भारताने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये भेट म्हणून दिले, तर पाकिस्तान ते भारतविरोधी कारवायांसाठी वापरील, अशी शंका सरदार पटेलांनी व्यक्त केली. तेव्हा `आपण नीतीमान रहावे. पाकिस्तान कसा वागेल, याचा विचार करू नये’, असे मत गांधींनी व्यक्त केले होते. आज पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे मुख्य केंद्र आहे. हिंदुद्वेष आणि भारतद्वेष हे पाकिस्तानच्या संरक्षण आणि परराष्ट्र नीतीचे मुख्य सूत्र आहे.
पाकिस्तानचा हिंदुद्वेष कमी करण्यासाठी भारताला स्वसामर्थ्याची चुणूक दाखवावी लागेल.
हिंदूंना त्यांच्या मानसिकतेत क्रांती घडवायची असेल, तर बराक ओबामा काय म्हणतात, ते समजून घ्यायला हवे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ओबामा लढवत आहेत आणि ते निवडून येण्याची शक्यता आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गौप्यस्फोट केला आहे की, दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला जे अब्जावधी डॉलर दिले, ते त्याने भारताविरुद्ध छुपे युद्ध खेळण्यासाठी बाजूला काढून ठेवले. अमेरिकेचे पाकिस्तानला दिलेले जे साह्य आहे, त्याच्या विनियोगावर नियंत्रण नाही. दहशतवाद्यांना त्या देशाने मोकळे रान दिले आहे. मी अध्यक्ष झाल्यावर पाकिस्तानला जाब विचारणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ओबामा यांना हे सांगायला पाहिजे की, भारताकडून गेल्या शंभर वर्षांत रूढ करण्याचा प्रयत्न झालेल्या राजकीय विचारप्रणालीनुसार पाकिस्तानला कोणताही जाब विचारता येत नाही. `पाकिस्तानी मनोवृत्तीचे लोक जे क्रौर्य करतात, ते कुराणप्रणीत धर्मकर्तव्य करत असल्याने ते त्यांना क्षम्य आहे’, असे मोहनदास गांधींनी मोपल्यांच्या बंडात हिंदूंच्या कत्तली झाल्या तेव्हा सांगितले. ती नीती आजपर्यंत भारत पाळत आला आहे. पाकिस्तान निर्माण झाल्यानंतर अडीच महिन्यांत भारतावर काश्मिरात आक्रमण झाले, तरीही भारताने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये भेट म्हणून दिले पाहिजेत, असा आग्रह धरून गांधींनी त्यासाठी आमरण उपोषणास सुरुवात केली. `असे पैसे दिले, तर पाकिस्तान ते भारतविरोधी कारवायांसाठी वापरील’, अशी शंका सरदार पटेलांनी व्यक्त केली. तेव्हा `आपण नीतीमान रहावे, पाकिस्तान कसा वागेल, याचा विचार करू नये’, असे मत गांधींनी व्यक्त केले. या मताचा प्रभाव कायम राहिल्याने पटेलांची माणसे मागे पडून नेहरूंची माणसे पुढे घुसली. परिणामी आज पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे मुख्य केंद्र आहे. हिंदुद्वेष आणि भारतद्वेष हे पाकिस्तानच्या संरक्षण आणि परराष्ट्र नीतीचे मुख्य सूत्र आहे. पाकिस्तानचा जन्मच हिंदु समाज आणि हिंदु संस्कृती नष्ट करून संपूर्ण भारत इस्लाममय करणे, यासाठी झाला आहे. हिंदु संस्कृतीचे रक्षण करण्याचे दायित्व अन्य कोणाहीपेक्षा हिंदु साम्राज्यावर अधिक आहे. गांधी आणि काँग्रेस संस्कृती ज्या लांगूलचालन पद्धतीने हिंदु-मुस्लीम ऐक्य साधू पहात आहे, तिने पाकिस्तानचा हिंदुद्वेष कमी होणार नाही. त्यासाठी भारताला सामर्थ्याची चुणूक दाखवावी लागेल. पाकिस्तानला जी भाषा समजते, त्या भाषेत उत्तर देण्याचे सामर्थ्य भारताच्या सैन्यात आहे; पण गांधीवाद तसे उत्तर देण्याची अनुमती सैन्याला देणार नाही. तशी अनुमती, प्रेरणा आणि साधने, म्हणजे सावरकरवादच होईल. `अमेरिकेचे पाकिस्तानवर नियंत्रण नाही’, असे ओबामा म्हणतात. त्याचा अर्थ हा की, अमेरिकेला तिच्या स्वार्थानुसार लोकशाहीवादी भारताची शक्ती कमी व्हायला हवी आहे आणि धर्मांध पाकिस्तानची शक्ती वाढायला हवी आहे. लोकशाहीपेक्षा आपले वर्चस्व जगावर रहाण्याला अमेरिका महत्त्व देते. मग भारताने का देऊ नये ? येथील मुसलमानांची पाकिस्तानविषयीची आपुलकी नाहीशी करणे गांधीवादाचे काम नाही. त्याची किल्ली सावरकरांच्या विजिगीषू विचारात आहे.
- सुघोष
निगडीत वृत्त : शरसंधान
|



