तेरा देश मेरा देश !

भारतियांनो, देशाचा पुरुषार्थ जागवण्यासाठी गांधी आणि नेहरू यांच्या विचारसरणीचा त्याग करा !

`झी’ टी.व्ही.तर्फे आयोजित गीतगायनाच्या कार्यक्रमात पाकिस्तानच्या गायिका सारा खान यांनी `मी पाकिस्तानी आहे, याचा मला अभिमान आहे’, असे सांगत `दोन सुना घरात आल्यावर भांडण नको, म्हणून त्यांना दोन वेगळी घरे करून दिली जातात’, असे स्पष्टीकरण फाळणीच्या संदर्भात दिले. त्याच वेळी भारतीय गायिका कविता कृष्णमूर्ती यांनी सारा आपल्याला मुलीप्रमाणे वाटते, असे म्हटले. जिहादी वातावरणात पाकिस्तान साराला कविता कृष्णमूर्तीस `आई’ मानण्यात अनुमती देईल काय ? `जैसा देश है तेरा वैसा देश है मेरा’, असे म्हणण्याचा अधिकार साराला नाही, असे श्रोत्यांपैकी कोणीतरी उठून सांगायला पाहिजे होते. तसे केल्यास भारताचा पुरुषार्थ जागा होईल आणि मग अखंड भारताच्या दिशेने प्रवास सुरू होईल !

 

पाकिस्तानी गायिका सारा खान आणि फाळणीसंबंधीचे तिचे विचार !
`झी’ टी.व्ही. वर `सारेगमप’ नावाने हिंदी गाणे सुरेल आवाजात म्हणण्याचा एक कार्यक्रम असतो. तरुण गायक आणि गायिका त्यात भाग घेतात. नामवंत गायक आणि संगीत दिग्दर्शक परीक्षक म्हणून काम करतात. रंगतदार अशा या कार्यक्रमात १५ ऑगस्ट निमित्ताने अखंड भारताची संकल्पना डोळयांसमोर ठेवून गाणी म्हणायची असे ठरले होते. विशेष म्हणजे सारा रजा खान नावाच्या एका पाकिस्तानी गायिकेने या कार्यक्रमात भाग घेतला होता. तिने `जैसा देश हे तेरा वैसा देश हे मेरा’ हे गाणे चांगले म्हटले. मी पाकिस्तानची आहे आणि मला त्याचा अभिमान आहे, असे गाणे संपल्यावर श्रोत्यांना धन्यवाद देतांना तिने सांगितले. त्यावर संगीत दिग्दर्शक कल्याणजी व आनंदजी या जोडीतील आनंदजी यांनी तसा उल्लेख करण्याची आवश्यकता नव्हती, असे मत व्यक्‍त केले. `गायकाला म्हणजे कलावंताला कसलीच बंधने नसतात. तो विश्‍वाचा असतो. स्वत:ला पाकिस्तानी म्हणून सीमित का करून घ्यायचे ?’, असे स्पष्टीकरण त्यांनी केले. त्यावर गायिका कविता कृष्णमूर्तींना बोलावेसे वाटले. त्या म्हणाल्या, “पाकिस्तानी असण्याचा अभिमान धरण्यात चूक काही नाही. पाकिस्तानची प्रतिनिधी (अँम्बॅसॅडर) म्हणून सारा भारतात आली आहे. मला बोलावले तर मीसुद्धा पाकिस्तानात जाईन आणि भारताची प्रतिनिधी म्हणून जाईन; पण आपण दोघी हातात हात मिळवू तो प्रेमाचा असेल, एवढी काळजी घेतली म्हणजे झाले.” त्यावर अनेक परीक्षकांना बोलायचे होते, असे दिसले. एकजण म्हणाला की, त्याला `पार्टिशन’ या शब्दाचीच नफरत आहे. तेव्हा विख्यात गायक शंकर महादेवन म्हणाले, “नफरत’ आणि `पार्टिशन’ या शब्दांवर आता खल करू नका. अखंड भारताच्या संकल्पनेवर आपण बोलतो आहोत, गातो आहोत. तेव्हा त्या विश्‍वासाने एकमेकांशी बोलू या.” एवढे झाल्यावर सारा रजा खानने पुन्हा ध्वनीक्षेपक हाती घेतला आणि तिने सांगितले, “फाळणी झाली त्यात तसे वाईट काही झाले नाही. दोन सुना घरात आल्यावर भांडण नको, म्हणून त्यांना दोन वेगळी घरे करून दिली जातात. सदा न कदा भांडत एकत्र रहाण्यापेक्षा ती दोन कुटुंबे परस्पर संबंध जपतात. प्रेम ओलावा कायम राखतात. तसे करणे श्रेयस्कर नाही का ?”

