गणेशोत्सव मंडळांनो, गणेशोत्सवाद्वारे प्रत्येक भागातील हिंदूंना संघटित करून हिंदुत्वाला प्रबळ केले पाहिजे !

१८९४ साली प्रथम लोकमान्य टिळक यांनी पुणे येथील विंचूरकर वाड्यात स्वत: गणपति बसवला आणि सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातून हिंदुसंघटन झाले, तसेच दुभंगलेला व दिशाहीन हिंदु समाज एकत्र येण्यास मदत झाली.
स्वातंत्र्योत्तर काळात सार्वजनिक गणेशोत्सवांचे राष्ट्र व धर्म जागृतीचे ध्येयवादी स्वरूप बदलले. हिंदुसंघटन ही उद्देशपूर्ती मागे पडली व `मनोरंजन’ याच उद्देशपूर्तीला वलय प्राप्त झाले आणि आता डीजे संगीत, वाद्यवृंद, हिडीस नृत्ये यांचा चंगळवाद बळावला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाला गैरप्रकारांच्या भस्मासुराने पछाडले असतांना दुसरीकडे दहशतवाद, धर्मांधांची आक्रमणे यांचेही भयभीत करणारे सावट उभे आहे. गतवर्षी अनेक ठिकाणी धर्मांध मुसलमानांनी गणेशोत्सव मिरवणुकांवर हल्ले केले. काही मुजोर हिंदुद्वेष्ट्यांनी थेट गणेशमूर्तींना दगड मारून त्यांना दुखावण्याचे दुष्कृत्य केले. हे सगळे आघात होत असतांना हिंदु समाज व राज्यकर्ते षंढपणे गप्प होते. या घटना लोकमान्यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश स्वातंत्र्योत्तर काळात निष्फळ ठरल्याच्या द्योतक होत्या. सार्वजनिक गणेशोत्सव हे हिंदु धर्माचे एक अनुष्ठान असून टिळकांनी त्या माध्यमातून हिंदूंच्या जागृत जनशक्तीच्या साहाय्याने राष्ट्र व धर्म सेवेचा यज्ञच आरंभला होता. तथापी सध्या हिंदुसंघटनाचा मूळ उद्देश हरपल्यामुळे ही दु:स्थिती निर्मिाण झाली आहे याचा कोणी अंतर्मुख होऊन विचार का करत नाही ?
हिंदु समाजाला नवचैतन्य देणारा लोकमान्य टिळकांचा सार्वजनिक गणेशोत्सव !
लोकमान्य टिळकांनी `हिंदु लोक धर्माबद्दल उदासीन आहेत. िहिंदु समाज विस्कळीत आहे. भारतीय जनतेमध्ये असलेले अभिजात सामर्थ्य परिस्थितीमुळे सुप्त झाले आहे’, आदी निष्कर्ष गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी मांडले होते. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होऊन ११४ वर्षे लोटली, तरी हिंदु समाजाची स्थिती लोकमान्यांनी वर्णन केल्याप्रमाणेच आहे. ही स्थिती बदलण्यासाठी जातीभेद विसरून राष्ट्रीय व धार्मिक ऐक्यासाठी हिंदूंनी संघटित होणे, हा एकमेव उपाय लोकमान्यांसमोर होता व त्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवांचे हत्यार उचलले. कालौघात या हत्याराला गंज चढला व आता ते निष्कामी झाले आहे, हे उपरोल्लेखित घटनांवरून सुस्पष्ट होते. लोकमान्य टिळकांनी गणेश व शिवजयंती उत्सव सार्वजनिक स्वरूपाचे बनवून हिंदू लोकांत नवचैतन्य निर्माण केले, असे ब्रिटीश अधिकारी श्री. चिरोल याने त्यांच्या पुस्तकात म्हटले होते. लोकमान्य टिळकांनी चालना दिलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने भारतीय स्वातंत्र्याचा संघर्ष तीव्र करण्यास फार मोठी प्रेरणा दिली. उत्तम वक्त्यांच्या आणि देशभक्त हरदासांच्या द्वारे गणपतीच्या आश्रयाने क्रांतीकारक एकत्र करण्याचे काम गणपति उत्सवाने सुलभ झाले, असे डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे या क्रांतीकारकाने लिहून ठेवले आहे. हल्लीच्या गणेशोत्सवांतून असे नवचैतन्य किंवा ध्येयवाद का दिसत नाही ?
हिंदुद्वेष्ट्यांचा हिंदुघातकी इतिहास आणि टिळकांचा तोडगा !
