लता मंगेशकर एक ऋषीतुल्य गायिका

२८ सप्टेंबरला लता मंगेशकर ह्यांनी ८० व्या वर्षात प्रवेश केला. लताबाई म्हणजे समूर्त संगीत आहे आणि त्यावर वाढत्या वयोमानाचा कसलाही उणा परिणाम झालेला नाही. आजही संगीताचा प्रातिनिधिक माणूस म्हणून जगातून एकच एक कलावंत निवडायचा झाला, तर लताबाईंनाच तो मान मिळेल.

 

त्यानंतरचा दुसरा क्रमांकही अन्य कोणाला मिळणार नसून तो धाकटी बहीण आशाबाई ह्यांनाच द्यावा लागेल. लताबाई गेली ६० वर्षे गात आहेत. चित्रपटाला त्यांनी पार्श्‍वगान केले. स्वतंत्रपणे गायन केले. माणसाच्या अभिव्यक्‍ती शास्त्राचे जे प्रकार आहेत, त्यात कंठस्थ गायकी सर्वश्रेष्ठ मानली जाते. ह्या कलेची उपासना लताबाईंनी कशी केली, ह्याचा सगळया भारतियांनी मुद्दाम अभ्यास करावा, इतके ते प्रेरणादायी आहे. सतत ६ दशके गातांना त्यांचा सूर नेहमी शुद्ध लागला. सर्व प्रकारच्या भावभावना समर्थपणे, अचूकपणे आणि काळजाला जाऊन भिडतील, इतक्या स्पष्टपणे त्यांनी गायनातून व्यक्‍त केल्या. सर्व वयोगटांतील कलाकारांना त्यांनी आपला स्वर दिला. खरे सांगायचे, तर प्रत्येक भारतियाला लताबाईंनी स्वरांची सोबत दिली. ह्या देशाचा राष्ट्रवाद, अस्मिता आणि संस्कृती नष्ट करून निराशेचे साम्राज्य सर्वत्र पसरवण्याचा चंग काँग्रेस संस्कृतीने बांधला असतांना लोकांत मिसळून त्यांची उभारी कायम ठेवण्यासाठी ज्या महाभागांनी आपल्या आयुष्याचा होम केला, त्यात लताबाईंचा समावेश आहे. त्यांनी गाणे गायले म्हणून त्यांची सेवा कमी महत्त्वाची ठरत नाही. उलट तीन पिढ्यांना त्यांनी भरवशाची सोबत दिली, हे कार्य ऋषीतुल्य आहे. भारताने आजपर्यंत निर्माण केलेल्या अत्युच्च, सुसंस्कृत, अभिजात, समर्पित, शुद्ध, तेजस्वी आणि शुचिर्भूत माणसांपैकी लताबाई एक आहेत. वयाच्या तेराव्या वर्षापासून आई, तीन बहिणी आणि एक भाऊ ह्यांच्या संसाराचा गाडा ओढण्याचे दायित्व त्यांनी आपल्या अंगावर घेतले आणि कुरकूर न करता, न थकता सगळया भावंडांकडून त्यांनी संगीताची उपासना करून घेतली आणि प्रत्येकाने शिखर गाठले, हे कर्तृत्व दैवी आहे. लताबाई आणि त्यांची भावंडे ह्यांनी संगीत क्षेत्रातील आपल्या अतुलनीय स्थानाचा दुरुपयोग केला नाही, भ्रष्टाचार केला नाही, हपाप दाखवला नाही. ह्याला आई-वडिलांचे संस्कार कारणीभूत आहेत. पिताजी दीनानाथ ह्यांनी संगीताचा वारसा मुलांना दिला. लताबाईंच्या गळयात `गंधार’ आहे आणि हृदयात `सावरकर’ आहे. सर्व मंगेशकर कुटुंब सावरकर विचार संकुलाचा भाग आहे; म्हणून क्रांतीकारकांच्या तेजस्वीपणाने त्यांनी गानकलेची उपासना केली. एक कलाकार आपल्या दैवी गाण्याने ६० वर्षे कोट्यवधी लोकांना जगण्याचा हुरूप देतो, असा पराक्रम आजपर्यंत जगात कोणत्याही गायकाने केलेला नाही. लता गाते आणि तिच्यातून घराघरातला प्रत्येक जण गात असतो, असा हा खेळ ६० वर्षे चालला आहे. लता म्हणजे मंत्रमुग्ध करणारी, पण अगदी साधीसुधी अनलंकृत देवता आहे. तिने शतायुषी व्हावे ! भारत पुन्हा अखंड झालेला पहावा, ही महादेवापाशी प्रार्थना !
- सुघोष

  निगडीत वृत्त : शरसंधान

उद्योगपती भवरलालजी जैन यांनी अंनिसच्या व्यासपिठावरच दिले डॉ. दाभोलकरांना श्रद्धेचे धडे !

धर्मद्रोह पसरवणार्‍या अंनिसच्या परिषदेतच डॉ. दाभोलकर यांना खडे बोल सुनावणारे श्री. भवरलालजी जैन यांचे अभिनंदन !

 

अंनिसची वैज्ञानिक दृष्टीकोन व अंधश्रद्धा निर्मूलन शैक्षणिक जाहीरनामा स्वीकृती परिषद

 

हिंदूंनो, या यशाबद्दल ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्‍त करा !

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्वत:च्या कार्याद्वारे समाजात अंधश्रद्धा निर्माण केली आहे. श्रद्धा व अंधश्रद्धा यांतील फरक ओळखण्यासाठी कुठल्याही सीमारेषा नाहीत, हे त्यांना माहीत नाही. दृश्याची संवेदना जाणण्यासाठी प्रत्येक कृती व व्यक्‍ती यांना अध्यात्माची जोड आवश्यक आहे.

