला शिकवले. ते वाचून `यूपी’वाले मराठ्यांची राजधानी मुंबईत पोटापाण्यासाठी आले. त्यांचे संसार येथे फुलले. मराठी लोकांनी त्यांना मान दिला. डोक्यावर घेतले. त्याची परतफेड त्यांनी `आम्ही `यूपी’वाले आहोत; म्हणून मराठीत बोलणार नाही’, अशी डरकाळी फोडून केली. महाराष्ट्राला त्यामुळे वाईट वाटणे साहजिकच आहे. सर्वसाधारणपणे मराठी माणूस राष्ट्रविरोधी शक्‍तींशी हातमिळवणी करत नाही. अराष्ट्रीय होत नाही. तो जेथे जातो, तेथील भाषा आपली मानतो. भाषेशी वैर तो करत नाही. उत्तरप्रदेशचे सगळयात यशस्वी मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत हे मूळचे मराठी. तेथे गेल्यावर त्यांची मातृभाषा हिंदी झाली. दाक्षिणात्य नट रजनीकांत मूळचा महाराष्ट्राचा; पण तो तामिळनाडूत स्थायिक झाल्यावर त्याची मातृभाषा तामिळ झाली. शिंदे, होळकर, गायकवाड या मराठी सरदारांनी हिंदी आणि गुजराती प्रदेशांवर कित्येक पिढ्या राज्य केले. त्यांनी तेथे मराठी लादली नाही. हिंदी वा गुजरातीला दाबले नाही. मराठी-हिंदी आणि मराठी-गुजराती संस्कृतीचा सुरेख संगम त्यांनी घडवला. मराठ्यांनी सर्व भारतावर राज्य केले आहे आणि त्यांचा राज्यकारभार ब्रिटिशांपेक्षा वा काँग्रेसवाल्यांपेक्षा वाईट होता, असे म्हणता येणार नाही. शिवाजी महाराजांच्या भाषाशुद्धीच्या आणि हिंदुत्वनिष्ठ धोरणांमुळे उत्तर हिंदुस्थानातील हिंदी तिच्या बोलीभाषांसकट जिवंत राहिली. नाहीतर तिचे `फारसीकरण’ होऊन ती मेली असती, हे जया बच्चनला कळत नसेल, तर ठाकरे पितापुत्रांनी तिला जवळ बसवून समजावून सांगायला हवे. जया बच्चन कृतघ्नच नव्हे, तर खोटारडी आहे; कारण तिचे बालपण आणि बरेचसे शिक्षण नागपुरात झाले आहे. तिचे वडील नागपुरात इंग्रजी वृत्तपत्रात पत्रकार होते. नंतर त्यांना कोलकात्यात नोकरी मिळाल्यानंतर ती तिकडे गेली. मग चित्रपटामुळे मुंबईत आली आणि येथेच राहिली. तिचा बराच जीवनकाळ महाराष्ट्रात जाऊनही मराठी न बोलण्याचा पण तिने केला; कारण ती मुलायमसिंगसारख्या एका पाकिस्तानवाद्याला सामील आहे. सिमीचे बाँबस्फोट आणि बांगलादेशी घुसखोर यांच्या विरोधात हिंदू संघटित होऊ नयेत, म्हणून `मराठी विरुद्ध उत्तरप्रदेशी’ असा वाद तापत ठेवायला तिला सांगितले आहे आणि ती हुकूमाची ताबेदार आहे. तिचा मुलगा अभिषेक `इसाई धर्मप्रसारक हेच गरिबांचे तारणहार आहेत’, असा प्रचार करत फिरतो आहे. पैशासाठी अमिताभ कोणतीही भूमिका वठवणारा आहे. यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचे लोकांनी ठरवले असेल, तर त्यांना कसे आवरणार ?
- सुघोष

 |  मित्रांना पाठवा छापील प्रत

  निगडीत वृत्त : शरसंधान

मदरशांचा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समावेश करण्याचा केंद्र सरकारचा विचार

मदरशांतील शिक्षणाला अधिकृत ठरवण्याचे धोरण म्हणजे काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेचे धिंडवडे !

 

आता सर्वत्र उर्दूची सक्‍ती नाही झाली, म्हणजे मिळवले !

नवी दिल्ली, १० सप्टेंबर (प्रे.ट्र.) – मुसलमानांना धर्मशिक्षण देणार्‍या मदरशांचा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समावेश करण्याचा सरकारचा विचार आहे.