सारा खान मला मुलीसारखी वाटते ! – इति कविता कृष्णमूर्ती
सर्वप्रथम `झी’ टी.व्ही.चे अभिनंदन केले पाहिजे की, अखंड भारताची कल्पना समोर ठेवून त्यांनी कार्यक्रम केले. त्यात नवोदित आणि जुन्याजाणत्या कलावंतांना सामील करून घेतले. आता भारत खंडित का झाला, हे समजून घेतले, तर भारत अखंड करण्याचे नामी साधन कोठे आहे, ते शोधता येऊ शकेल. त्यादृष्टीने सारा रजा खान हिचे विचार किती उपयोगी पडतात, ते पाहू. कविता कृष्णमूर्ती म्हणाल्या, “साराकडे बघतांना आणि तिचे गाणे ऐकतांना ही आपली बेटी आहे. एवढा एकच विचार त्यांच्या मनात येत होता. याही भावनेचा विचार केला पाहिजे.

…तर जिहादी वातावरणात सारा खान कविता कृष्णमूर्तीला `आई’ मानेल काय ?
दोन सुना घरात आल्या की, प्रत्येक दिवशी भांड्याला भांडे लागायला नको; म्हणून दोघांना दोन वेगळी घरे करून दिली जातात. शरीराने ही दोन घरे वेगळी झाली असली, तरी मनाने ती वेगळी झालेली नसतात. त्यांची इच्छा एकत्र रहाण्याचीच असते. श्राद्धपक्ष, लग्न, मुंजी, मुलांचे वाढदिवस, आजारपण अशा प्रसंगी ही दोन घरे एकत्र येतात; कारण त्यांचे पूर्वज समान असतात आणि त्यांची स्वप्ने समान असतात. पूर्वजांचा त्यांना अभिमान असतो. भविष्य सर्वांसाठी कल्याणकारी असावे, अशी त्यांची प्रार्थना असते. ती खूप फलद्रूप व्हावी; म्हणून हातात हात घालून ती वर्तमानाला सामोरे जातात. पाकिस्तानची निर्मिती ही भांड्याला भांडे लागू नये; म्हणून एका घराचे दोन भाग केले, असा प्रकार नाही. तो दरोडा आहे. महंमद बीन कासीमने इ.स. ७११ मध्ये सिंधवर आक्रमण केले. तेव्हापासून ते सिमी संघटनेच्या दहशतवाद्यांनी जुलै २००८ मध्ये कर्णावती आणि बेंगळुरू येथे केलेल्या बाँबस्फोटांपर्यंत सर्व इस्लामी आक्रमकांचा उद्देश हिंदु समाज व हिंदु संस्कृती नष्ट करून इस्लामी शासनप्रणाली स्थापन करणे, हा आहे. हा उद्देश साध्य करणे सुलभ व्हावे; म्हणून मुसलमानांनी आचारसंहिता सिद्ध केली आहे. हिंदुरूपी समुद्रात मुसलमानरूपी ओढा विलीन होऊ नये; म्हणून `जे हिंदूला अमृत ते मुसलमानाला विष असे मानले पाहिजे आणि हिंदूंविषयी सतत मनात द्वेषभावना पेटती ठेवून युद्धमान अवस्थेत राहिले पाहिजे’, अशी शिकवण मुसलमान समाजाला बालपणापासून मिळत असते. आज पाकिस्तानात १५ लाख शिशू आणि किशोर यांना जिहादचे शिक्षण दिले जात आहे. कविता कृष्णमूर्ती यांना सारा आपल्या बेटीसारखी वाटली असेल; पण जिहादी वातावरणात कविता यांना आई मानायला साराला अनुमती मिळेल काय, या प्रश्‍नाचे उत्तर `नाही’, असे असणार आहे.

