रामाला काल्पनिक म्हणणार्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून हुसेन यांची पाठराखण, ही काँग्रेसच्या धर्मद्रोहाची शृंखला !
हुसेन यांनी हिंदूंच्या देवता व भारतमाता यांची नग्न आणि अश्लील चित्रे रेखाटली आहेत. या चित्रांना `भारतीय चित्रकला’ संबोधून सांस्कृतिक मंत्रालयाने जगातील सर्वोच्च धार्मिक व त्यामुळे सांस्कृतिक मूल्ये असणारे हिंदू, त्यांच्या कला व समस्त भारतियांची राष्ट्रविषयक अस्मिता यांचा घोर अवमान केला आहे. या पापाबद्दल सांस्कृतिक मंत्रालयाचा धिक्कार करावा तेवढा थोडाच !
नवी दिल्ली, २४ ऑगस्ट – `इंडियन आर्ट समीट २००८’ या अखिल भारतीय स्तरावरील कलाप्रदर्शनाला कालपासून दिल्ली येथे प्रारंभ झाला. या प्रदर्शनात हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांची चित्रे आयोजकांनी सुरक्षेचे कारण देत न ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची निंदा करत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने `हुसेन यांच्या चित्रांशिवाय चित्रप्रदर्शन, म्हणजे भारतीय चित्रकलेचे अपुरे दर्शन’, अशा शब्दांत टीका केली आहे. (असे करून सांस्कृतिक मंत्रालयाने ते हिंदूंच्या धर्मभावनांना काडीमात्र किंमत देत नाही, एवढेच नव्हे, तर हिंदूंच्या धर्मभावना पायदळी तुडवणार्यांची तळी उचलून धरते, हेच स्पष्ट केले आहे. हिंदूंचा एवढा द्वेष करणारे सांस्कृतिक मंत्रालय हिंदुबहुल भारतात हवे कशाला ? – संपादक) हुसेन हे भारतातील एक जगप्रसिद्ध चित्रकार आहेत. त्यांची चित्रे या प्रदर्शनात समाविष्ट करणे अगत्याचे होते. जर हुसेन यांची चित्रे या चित्रप्रदर्शनात लावली असती, तर ते आनंददायक ठरले असते, असेही सांस्कृतिक मंत्रालयाने म्हटले आहे. `हे चित्रप्रदर्शन पहाण्यास येणार्या दर्शकांच्या सुरक्षेची जबाबदारी आयोजकांवर असल्यामुळे कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये, म्हणून वादग्रस्त हुसेन यांची चित्रे चित्रप्रदर्शनात न लावण्याचा निर्णय घेतला आहे’,
असे आयोजकांनी चित्रप्रदर्शनाच्या प्रारंभी स्पष्ट केले होते.