 

नरेंद्र दाभोलकर यांनी कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील, असे वक्‍तव्य करू नये, अशा शब्दांत जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष पद्मश्री श्री. भवरलालजी जैन यांनी त्यांचे मित्र असलेल्या डॉ. दाभोलकर यांना समज दिली. श्री. जैन पुढे म्हणाले, “हिंदु धर्माची संस्कृती महान आहे. ही संस्कृती कोणीही नष्ट करू शकत नाही. या संस्कृतीला हजारो वर्षांचा इतिहास असल्याने तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अंनिसच्या या राज्यव्यापी परिषदेतील स्वीकृत जाहीरनाम्यास माझा पूर्ण पाठिंबा नसून अंशत: पाठिंबा आहे. श्रद्धा व परमेश्‍वर यांचे अस्तित्व मी स्वत: मानतो. बाकी कुठल्याही गोष्टीवर माझा विश्‍वास नाही. अंधश्रद्धा काय व ती कशी आहे, यापेक्षा श्रद्धा किती महत्त्वाची आहे, हे आपल्याला दिसून येते. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी माझे मित्रत्वाचे संबंध आहेत; पण त्यांनी या कार्यक्रमाविषयी मला पूर्णत: अंधारात ठेवले.”

शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके, देवीसिंग शेखावत परिषदेला अनुपस्थित
जळगाव, २८ सप्टेंबर (वार्ता.) – येथे कालपासून सुरू असलेल्या `वैज्ञानिक दृष्टीकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यांचा शैक्षणिक जाहीरनामा स्वीकृती परिषदे’ला आज दुसर्‍या दिवशीही नियोजित प्रमुख पाहुण्यांपासून श्रोत्यांचाही अल्प प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे अध्यक्ष डॉ. देवीसिंग शेखावत व शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके हे प्रमुख पाहुणे या कार्यक्रमास अनुपस्थित होते. दुसरीकडे कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रसिद्ध उद्योगपती पद्मश्री श्री. भवरलालजी जैन यांनी व्यासपिठावरच डॉ. दाभोलकर यांना श्रद्धेचे धडे दिले. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांनी या परिषदेला केलेल्या तीव्र विरोधाला मोठे यश मिळाले. या वेळी काँग्रेसचे माजी आमदार श्री. गुलाबराव पाटील, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अजित वाघ व `लातूर पॅटर्न’चे जनक श्री. किशोर पाटील हे उपस्थित होते. (अंनिसच्या धर्मद्रोहात सहभागी होणार्‍यांचा निषेध ! – संपादक)

अंनिसची `स्मशानयात्रा’ रद्द ?
आज अंनिसच्या वतीने रात्री ९ ते १ या वेळेत स्मशानयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तथापी दोन दिवसांच्या या परिषदेला झालेल्या प्रचंड विरोधानंतर या उपक्रमाला आज पोलिसांनी संरक्षण नाकारल्याने हा उपक्रम रद्द करण्यात आला, असे अंनिसच्या एका सदस्याने सांगितले.त्यामुळे स्मशानयात्रा होणार कि नाही याविषयी प्रश्‍नचिन्ह आहे.

क्षणचित्रे : या वेळी उपस्थित पत्रकार म्हणाले, “या परिषदेला झालेला विरोध व आज व्यासपिठावरच उद्योगपती श्री. भवरलालजी जैन यांनी मांडलेले मुद्दे, यांमुळे हिंदुत्ववाद्यांनी एक मोठा विजय मिळवला !”

 

  निगडीत वृत्त : असे धर्माभिमानी हिंदू सर्वत्र हवे

दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे ! – नरेंद्र मोदी

अमेरिकेला भारतापुढे लोटांगण घालायला लावण्याचे स्वप्न पहाणार्‍या मोदींप्रमाणे देशात किती राज्यकर्ते आहेत ?

मुंबई, २७ सप्टेंबर (वार्ता.) – मूर्ख माणसे दहशतवाद्यांना संदेश देतात. त्यांच्याविरोधात प्रत्यक्ष कृती केली पाहिजे. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे, असे रोखठोक विचार गुजरातचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्‍त केले. मतपेढीचे राजकारण करून दहशतवाद्यांना मदत करणारेच कडक कायदा करण्यास विरोध करत असल्याचा आरोपही श्री. मोदी यांनी केंद्रातील काँग्रेसच्या आघाडी सरकावर या वेळी केला. `आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीवरील `सीधी बात’ या कार्यक्रमात श्री. प्रभू चावला यांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीत श्री. मोदी बोलत होते.