कविता कृष्णमूर्ती हे समजून घेतील काय ?
डोळे उघडे ठेवून बघितल्यावर हिंदूंच्या प्रत्येक गोष्टीला पाकिस्तान ठुकरावतो का, ते कळेल. शास्त्रीय संगीतातील सर्व रागांची नावे `ती हिंदु भाषेतील आहेत’, असे कारण देऊन ती पाकिस्तानात बदलण्यात आली आहेत आणि नवी नावे अरबी-फार्सी भाषेतील आहेत. हे बंधूप्रेमाचे लक्षण आहे, असे कविताबाईंना वाटते का ? हिंदु कलावंतांच्या प्रेमात पाकिस्तानी नागरिकांनी पडू नये; म्हणून या कलावंतांची विटंबना करण्याची एकही संधी पाकिस्तान सरकारने सोडलेली नाही.
`जैसा देश है तेरा वैसा देश है मेरा’, असे म्हणण्याचा अधिकार साराला नाही, असे श्रोत्यांपैकी कोणीतरी उठून सांगायला पाहिजे होते. भारतात लोकशाही आहे, धर्मनिरपेक्षता आहे, अल्पसंख्याकांना संरक्षण आहे. आविष्कार स्वातंत्र्य आहे. पाकिस्तानात यातील काही नाही. भारत आपली भाकरी स्वत: कमावतो आणि समाधानाने जेवतो. पाकिस्तान अमेरिकेच्या आणि अरब राष्ट्रांच्या भिकेवर जगतो. भारतात अजूनही परस्त्रीला मातेसमान मानण्याचा संस्कार लुप्‍त झाला नाही. पाकिस्तानात प्रत्येक स्त्री ही भोगदासी असते. काँग्रेस कार्यकारिणीने ठराव करून पाकिस्तान निर्मितीची भेट मुसलमानांना दिली असतांना त्यांनी समोर दिसलेल्या प्रत्येक हिंदु स्त्रीवर बलात्कार करून आपला आनंद व्यक्‍त केला आहे. तेव्हा हा देश आणि तो देश यात मूलभूत खूप अंतर आहे.

गांधी आणि नेहरु यांच्या विचारांचा त्याग केला पाहिजे, तरच अखंड भारताच्या दिशेने प्रवास सुरू होईल !
हे अंतर दूर करून अखंड भारत पुन्हा करायचा असेल, तर मुसलमानी आक्रमकांचे हिंदु समाज आणि हिंदु संस्कृती नष्ट करण्याच्या उद्दिष्टात अडथळे आणले पाहिजेत. भारतातील सर्व मुसलमान मुळचे हिंदु असल्याने हिंदु समाज आणि संस्कृती नष्ट करण्याच्या वेडेपणात भयंकर पाप आहे आणि त्यात सगळयांचीच सर्वप्रकारे हानी आहे, हे पटवणे कठीण नाही; मात्र त्यासाठी हिंदूंना स्वत:ला हिंदुत्वाचा अभिमान वाटला पाहिजे. तो त्यांनी न लाजता सांगितला पाहिजे. तसे झाले, तर अखंड भारताचे मार्ग हिंदूंनी सापडतील. पहिली गोष्ट म्हणजे कुराणची भारतीय भावविश्‍वाला अनुरूप अशी सुधारित आवृत्ती सिद्ध केली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मुसलमानांना चार बायका करण्याचा हक्क काढून घेतला पाहिजे. त्यांची संतती हिंदूंप्रमाणे नियंत्रित केली पाहिजे. मुसलमान मुलींना हिंदु मुलांशी लग्न करता आले पाहिजे. हे होण्यासाठी हिंदूंना संघटित व्हायला हवे. गांधी आणि नेहरु यांच्या विचारांचा त्याग केला पाहिजे. तसे केल्यास भारताचा पुरुषार्थ जागा होईल आणि मग अखंड भारताच्या दिशेने प्रवास सुरू होईल.

 |  मित्रांना पाठवा छापील प्रत

  निगडीत वृत्त : लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार

कर्नाटकमधील भाजप सरकार व पोलीस यांचा पाठिंबा !