(धर्मशिक्षण देणारे मदरसे व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात असलेल्या शाळा यांमधून देण्यात येणार्‍या शिक्षणाचा दर्जा समान कसा असेल ? कोणत्या निकषावर सरकारने हे ठरवले ? – संपादक) आतापर्यंत मदरशांमधून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी प्रशस्तिपत्रके शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातील महाविद्यालये व विद्यापिठे यांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी स्वीकारली जात नव्हती. या मदरशांना `नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल’ या संस्थेशी जोडण्यात येणार आहे. मदरशांमधून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना या संस्थेतर्फे प्रशस्तिपत्रके देण्यात येतील. ही प्रशस्तिपत्रके प्राप्‍त झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातील दहावी व बारावी नंतरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळवता येईल. (मुसलमानांना अशी खास सवलत दिल्यास इतर धर्मियांवर अन्यायच होईल. मुसलमानांना अशी सवलत दिल्यास पुढे ख्रिस्तीही या सवलती मिळाव्यात, अशी मागणी करतील. केवळ एकगठ्ठा मतांसाठी मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या राज्यकर्त्यांना पुढील निवडणुकीत धडा शिकवावा. – संपादक) मुसलमानांना मुख्यत: धार्मिक शिक्षण देणार्‍या या मदरशांना `नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल’ संस्थेने तयार केलेल्या अभासक्रमानुसार विज्ञान, तंत्रज्ञान, भाषा, कला इत्यादी विषय मदरशांमधून शिकवावे लागतील. या विद्यार्थ्यांना इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी, दहावी व बारावी या स्तरांवर प्रशस्तीपत्रके दिली जातील. सच्चर आयोगाने म्हटले आहे, “मुसलमान समाजातील ६ ते १४ वयोगटातील २५ टक्के मुलांनी शाळेत जाणे बंद केले किंवा काही मुले शाळेतच गेलेली नाहीत. पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍या मुसलमान मुलांचे प्रमाण दर २५ विद्यार्थ्यांपैकी एक एवढे आहे, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेणार्‍या मुसलमान विद्यार्थ्यांचे प्रमाण दर ५० विद्यार्थ्यांपैकी १ एवढे आहे.” या म्हणण्याला महत्त्व देऊन सरकारने हा पवित्रा घेतला आहे. याशिवाय मदरशांमधून उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना `विद्यापीठ अनुदान आयोगाकडून’ अशाच प्रकारची प्रशस्तिपत्रके देण्यासाठी काय करता येईल, अशी विचारणा सरकारने या आयोगाकडे केली आहे.

 |  मित्रांना पाठवा छापील प्रत

  निगडीत वृत्त : मुसलमानांच्या लांगूलचालनाची एकही संधी न सोडणारे राजकारणी

अफझलखान वधाच्या देखाव्याला पोलिसांचा विरोध

`सनातन प्रभात’च्या वाचकाकडून पोलिसांचा निषेध

कल्याण (जिल्हा ठाणे), १० सप्टेंबर (वार्ता.) – येथील कासारहाट परिसरातील उदय मित्रमंडळाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने `अफझलखान वध’ या विषयावरील देखावा चलच्चित्र व ध्वनीफीत यांच्या साहाय्याने उभारण्यात आला होता. त्यावर आक्षेप घेत पोलिसांनी मंडळाला तो देखावा काढून टाकण्यास भाग पाडले.

(छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा सत्य इतिहास सांगण्यावर आता खुद्द महाराष्ट्रातच बंदी आली आहे. उद्या शिवरायांचे नाव उच्चारण्यावरही बंदी आली, तर नवल वाटायला नको ! – संपादक) अंबरनाथ येथील `दैनिक सनातन प्रभात’चे क्रियाशील वाचक व धर्माभिमानी हिंदु श्री. कौस्तुभ फाटक हे त्या ठिकाणी दर्शनासाठी आले असता, त्यांना `पोलिसांनी आक्षेप घेतल्याकारणाने आम्ही देखावा हटवत आहोत’, असे लिहिलेला फलक दिसला. तो वाचल्यावर श्री. फाटक यांनी या संदर्भात बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. सुभाष पाटील यांच्याकडे जाऊन स्वत: निषेध नोंदवला. (`दैनिक सनातन प्रभात’चे हिंदु धर्माभिमानी वाचक श्री. कौस्तुभ फाटक यांचे अभिनंदन ! असे धर्माभिमानी हिंदू सर्वत्र हवेत ! – संपादक) त्या प्रसंगी झालेले संभाषण पुढे दिले आहे.
श्री. फाटक : उदय मित्रमंडळाने `अफझलखानाचा वध’ या विषयावर देखावा उभारला. त्यात गैर काय आहे ? शिवाजी महाराजांनी स्वसंरक्षणासाठी त्याचा वध केला होता आणि अफझलखान हा काही कोणी सूफी संत नव्हता.
पोलीस अधिकारी श्री. पाटील : त्या बदल्यात दुसरा देखावा दाखवता आला असता. तोच का ?
श्री. फाटक : आज शिवाजी महाराजांची माहिती देणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस काय चालू आहे ? ओरिसामध्ये काय चालू आहे ? पुढच्या पिढीला घडवण्यासाठी हे सर्व सांगणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (एन्.सी.ई.आर्.टी.च्या) पुस्तकातून चुकीचा इतिहास शिकवला जात आहे. त्यामुळे समाजाला खरे कळले पाहिजे.
पोलीस अधिकारी श्री. पाटील : तुम्ही कोण त्यांचे नातलग लागता का ?
श्री. फाटक : माझे त्यांच्याशी काहीही नाते नाही. मी अंबरनाथ येथे रहातो. दरवर्षी मी येथे माझ्या काकांकडे गणपतीला येतो व मंडळातील गणपतीच्या दर्शनाला जातो. तुम्ही देखावा काढून टाकायला लावला, हे मला खटकले आहे व आवडले नाही. मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही असे करू नका. ही म्हणजे हिंदूंची एक प्रकारे गळचेपी आहे. तुम्ही धर्मनिरपेक्षता म्हणता, तर असे करू नका. यात तसे काही नाही. अफझलखान हा शिवाजी महाराजांना मारायलाच आला होता.
(त्यावर अन्य एक पोलीस कर्मचारी श्री. शिर्के हे श्री. पाटील यांना “बाहेर चला”, असे म्हणाले.)
पोलीस कर्मचारी श्री. शिर्के : बोललात ते बोललात. तुम्ही एकदम साहेबांकडे का जाता ?
श्री. फाटक : मी काही त्यांना घाबरत नाही. तुम्हीपण शिर्के. तुमच्यातपण शिवाजी महाराजांचे रक्‍त आहे. तुम्ही असे घाबरले नाही पाहिजे. मुख्य म्हणजे तिथे कोणाचीही तक्रार नसतांनाही पोलिसांनी असे केले आहे. (अगदी कोणाची तक्रार आली असती, तरीही असे सत्य लपवणे, हे महाराष्ट्राला अशोभनीय आहे ! – संपादक)
श्री. फाटक यांनी `सनातन प्रभात’शी बोलतांना सांगितले, “त्यानंतर मी पुन्हा सायंकाळी उदय मित्रमंडळात गेलो, तर पोलिसांनी कलम १४९ ची नोटीसच बजावली होती. तेथे पोलिसांच्या गाड्या होत्या. तेथील कार्यकर्त्यांनी पोलिसांचा उगाचच विरोध नको, म्हणून देखावा काढून ठेवला होता. प्रथम अफझलखान व दुसर्‍या दिवशी सय्यद बंडा याचा पुतळा काढून टाकला. (आक्रमकांचे एवढे लांगूलचालन केवळ भारतातच होते ! हे असेच चालू राहिले, तर उद्या येथे आक्रमकांचा उदोउदोही होऊ लागेल ! – संपादक) येथे कोणीही तक्रार करू शकत नाही आणि ज्यांचा गणपति होता, त्यांनी त्रास होऊ नये, म्हणून काही केले नाही.” उदय मित्रमंडळाचे श्री. हजारे यांनी पोलिसांना त्या देखाव्याच्या सोबत लावलेली ध्वनीफीत ऐकवली व “तीत काही आक्षेपार्ह नाही. हा तर इतिहासच आहे”, असे सांगितले. आज एका पोलीस अधिकार्‍याने एका मंडळातील देखावा काढला. उद्या त्याचे धारिष्ट्य आणखी वाढून तो प्रत्येक हिंदूला त्रास देईल, असे श्री. फाटक म्हणाले.

 |  मित्रांना पाठवा |    छापील प्रत

  निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!