श्री. मोदी यांनी देशातील दहशतवाद चिरडून टाकण्यासाठी विचारलेल्या प्रश्‍नांवर परखड विचार मांडले. ते म्हणाले, “दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी `जशास तसे’ उत्तर दिले पाहिजे. तशी मानसिकता देशात तयार करण्याची आवश्यकता आहे. बाँबस्फोटांत निर्दोष व्यक्‍तींचा मृत्यू होतो; मात्र त्यांचा जीव वाचवण्याऐवजी दोषी असणार्‍यांची बाजू घेणारे दहशतवाद रोखण्यासाठी कडक कायदे करण्यास विरोध करत आहेत. ते कायदा होऊच देत नाहीत. “हा कसला न्याय आहे”, असा संतप्‍त प्रश्‍न श्री. मोदी यांनी केला. ते पुढे म्हणाले, “कायदा असूनही हत्या होतात, विनातिकीट प्रवास केला जातो; म्हणून त्यासंदर्भातील कायदे रद्द करण्याची मागणी कोणीही करत नाही, मग निर्दोष लोकांवर कारवाई झाल्याच्या नावाखाली `पोटा’सारखा कायदा का रद्द करण्यात आला ? गुजरात राज्याने तयार केलेल्या दहशतवादविरोधी कायद्याला केंद्रातील सरकार परवानगी का देत नाही ? जगातील प्रत्येक देशात कठोरातील कठोर कायदे आहेत. मानवाधिकाराचा ठेका घेतलेल्या देशांतही असे कायदे असतांना आपल्या देशातच असा विरोध का होत आहे ? (कारण मुसलमानांच्या मतांची या राज्यकर्त्यांना भीती वाटते. देशहितापेक्षा मतांचा विचार करणार्‍या अशा स्वार्थांध राज्यकर्त्यांच्या हातात देश सुरक्षित राहील काय ? त्यामुळे अशा स्वार्थी राज्यकर्त्यांना जनतेने निवडणुकीत कायमचेच घरी बसवावे. – संपादक) १९ व्या शतकातील कायद्याच्या आधारे आपण २१ व्या शतकातील `हायटेक’ दहशतवादाच्या विरोधात कसे लढणार आहोत”, असे परखड व मर्मभेदी प्रश्‍न विचारत श्री. मोदी यांनी, मतपेढीचे राजकारण करून दहशतवादाला मदत करणारेच या कायद्याला विरोध करत असल्याचा आरोप या वेळी केला. या वेळी श्री. मोदी यांनी देशात `इंडियन इंटेलिजन्स सर्व्हीस’ यासारखी पूर्णपणे व्यावसायिक स्तरावर काम करणारी गुप्‍तचर संघटना स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. गुजरातमध्ये आम्ही `फोरेन्सिक सायन्स इंटेलिजन्स’ असे विद्यापीठ तयार करत आहोत. तसेच `रक्षाशक्‍ती’ या नावाने विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण देण्याची व्यवस्थाही निर्माण करत असल्याचे त्यांनी सांगितले. (अशा प्रकारे दूरदृष्टी ठेवून राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने योजना आखण्याचा विचार देशातील एका तरी मुख्यमंत्र्याने केला आहे का ? – संपादक)

अमेरिकी लोकांनी भारताकडे `व्हिसा’ मागावा, असा भारत घडवण्याचे स्वप्न – नरेंद्र मोदी
मी कधीही अमेरिकेकडे `व्हिसा’ मागितलेला नाही. मी भारताला खूप मोठे बनवण्याचे स्वप्न पहाणारा व्यक्‍ती आहे. त्यामुळे मी अमेरिकेकडे व्हिसा मागण्याऐवजी देशालाच एवढे मोठे करीन की, अमेरिकन लोकांनी भारत पहाण्यासाठी आमच्याकडे व्हिसा मागावा, असे जाज्वल्य राष्ट्रप्रेमाचे विचार श्री. मोदी यांनी त्यांना अमेरिकेने दोन वेळा नाकारलेल्या `व्हिसा’वरील प्रश्‍नावर उत्तर देतांना काढले. (असा स्वाभिमान किती भारतीय राज्यकर्त्यांमध्ये आहे ? – संपादक)

फटाक्यांद्वारे होणार्‍या देवतांच्या विटंबनेबाबत हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार ! – रामदास कदम

मुंबई, २६ सप्टेंबर (वार्ता.) – गणेशोत्सव, दिवाळी आदी सणांच्या वेळी हिंदूंच्या देवता व राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची सर्रास विक्री होते. हे फटाके फोडल्यावर त्यांवरील वेष्टनाच्या चिंधड्या उडतात. त्यामुळे देवता व राष्ट्रपुरुष यांची विटंबना होते. या विटंबनेच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती गेली पाच वर्षे शासनाकडे निवेदनाद्वारे `देवता व राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके उडवण्यावर बंदी घालावी’, अशी मागणी करत आहे.

या वर्षी हिंदु जनजागृती समितीतर्फे विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री. रामदास कदम यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी त्याची दखल घेत तातडीने स्वत:च्या `लेटरहेड’वर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, व्यापारचिन्ह विभाग व मुंबई महापालिकेचे आयुक्‍त यांना पत्र पाठवले आणि अशा फटाक्यांवर बंदी घालण्यासाठी तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस केली. याचबरोबर “या संदर्भात आतापर्यंत शासनातर्फे काय कारवाई झाली, याचा येत्या हिवाळी अधिवेशनात मी सरकारला जाब विचारणार आहे”, असे आश्‍वासनही श्री. कदम यांनी दिले. (देवता व राष्ट्रपुरुष यांच्या विटंबनेच्या विरोधात तत्परतेने कृती करणारे असे हिंदु नेते सर्वत्र हवेत ! – संपादक) हिंदु जनजागृती समितीतर्फे देवता व राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांवर बंदी घालावी म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री, उद्योगमंत्र्यांचे खाजगी सचिव श्री. राजीव निवटीकर, उद्योग महासंचालनालयाचे अधिकारी श्री. राठोड, मुंबई महापालिकेचे आयुक्‍त डॉ. जयराज फाटक आणि व्यापारचिन्ह विभागाचे सहनिबंधक यांना निवेदने देण्यात आली आहेत. निवेदने देतांना शिष्टमंडळात समितीचे मुंबई, ठाणे व रायगड या जिल्ह्यांचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर, सदस्य सर्वश्री प्रकाश करंदीकर, सदानंद पांचाळ, मिलिंद पोशे व अन्य सदस्य उपस्थित होते.

