ख्रिस्त्यांवर अत्याचार झाल्याची ओरड करणारे महेश भट हिंदूंवर वर्षानुवर्षे होणार्या अत्याचारांबाबत गप्प का ?
स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या हत्येनंतर हिंदूंचा उद्रेक कायम !
भुवनेश्वर, २७ ऑगस्ट (वृत्तसंस्था) – स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या हत्येनंतर कंधमलमध्ये उसळलेला हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून दिसताक्षणी गोळया घालण्याचे आदेश देण्यात
आले आहेत.
(ओरिसातील आंदोलक हिंदू आहेत म्हणून धर्मद्रोही राज्यकर्ते तेथे आंदोलकांवर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देतात; मात्र काश्मीरमधील आंदोलक उघडउघड देशद्रोह करत असतांना राज्यकर्ते गप्प बसतात; कारण तेथील आंदोलक मुसलमान आहेत ! – संपादक) जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. श्रीप्रकाश जयस्वाल यांनी आज जिल्ह्याला भेट दिली. “जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली, तरी काही ठिकाणी अजूनही हिंसाचार सुरू आहे”, अशी माहिती विभागीय आयुक्त श्री. सत्यकात साहू यांनी दिली.
बालीगुडा व उदयगिरी या शहरांच्या मध्ये असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात लोक गोळा झाले व त्यांनी लाठ्या व इतर हत्यारे घेऊन हिंसाचार करायला सुरुवात केली. रायकीयामध्ये संतप्त हिंदूंनी दोन जणांना मारहाण केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. शहरात संतप्त जमावाने माजी पोलीस अधीक्षकाच्या निवासस्थानावर हल्ला केला. रायकीयामध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून या शहरातील बरीच ख्रिस्ती कुटुंबे अरण्यात पळून गेली आहेत. कंधमलमधील ६ शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत १०० हून अधिक घरांना आग लावण्यात आली आहे. त्यापैकी ६० घरे बारीमुंडा गावात जाळण्यात आली.
सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाजपच्या आमदारांची मागणी
ओरिसामध्ये बिजू जनता दल व भाजप यांच्या युतीचे सरकार आहे. आज भाजपच्या संतप्त आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिल्यामुळे बिजू जनता दल व भाजप यांच्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. झारसीगुडा जिल्ह्यातील लाईकेराचे आमदार श्री. वृंदावन माझी यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे वैयक्तिक पत्र विधानसभेच्या सभापतींचा सादर केले. “स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांना सुरक्षाव्यवस्था पुरवण्यास अपयश आल्याचे सरकारने मान्य केले आहे. सरकारचा पाठिंबा काढून घेण्याबाबत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या परवानगीची आम्ही वाट पहात आहोत”, अशी माहिती दुसरे एक आमदार श्री. महेश साहू यांनी दिली. “कंधमलमध्ये तैनात करण्यात आलेल्या निमलष्करी दलाचा वापर हिंदूंच्या विरोधात करण्यात येत आहे”, अशी टीका भाजपच्या आमदारांनी केली. कंधमलमध्ये समाजकंटकांच्या प्रवेशास आळा घालता यावा, यासाठी जिल्ह्याच्या सीमारेषेवर नाकेबंदी करण्यात आली आहे. स्वामी लक्ष्मणानंद यांच्या हत्येनंतर ३ वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये कंधमलचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. एन्. कनोडिया यांचा समावेश आहे.
पुरावा सापडल्याशिवाय विशिष्ट गटावर कारवाई करणे चुकीचे – शिवराज पाटील
कोणताही पुरावा हाती सापडल्याशिवाय एका विशिष्ट गटाला स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या हत्येला जबाबदार धरणे योग्य नाही, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री श्री. शिवराज पाटील यांनी केले. (गृहमंत्र्यांच्या या भूमिकेतून हाती काहीच लागणार नाही, हे स्पष्ट आहे. – संपादक) “स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या हत्येचा निषेध करणे आवश्यक आहे; प्राथमिक अहवालानुसार नक्षलवाद्यांनी स्वामी लक्ष्मणानंद यांची हत्या केल्याचा अंदाज आहे; मात्र त्याबाबत पुरावे हाती लागल्याशिवाय कोणतीही कारवाई करणे चुकीचे आहे”, असे ते म्हणाले. (नक्षलवाद्यांनी हत्या केली, हा विचार आता मागे पडला आहे. गृहमंत्री अद्ययावत माहितीच्या आधारे का बोलत नाहीत ? – संपादक)
ओरिसामध्ये ख्रिस्ती धर्मियांवर हिंदु धर्मियांकडून अत्याचार ! – महेश भट यांचा कांगावा
मुंबई, २७ ऑगस्ट (वार्ता.) – ओरिसामध्ये विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांनी ख्रिस्ती धर्मियांवर अत्याचार सुरू केले आहेत. तेथील दोन ख्रिस्ती धर्मियांना या संघटनांनी जिवंत जाळले आहे. त्यामुळे सरकारने या ठिकाणी सैनिकी कारवाई करावी, असे तथाकथित निधर्मीपणाचा आव आणणारे चित्रपट निर्माता श्री. महेश भट यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.(हिंदूंचे धर्मांतर करणार्या िख्र्त्यासंना विरोध करणारे स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती व ४ हिंदुत्ववादी यांची िख्र्त्यासंनी निर्घृण हत्या केली, याबाबत श्री. भट गप्प का ? – संपादक) `ऑल इंडिया िख्र्चाश्न कौन्सिल’तर्फे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते उपस्थित होते. या वेळी श्री. तुषार गांधी, मौलाना मस्तुकीम व ऑर्डिनल ओस्वाल्ड ग्रॅसिस आदी उपस्थित होते. या वेळी या सर्वांनी त्या दोन ख्रिस्ती धर्मियांच्या हत्येचा निषेध केला. हिंदुत्ववादी संघटनांनी आजही बंद पुकारला असून पाद्री व नन यांच्यासह अनेक ख्रिस्ती धर्मियांना जबरदस्तीने हाकलवून जंगलामध्ये सोडत आहेत. अल्पसंख्याकांप्रती संवेदनशील असणार्या सरकारने या प्रकरणी ख्रिस्ती धर्मियांवरील संकटाचा गांभिर्याने विचार करावा, असेही श्री. महेश भट म्हणाले. जर अल्पसंख्यांच्या जीविताच्या संरक्षणासाठी कायद्यामध्ये बदल करण्याची गरज असेल, तर त्याप्रमाणे त्वरित बदल करण्यात यावे. अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराचा मुद्दा येत्या निवडणुकांमध्ये परिणाम घडवून आणू शकतो, असा इशाराही या संघटनेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून दिला आहे.