१८९३ साली हिंदु-मुस्लीम दंगली घडल्या. त्याची झळ हिंदूंना बसली. एकट्या मुंबईत ७० हिंदू मारले गेले व ३०० हून अधिक जखमी झाले. धर्मांधांनी हिंदूंची शेकडो मंदिरे नासवली. काँग्रेसच्या एकाही पदाधिकार्याने व ब्रिटिश सरकारने त्याचा साधा निषेध केला नाही. हिंदु असंघटित असल्याने हिंदूंचे हे नुकसान झाले, हे लोकमान्यांनी पुरते ओळखले. `हिंदूंच्या संघटितशक्तीचा आविष्कार दिसला पाहिजे’, असा विचार करणार्या टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना मांडली. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचा उपयोग हिंदुद्वेष्ट्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी केला. गणेशोत्सवांच्या विसर्जन मिरवणुकांतून हिंदू संघटित झाल्याचे सर्वत्र दिसू लागले. तत्कालीन रौलेक्ट समितीच्या प्रतिवृत्तात असे नमूद केले होते की, गणेशोत्सवाच्या १० दिवसांत तरुणांच्या टोळया म्लेंच्छविरोधी पदे म्हणत नगरातून मिरवत असत. याच वेळी हिंदूंना सशस्त्र होण्याला प्रोत्साहन देणारी व शिवाजीप्रमाणे बंड करण्याला चिथावणारी पत्रके विद्यार्थी व इतरही तरुण सर्वत्र वाटत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनो, स्वसंरक्षण पथके निर्माण करा !
धर्मांधांकडून जे पूर्वी घडले, तेच आता घडत आहे. गतवर्षी जळगाव शहरातील बिलाली मशिदीतून धर्मांधांनी विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक केली. या दगडफेकीत श्री गणेशमूर्ती दुखावली होती. याच शहरातील विसर्जन मिरवणूक एका मशिदीजवळून जाते म्हणून ती रोखण्यास धर्मांधांकडून भाग पाडण्यात आले व नंतर रस्ता बदलून ती काढण्यास सांगण्यात आले. गोव्यातील बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालयाजवळ श्री गणेशाची मूर्ती गणेशोत्सवाच्या कालावधीत फोडण्यात आली. सोनई, अहमदनगर येथे गणेशोत्सव मंडळातील श्री गणेशमूती चार मुसलमानांनी रात्रीच्या वेळी फोडली. नवरात्रोत्सवाच्या मिरवणुकीत `मंदिर बनायेंगे’ गाणे वाजवले; म्हणून अचलपूर (अमरावती) येथे मुसलमानांनी दंगल घडवली. तेथील हिंदूंमध्ये धर्मांध मुसलमानांनी एवढी दहशत निर्माण केली की, हजारो हिंदूंना तेथून विस्थापित व्हावे लागले. विस्थापित झालेले हिंदू अनेक दिवस भीतीपोटी परत घरी जाण्यास धजत नव्हते. बीड व औरंगाबाद येथेही अशाच दंगली झाल्या. हिंदू संघटित नसल्याचा हा परिणाम होता. १८९३ च्या काळातील स्थिती व २००७ मधील स्थिती वेगळी आहे, असे कोणालाही म्हणता येणार नाही. तथापी गणेशोत्सवाचे प्रयोजन मात्र शंभर टक्के बदलले आहे व ते हिंदुघातकी आहे ! सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी एकत्र येणार्या हिंदूंनी गणेशोत्सवाच्या मांडणीचे व श्री गणेशमूर्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी घ्यायला हवी ! विसर्जन मिरवणुकांवर होणार्या हल्ल्यांपासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने स्वत:ची स्वसंरक्षण पथके निर्माण केली पाहिजेत. त्यासाठी मंडळातील तरुणांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे. मुंबईत दहशतवाद्यांशी निपटण्यासाठी विविध मंडळांतील १ लाख तरुणांना प्रशिक्षित केले जात आहे. ही बाब स्तुत्य आहेच. असे संपूर्ण महाराष्ट्रात होवो. गणेशोत्सवाद्वारे प्रत्येक भागातील हिंदूंनी संघटित होऊन हिंदुत्वाला प्रबळ केले पाहिजे. हिंदू प्रबळ झाले की, आपसूक हिंदुद्वेष्ट्यांची मुजोरी संपुष्टात येईल !
हे विघ्नहर्त्या, आम्ही तुला शरण आहोत. गणेशोत्सव, गणेशमूर्ती आणि विसर्जन मिरवणूक यांच्याकडे वक्रदृष्टीने पहाणार्यांची दृष्टी कायमची वक्र होईल, यासाठी आमच्याकडून सुयोग्य कृती तूच करवून घे !
| मित्रांना पाठवा | छापील प्रत
|