छत्रपतीद्रोही वन खाते म्हणते, `शिवाजीने विश्‍वासघाताने अफजलखानाचा खून केला !

शिवरायांना विश्‍वासघातकी म्हणून इतिहास बदलायला निघालेल्या वन खात्याचा निषेध !

हिंदूंनो, प्रथम महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारच्या पोलीस खात्याने
अफझलखानाच्या वधाच्या देखाव्यावर बंदी घातली. आता याच सरकारचा वन विभाग छत्रपती शिवरायांना विश्‍वासघातकी म्हणत आहे. लवकरच काँग्रेस सरकार छत्रपती शिवरायांना खलपुरुष ठरवून अफझलखानाचा उदोउदो करण्यास सुरुवात करील. अशा काँग्रेसचा राजकारण व समाजकारण या क्षेत्रांवरील प्रभाव शून्य होण्यासाठी दररोज १० मिनिटे प्रार्थना आणि नामजप करा !

पुणे, २५ सप्टेंबर (वार्ता.) – सातारा वन विभागाने राज्यशासनाला पाठवलेल्या एका अहवालात `शिवाजीने विश्‍वासघाताने अफझलखानाचा खून केला’, असे लिहिले आहे, ही गंभीर बाब माहितीच्या अधिकाराखाली उघडकीस आली आहे. (छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातीलच वन विभाग छत्रपतींचा एकेरी उल्लेख करतो व छत्रपतींच्या शौर्याचा उपमर्द करतो, हे पाहून या महाराष्ट्रावर राज्य करणारे अफझलखानाचे वंशज आहेत का, असा प्रश्‍न हिंदूंना पडल्यास नवल वाटायला नको ! – संपादक) याबाबतची माहिती प्रतापगड उत्सव समितीचे श्री. मिलिंद एकबोटे, श्रीमती विजयाताई भोसले, अखिल भारतीय मराठा विकास परिषदेचे अध्यक्ष कर्नल जयवंतराव बाजी-मोहिते यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रतापगड उत्सव समितीचे श्री. राज यादव, लाल महाल उत्सव समितीचे श्री. चंद्रशेखर शिंदे आदी धर्माभिमानी उपस्थित होते. प्रतापगड येथील अफझलखानाच्या थडग्याभोवतीच्या अनधिकृत बांधकामांबाबत राज्यशासनाने महसूल खाते व वन विभाग यांच्याकडून अहवाल मागवला होता. त्यानुसार वन विभागाने पाठवलेल्या अहवालात सदर आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला आहे. या वेळी श्री. एकबोटे म्हणाले, “महाराष्ट्रावर वार करणार्‍या अफझलखानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी धडा शिकवला, हा इतिहास आहे. असे असतांना छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणे व `शिवाजीने विश्‍वासघाताने अफझलखानाचा खून केला’, असे म्हणणे, हे सरकारच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. शासनाने सरकारी कागदपत्रांवर शिवाजी महाराजांना अत्यंत खालच्या पातळीवर आणून ठेवणे, ही निषेधार्ह व लाजीरवाणी बाब आहे. त्यामुळे एकीकडे अरबी समुद्रात शिवरायांचा पुतळा उभा करायला निघालेल्या व दुसरीकडे त्याच शिवरायांना खुनी ठरवणार्‍या सरकारचा निषेध कसा करायचा, ते आता जनतेनेच ठरवावे.”
कर्नल जयवंतराव बाजी-मोहिते यांनीही शासनाचा निषेध केला. ते म्हणाले, “शिवाजीने विश्‍वासघाताने अफझलखानाचा खून केला’, असे म्हणणे हे आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे. इतिहासाचा विपर्यास करणार्‍या सरकारला याबाबत जनतेने जाब विचारणे आवश्यक आहे.” श्रीमती विजयाताई भोसले यांनीही सरकारचा निषेध करून आपण अनेकदा मागूनही सदर अहवाल आपल्याला देण्यात टाळाटाळ करण्यात आली, असे सांगितले.
या अहवालात `शिवाजीने अफझलखानाचे डोके जाळले’, अशा आशयाचाही मजकूर आहे, असे सांगून श्री. एकबोटे म्हणाले, “अफझलखानाचे धड प्रतापगडाच्या पायथ्याशी पुरण्यात आले आणि त्याचे डोके जिजामातांना दाखवण्यासाठी राजगडावर पाठवण्यात आले, हा इतिहास आहे. यावरून सरकारचा इतिहास किती कच्चा आहे, हे स्पष्ट होते.”

वन विभागाचा अहवाल इंग्रजीतून !
वन विभागाने राज्यशासनाला पाठवलेला अहवाल हा इंग्रजीतून असल्याचेही उघडकीस आले आहे. (काँग्रेस सरकारचे अक्षम्य अपराध ! – संपादक) माहितीच्या अधिकाराखाली वरील मान्यवरांनी मिळवलेल्या सदर अहवालाच्या प्रती इंग्रजीतून आहेत. त्यामुळे एकीकडे सबंध राज्यकारभार मराठीत करायला निघालेल्या सरकारला
त्याच्याच इंग्रजाळलेल्या वन विभागाबाबत काय म्हणायचे आहे, असा प्रश्‍न मराठीप्रेमींकडून उपस्थित करण्यात आला आहे.

