गांधीनगर, ५ सप्टेंबर (प्रे.ट्र.) – गुजरातमध्ये २०१० साली साजरा होणार्या सुवर्णमहोत्सवी वर्षापर्यंत विद्यार्थ्यांनी गुजरातला प्रगतीपथावर नेण्याची प्रतिज्ञा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना केले.
(शिक्षकदिनाच्या निमित्ताने राज्यातील भावी पिढीला मार्गदर्शन करणार्या श्री. मोदी यांच्याकडून इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोध घ्यावा ! – संपादक) आज शिक्षकदिनाच्या निमित्ताने श्री. मोदी यांचे भाषण दूरदर्शन वाहिनीवरून राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. (५ सप्टेंबर रोजी नव्हे, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिक्षकदिन साजरा करा ! – संपादक) या भाषणात श्री. मोदी म्हणाले, “विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या ध्येयासाठी प्रतिज्ञा करावी, अशी अपेक्षा नाही. तुम्ही छोटे ध्येय ठेवून प्रतिज्ञा केली, तरी राज्याच्या विकासासाठी त्याची मदत होईल. तुम्ही वीज व पाणी वाया घालवणार नाही, तसेच रस्त्यावर केरकचरा करणार नाही, एवढी जरी प्रतिज्ञा केली, तरी त्याचा राज्याला खूप फायदा होईल.”
| मित्रांना पाठवा | छापील प्रत
निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मशिक्षण घ्या!
|


