पाकिस्तान भारताबरोबर युद्धाच्या तयारीत आहे – बराक ओबामा

जे एका अमेरिकी नेत्याला कळते, ते भारतीय राज्यकर्त्यांना का कळत नाही ?

वॉशिंग्टन, ६ सप्टेंबर (प्रे.ट्र.) – भारताशी तीन युद्धे अपमानास्पद परिस्थितीत हरलेला व सध्या राजकीय अस्थिरतेच्या गर्तेत सापडलेला पाकिस्तान पुन्हा भारताशी युद्ध पुकारण्याच्या तयारीत आहे, असा धक्कादायक इशारा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार बराक ओबामा यांनी दिला आहे.

अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारी अब्जावधी डॉलरची लष्करी व आर्थिक मदतच भारताच्या मुळावर उठली आहे, अशी कबुलीही त्यांनी या वेळी दिली. तथापी पाकिस्तानात रुजलेला दहशतवाद मोडून काढण्यासाठी पाकिस्तानवर पूर्णपणे नियंत्रण ठेवू, अशी भूमिकाही त्यांनी या वेळी जाहीर केली. ते फॉक्स वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना बोलत होते. या मुलाखतीत ओबामा यांनी पाकिस्तानच्या युद्धखोर भूमिकेबाबत जळजळीत टीका केली.

 |  मित्रांना पाठवा छापील प्रत

  निगडीत वृत्त : देशाचे वाटोळे करणार्‍या सर्वच राजकीय पक्षांना नष्ट करा !