 

  निगडीत वृत्त : इतिहासद्रोही राज्यकर्ते

गोध्रा हत्याकांडाचा कट मुसलमानांचाच !

नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी पूर्णत: निर्दोष !

गांधीनगर, २५ सप्टेंबर (प्रे.ट्र./वृत्तसंस्था) – साबरमती एक्स्प्रेसचा डबा जाळण्याची घटना हा पूर्वनियोजित कट होता व तो मौलवी उमरजी याने रचला होता, असे नानावटी आयोगाने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

 

(मुसलमान हे हिंदूंच्या जिवावर उठले आहेत, हे या अहवालाने पुन्हा एकदा स्पष्ट झाले. – संपादक) गोध्रा हत्याकांडाचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जी.टी. नानावटी यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला होता. आज आयोगाने त्याचा पहिला अहवाल विधानसभेमध्ये सादर केला. हा अहवाल सादर होताच काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. (हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसकडून यापेक्षा आणखी कसली अपेक्षा करणार ? – संपादक) गोध्रा हत्याकांड घडवून गुजरातमध्ये दहशत पसरवणे व प्रशासन खिळखिळे करण्याचा मौलवी व त्याच्या सहकार्‍यांचा डाव होता. गोध्रा हत्याकांड व त्यानंतर उसळलेल्या दंगली यांमधील पीडितांना संरक्षण देण्यास अथवा त्यांचे पुनर्वसन करण्यास मोदी सरकार कुठेही कमी पडले नाही, असेही आयोगाने म्हटले आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सूचनांप्रमाणेच दंगलग्रस्तांचे पुनर्वसन झाले, असेही आयोगाने म्हटले आहे. साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्यासाठी १४० लीटर पेट्रोल वापरण्यात आले, असे आयोगाने स्पष्ट केले. साबरमती एक्स्प्रेसचे सर्व डबे पेटवण्याचा मुसलमानांचा कट होता; मात्र ही योजना यशस्वी झाली नाही. गोध्रा हत्याकांडामध्ये ५९ जण ठार झाले होते. रेल्वेमंत्री श्री. लालूप्रसाद यादव यांनी गोध्रा हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यु.सी. बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. “गोध्रा हत्याकांड हा घातपात नसून अपघात होता”, असा अहवाल या समितीने सादर केला होता. नानावटी आयोगाने अहवाल सादर केल्यानंतर न्या. बॅनर्जी यांनी गोध्रा हत्याकांड हा घातपात नसून अपघात होता, याचा पुनरुच्चार केला. (निवळ मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी लालूप्रसाद यादव यांनी बॅनर्जी यांना हाताशी धरून त्यांना हवा तसा अहवाल तयार करून घेतला, हे अनेक मुद्यांवरून यापूर्वी स्पष्ट झाले आहे. – संपादक)

नानावटी आयोगाने दिलेले दाखले
१. साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार शौकत लालू व महंमद लतिका यांनी एस् ६ व एस् ७ या डब्यांचे दरवाजे उघडले. एस्-६ डब्यामध्ये हसन लालू याने आग लावली. मौलवी उमरजी याने साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्याचा कट रचला व त्यामध्ये रज्जाक कुरकूर, सलीम पानवाला, शौकत अली, इम्रान शेरी, रफीक बटूक व सिराज बाला हे सहभागी झाले होते.
२. साबरमती एक्स्प्रेसचे डबे जाळल्यानंतर मुसलमानांनी १० ते २० मिनिटे दगडफेक केली व डब्यातील प्रवाशांना बाहेर येण्यापासून मज्जाव केला, अशी साक्ष गाडीतील प्रवाशांनी दिली.
३. रज्जाक कुरकूर व सलीम पानवाला यांनी गाडीला आग लावण्यासाठी १४० लीटर पेट्रोल खरेदी केले.
४. गोध्रा येथील अमन गेस्ट हाऊसमध्ये साबरमती एक्स्प्रेस जाळण्याचा कट रचण्यात आला.

हिंदुद्वेष्ट्या काँग्रेससह माकप व तिस्ता सेटलवाड यांना पोटशूळ !
नवी दिल्ली – नानावटी आयोगाने सादर केलेल्या अहवालावर काँग्रेसने नाराजी व्यक्‍त केली. “नानावटी आयोग ज्या परिस्थितीत स्थापन करण्यात आला, अहवाल सादर करण्यासाठी तारखांवर तारखा वाढवण्यात आल्या, अनेक साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या, या सर्व गोष्टींमुळे अहवालाच्या निष्कर्षांबद्दल मनात संशय निर्माण होतो”, असे काँग्रेसचे प्रवक्‍ते श्री. अभिषेक सिंघवी यांनी सांगितले. हा अहवाल म्हणजे फार्स आहे, असे वक्‍तव्य तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या व मुसलमानांच्या पाठीराख्या श्रीमती तिस्ता सेटलवाड यांनी केले. “पुढील निवडणुकांवर लक्ष ठेवून मते मिळवण्यासाठी भाजपने हा कट रचला आहे”, असे त्या म्हणाल्या. “नानावटी आयोगाने सादर केलेला अहवाल हा पक्षपाती आहे. या आयोगाच्या निष्कर्षांना विरोध करणार”, असा कांगावा माकपचे श्री. गुरूदास दासगुप्‍ता यांनी केला.

ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना अटक हे काँग्रेस सरकारचे महापाप ! – श्री. रमेश शिंदे, महाराष्ट्र राज्य प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती

ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना झालेली अटक, हे काँग्रेस सरकारने केलेल्या अनेक पापांच्या शृंखलेतील महापाप आहे. औद्योगीकरणाच्या नावाखाली या सरकारने आतापर्यंत शेतकर्‍यांना नाडले व आता ते हिंदु संतांना छळत आहे. ह.भ.प. बंडातात्या यांच्यावर पोलिसांनी दरोडेखोरी, जाळपोळ यांसारखे गुन्हे दाखल केले, हे तर अगदीच भयंकर आहे. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात संतांची अशी अवहेलना केली जाते, हे महाराष्ट्रातील सश्रद्ध हिंदू कधीही खपवून घेणार नाहीत.

ह.भ.प. बंडातात्या यांची अटक हा केवळ वारकर्‍यांपुरता मर्यादित विषय नाही, तर समस्त हिंदूंना संताप आणणारे ते कुटील कारस्थान आहे. ते हाणून पाडण्यासाठी वारकर्‍यांनी उभारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात हिंदु जनजागृती समिती सर्व शक्‍तीनिशी ह.भ.प. बंडातात्या यांच्या मागे उभी आहे. संत तुकाराम महाराजांच्या तपश्चर्येचे ठिकाण असलेला भामचंद्र डोंगर तोडून त्या ठिकाणी महाप्रदूषणकारी `डाऊ’ प्रकल्प उभारण्यास समितीचा तीव्र विरोध आहे. `डाऊ’ ही रासायनिक कंपनी उभारण्यास ५३ देशांनी नकार दिला आहे. वास्तविक ही कंपनी अमेरिकेची; पण अमेरिकेनेही प्रदूषणाचे कारण देऊन `डाऊ’ला अमेरिकेत प्रयोगशाळा उभारण्यास नकार दिला. भोपाळमध्ये वायूगळतीमुळे हजारो लोकांचे प्राण घेणारा व लाखो लोकांना विकलांग करणारा `युनीयन कार्बाईड’ प्रकल्प `डाऊ’ने विकत घेतला आहे. तीन दशके होऊनही भोपाळ दुर्घटनेची तेथील लोकांची जखम आजही भळभळती आहे. प्रदूषण काय असते, हे भोपाळमधील जनतेने अनुभवले आहे. त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात करण्याची पूर्वतयारी `डाऊ’च्या माध्यमातून सुरू असेल, तर ती राज्यकर्त्यांची वैचारिक दिवाळखोरी आहे. जगाने नाकारलेला संगणक कचरा व टाकाऊ वस्तू, भंगारात निघालेल्या जहाजांची प्रदूषणकारी विल्हेवाट, जगात कुठेही न चालणारी औषधे व आता जगाने नाकारलेले प्रदूषणकारी प्रकल्प, हे सर्व भारतात येतात. राज्यकर्त्यांच्या धोरणांमुळे भारत आज अक्षरश: `जागतिक उकीरडा’ बनला आहे. एरव्ही होळीला लाकूड जाळल्यावर `पर्यावरणाचा र्‍हास होतो’ असे म्हणणारे व श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे `पाणी प्रदूषित होते’ म्हणून शंख करणारे पर्यावरणवादी अशा प्रदूषणकारी प्रकल्पांना विरोध करण्यासाठी काहीही करत नाहीत. यासाठी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्यासारखे संत काहीतरी कृती करतात, तर सरकार त्यांना धाकदपटशा दाखवून तुरुंगात टाकते. ही लोकशाही आहे कि हुकूमशाही ? `डाऊ’ प्रकल्प होऊ नये, यासाठी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी सर्व सनदशीर मार्गांचा अवलंब केला; पण सरकारने त्यांच्या भावनांना जुमानले नाही. सरकार हिंदूंच्या भावनांचा आदर करत नाही, हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. हिंदूंची आंदोलने कशी असावीत, याचा आदर्श जम्मूतील हिंदूंनी अमरनाथ भूमी प्रश्‍नाच्या निमित्ताने आम्हा हिंदूंना घालून दिला आहे. `डाऊ’सारख्या संस्कृतीचा विध्वंस करणार्‍या उद्योगांना हाकलण्यासाठी हिंदूंनी अशाच संघटित शक्‍तीचा प्रत्यय सरकारला पुन्हा एकदा आणून देण्याची गरज आहे. काँग्रेस सरकार स्वत:ला लोकशाहीच्या मार्गाने चालणारे सरकार समजत असेल, तर रायगडमधील `सेझ’ प्रश्‍नावर जशी तेथील शेतकर्‍यांची मते जाणून घेतली, तसा `डाऊ’ प्रकल्पाच्या बाबतीतही वारकर्‍यांच्या भावनांचा आदर सरकारने केला पाहिजे, तसेच ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्यावरील सर्व आरोप मागे घेऊन त्यांची सन्मानाने मुक्‍तता केली पाहिजे, अन्यथा येत्या निवडणुकांत हिंदुरोषाच्या झंझावातात काँग्रेस सरकार पालापाचोळयाप्रमाणे उडून जाईल !

आतंकवाद आणि मुलायमसिंग

मुलायमसिंग आणि लालूप्रसाद ही जोडी जन्माने हिंदु आहे. जयप्रकाश नारायण यांच्यापासून प्रेरणा घेऊन राजकारणात प्रवेश केल्याचे दोघे कधीतरी सांगत असतात; परंतु एखाद्या `मॉल’मधून चक्कर मारून आल्यासारखे हे दोघे जयप्रकाशजींच्या सहवासात वावरल्यासारखे वाटते. दोघांनीही त्यांच्यासाठीच ही सृष्टीची रचना झाली आहे, असा दर्पयुक्‍त समज करून घेतला आहे. त्यामुळे त्यांना भ्रष्टाचार वाटत नाही. त्यांनी मोडावेत म्हणून या देशात कायदे बनवले जातात, अशी त्यांची प्रामाणिक धारणा आहे.

 

गुणी मुलाचा सावत्र बापाकडून छळ होतो, तसा पाकिस्तान आणि या देशातले मुसलमान यांच्यावर हिंदूंकडून अन्याय होतो, असे फार पूर्वी जयप्रकाशजींना वाटत असे; पण आणीबाणीत रा.स्व. संघाच्या सहवासात ते आले आणि ज्या शिस्तीने, निस्पृहपणे, मोठ्या संख्येने देशव्यापी लढा संघाने दिला, तो पाहून त्यांचे मतपरिवर्तन झाले. `संघ फॅसिस्ट असेल, तर मीही फॅसिस्ट आहे’ इतके ते समरस झाले. तेवढे मुलायम आणि लालूजींनी होण्याची आवश्यकता नाही; पण त्यांनी हिंदुविरोधी आणि पाकिस्तानवादी होण्याचीही आवश्यकता नाही. या दोघांकडून आतंकवादाला आळा घालण्याच्या दृष्टीने ठोस कृती होत नाही, असा समज आहे. तो समज खरा असावा, असे उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी अलीकडे जे वक्‍तव्य केले आहे, त्यावरून वाटते. मायावतींच्या माहितीनुसार देशात सर्वाधिक प्रमाणात आतंकवाद कोठे बोकाळला असेल, तर तो उत्तरप्रदेशात आहे आणि त्याला मुलायमसिंग सत्तेवर होते तो काळ कारणीभूत आहे. उत्तरप्रदेशात आतंकवादी प्रवृत्तींनी स्वत:चे बस्तान बसवायला सुरुवात केली तेव्हा मुख्यमंत्री मुलायमसिंग यांनी हस्तेपरहस्ते त्यांना सहकार्य केले, असा आरोप मायावतींनी केला आहे. उत्तरप्रदेशच्या एकूण ३४ जिल्ह्यांत आतंकवाद्यांनी खोलवर जाळे विणले आहे. जर मायावतींचे आरोप तथ्यपूर्ण असतील, तर मुलायमसिंग यांची जागा कारागृहात आहे, हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे. केंद्र सरकार या आरोपांची चौकशी करणार नाही आणि मुलायमसिंग कारागृहात बंद होणार नाहीत; कारण मुसलमानांविषयी सरकारचे धोरण अत्यंत उदार असून जोपर्यंत मुसलमान आतंकवाद करत नाहीत, तोपर्यंत सरकार दुर्लक्ष करील. हिंदू आतंकवादी होतील तेव्हा सरकार कडक उपाय योजील; पण हिंदूंना आतंकवादी बनवण्याची आवश्यकता नाही. त्यांची संख्या हेच त्यांचे मोठे शस्त्र होऊ शकते. हे शस्त्र वापरून पाकिस्तानी प्रवृत्ती आणि काँग्रेस संस्कृती यांचा सार्वत्रिक निवडणुकीत हिंदूंना पराभव करता येईल !
- सुघोष

  निगडीत वृत्त : शरसंधान

मुंबई महापालिकेच्या दीनानाथ नाट्यगृहात चालते हिंदूंच्या धर्मांतरासाठी येशूची प्रार्थना !

धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्यांना रोखण्यासाठी धर्मांतरबंदीचा कायदा करण्यास सरकारला भाग पाडा !

मुंबई, २१ सप्टेंबर (वार्ता.) – विलेपार्ले (पू.) येथील मुंबई महानगरपालिकेच्या दीनानाथ नाट्यगृहात `जिझस क्रिस्ट ऑफ नाझारेथ मिनिस्ट्री’, मुंबई ख्रिस्ती मिशनरी यांच्यातर्फे काल येशूची प्रार्थना आयोजित करण्यात आली होती.

 

(हिंदुत्ववादी शिवसेनेची सत्ता असणार्‍या महापालिकेच्या दीनानाथ नाट्यगृहात हिंदूंचे फसवून धर्मांतर करण्याचा ख्रिस्त्यांचा कुटील डाव सुरू आहे. शिवसेनेने हे थांबवावे, अशी हिंदूंची रास्त अपेक्षा आहे ! – संपादक) त्यामध्ये बहुतांश करून धर्मांतरीत झालेले तेलगु भाषिक हिंदू आणि धर्मांतरीत होण्याच्या मार्गावर असलेले तेलगु भाषिक हिंदु सहभागी झाले होते. पाद्री के. शामकिशोर यांच्या नेतृत्वाखाली ही प्रार्थना घेण्यात आली.या प्रार्थनेसाठी मोफत प्रवेश देण्यात येत होते. प्रार्थनेसाठी येणार्‍या भोळयाभाबड्या हिंदूंच्या हातात बायबलच्या तीन प्रती मोफत दिल्या जात होत्या. त्याचे वाचन करण्याचा आग्रह धरला जात होता. (हिंदूंनो, या हजारो हिंदूंना धर्मांतरापासून वाचवण्यासाठी आणि तुमचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धर्मशिक्षण घ्या आणि धर्मशिक्षण द्या ! – संपादक) प्रार्थनेसाठी सभागृहात आलेल्यांना पाद्री येशूचे गुणगान गाऊन त्यांना “येशूची प्रार्थना करा, त्याने सर्व सुख-दु:खे दूर होतील”, असे सांगत होते. बायबलमधील उतारे वाचून “आपण जर असाच धर्मप्रसार सुरू ठेवला तर सहा महिन्यांनी आपल्याला धनलाभ होतो”, असेही या वेळी सांगण्यात आले. (हिंदूंना धनाचे आमिष दाखवून धर्मांतर करण्याची ख्रिस्त्यांची ही चाल जुनीच आहे. हिंदूंनो, धर्मांतराच्या विरोधात राज्यात कडक कायदे करण्यास सरकारला भाग पाडा ! – संपादक) पाद्री बायबलमधील काही भाग इंग्रजी भाषेत वाचून दाखवत, त्यानंतर त्याचे हिंदी व तेलगु या दोन भाषांत भाषांतर करून सांगितले जात होते. दीनानाथ नाट्यगृह हे महापालिकेच्या मालकीचे आहे. या सभागृहात आणि विशेषत: विलेपार्ले या ठिकाणी ख्रिस्ती मिशनरी धर्मांतराचा उपक्रम राबवत आहेत. यामुळे महापालिकेच्या प्रतीही स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्‍त केला जात होता. येथे दर महिन्याला प्रार्थना आयोजित केली जाते. यापूर्वी १२ जुलै आणि ९ ऑगस्ट रोजी प्रार्थना आयोजित करण्यात आली होती.

  निगडीत वृत्त : धर्मांतराचे संकट

देवतांची विटंबना रोखण्याच्या चळवळीत मनसेची उडी !

कुलाबा येथे प्रदर्शन बंद पाडले

मुंबई, २१ सप्टेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी कुलाबा पोलीस ठाण्याच्या मदतीने कुलाबा येथील `म्युझीयम आर्ट गॅलरी’मध्ये भरवण्यात आलेले हिंदूंच्या देवतांची विटंबना करणारे प्रदर्शन बंद पाडले. `दी फाईन आर्ट’कडून `सिरॅमिक्स’ दगडापासून पादत्राणांच्या प्रतिकृती तयार करून त्यांवर रेखाटलेली हिंदूंच्या देवतांची चित्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली होती.

 

(हिंदू मृतवत असल्यानेच कुणीही उठतो व त्यांच्या देवतांचा कसाही अवमान करतो ! – संपादक) या गॅलरीमध्ये दिल्ली येथील श्री. विनीत कक्कर या चित्रकाराचे `अ सोलो एक्झिबीशन ऑफ न्यू सिरॅमिक’ या विषयावर सोमवारपासून प्रदर्शन सुरू होते. यात `सिरॅमिक्स’ दगडाला रबरी सपातांसारखा आकार देण्यात आला होता. या सपातांवर भगवान शंकर, नटराज आदी देवतांची चित्रे रेखाटण्यात आली होती. असे पादत्राणांचे ७ जोड या ठिकाणी ठेवण्यात आले होते. (कलेच्या नावाखाली देवतांची विटंबना करणारे हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी होत ! – संपादक) याची माहिती मनसेचे कुलाबा विभाग अध्यक्ष श्री. अरविंद गावडे यांना मिळाली. श्री. गावडे यांनी सिरॅमिक्सच्या सपातांवर रेखाटण्यात आलेल्या देवतांच्या चित्रांच्या संदर्भात कुलाबा पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडे कलम २९५ (अ) अंतर्गत तक्रार करून ती चित्रे जप्‍त करण्यास भाग पाडले व प्रदर्शनही बंद पाडले. (धर्मरक्षणार्थ सनदशीर मार्गाने पोलिसांत तक्रार दाखल करून चित्रे जप्‍त करण्यास भाग पाडणार्‍या मनसेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! – संपादक) या प्रकरणी `दी फाईन आर्ट’ या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवतांची विटंबना रोखणार्‍यांनाच अटक : पोलिसांची उफराटी भूमिका
`म्युझीयम आर्ट गॅलरी’च्या श्रीमती हिंदुजा यांनी श्री. गावडे यांना विरोध केला. श्रीमती हिंदुजा यांच्या तक्रारीवरून श्री. गावडे आणि त्यांचे सहकारी यांच्या विरोधात कलम ३४३ (घेराव घालणे) अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी श्रीमती हिंदुजा यांना रात्रीच्या न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्‍त केले, तर श्री. गावडे व त्यांचे सहकारी यांना वैयक्‍तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. या काळात या कलादालनाने प्रदर्शनातील पोलिसांनी जप्‍त केलेली देवतांची चित्रे असणारी सातही पादत्राणे संकेतस्थळावर विक्रीस ठेवली होती. त्यांतील बरीचशी पादत्राणे विकली गेली असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेबाबत श्री. गावडे यांनी `दैनिक सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला सांगितले, “पोलिसांनी आमच्या विरोधात दाखल करून घेतलेली तक्रार हा अन्याय आहे. पोलिसांनी चित्रप्रदर्शन भरवण्यात आलेल्या `म्युझीयम आर्ट गॅलरी’च्या विरोधातही गुन्हा दाखल केला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचे प्रदर्शन भरवण्याचे धाडस त्यांना पुन्हा होणार नाही. हिंदूंच्या षंढपणामुळेच कोणीही देवतांची विटंबना करण्याचे धाडस करत आहे. प्रत्येक हिंदूने देवतांच्या होणार्‍या विटंबनेच्या विरोधात कृती करणे आवश्यक आहे.”

  निगडीत वृत्त : देवतांचे विडंबन रोखणारे धर्माभिमानी हिंदू