हिंदु जनजागृती समितीची गणेशोत्सव जनजागृती चळवळ

मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याकडून चळवळीला सकारात्मक प्रतिसाद !
बेंगळुरू, २३ ऑगस्ट (वार्ता.) – सार्वजनिक गणेशोत्सवात होणारे गैरप्रकार व विविध आकारांच्या अशास्त्रीय श्री गणेशमूर्तींची होणारी प्रतिष्ठापना यांच्याबाबत हिंदु जनजागृती समितीने गेली ५ वर्षे जनजागृती चळवळ राबवली आहे. समितीने यंदा मोठ्या प्रमाणात कर्नाटक राज्यात ही चळवळ आरंभली. समितीच्या या चळवळीला कर्नाटकमधील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि पोलीस यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

नुकतीच हिंदु जनजागृती समितीच्या कुणीगल येथील सदस्या सौ. सरला मुनीराजी यांनी मुख्यमंत्री श्री. बी.एस्. येडीयुरप्पा यांची भेट घेतली व त्यांना समिती राबवत असलेल्या गणेशोत्सव जनजागृती चळवळीबद्दल माहिती दिली. या वेळी श्री. येडीयुरप्पा यांनी “लोकमान्य टिळक यांनी दूरदृष्टी ठेवून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. हा उत्सव सुरू करण्यामागील त्यांचा हेतू साध्य करण्याची वेळ आली आहे”, असे वक्‍तव्य केले. या प्रसंगी श्री. येडीयुरप्पा यांनी समितीच्या कार्याचा गौरव केला. समितीच्या सदस्यांनी श्री. येडीयुरप्पा यांना गणेशोत्सव जनजागृती चळवळीची माहिती देणारी ध्वनीचित्र-तबकडी व सनातनचे सात्त्विक श्री गणेशाचे चित्र भेट दिले. या बैठकीच्या वेळी अनेक मंत्री व आमदार यांनी ध्वनीचित्र-तबकडी व गणपति हा ग्रंथ खरेदी केला. या चळवळीद्वारे समिती श्री गणेशाबद्दल देत असलेल्या अमूल्य माहितीबद्दल त्यांनी आभार व्यक्‍त केले.

भाजपकडून समितीच्या जनजागृती चळवळीला कृतीशील पाठिंबा !
हिंदु जनजागृती समितीचे श्री. अरविंद बाळीगा यांनी भाजपच्या मुख्य कार्यालयात जाऊन प्रदेशाध्यक्ष श्री. संतोष यांची भेट घेतली व त्यांना समिती राबवत असलेल्या गणेशोत्सव चळवळीबद्दल माहिती दिली. या वेळी श्री. बाळीगा यांनी त्यांना चळवळीबद्दल माहिती देणार्‍या ध्वनीचित्र-तबकड्याही दाखवल्या. त्या पाहून श्री. संतोष प्रभावित झाले. “प्रदेश भाजपतर्फे या ध्वनीचित्र-तबकड्या प्रायोजित केल्या जातील”, असे आश्‍वासन त्यांनी दिले. या चळवळीची माहिती भाजपच्या जास्तीतजास्त कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी श्री. संतोष यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या राज्यस्तरीय बैठकीत येण्याचे निमंत्रण दिले. या बैठकीस भाजपचे ३०० कार्यकर्ते, आमदार व मंत्री उपस्थित रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. “या चळवळीला प्रदेश भाजप पूर्ण पाठिंबा देईल”, असेही ते म्हणाले. प्रदेश बैठकीच्या वेळी श्री. संतोष यांनी पुढाकार घेऊन समितीसाठी विशेष `स्टॉल’चे आयोजन केले. या स्टॉलमध्ये ध्वनीचित्र-तबकड्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. श्री. संतोष यांनी `आदर्श गणेशोत्सवा’च्या ध्वनीचित्र-तबकड्यांच्या ५० प्रती स्वखर्चाने वितरित केल्या व आवश्यकता भासल्यास आणखी ध्वनीचित्र-तबकड्या घेणार असल्याचे सांगितले. प्रदेश बैठकीच्या वेळी त्यांनी धर्मशिक्षणाचे फ्लेक्सही जास्तीतजास्त लोक पहातील, अशा ठिकाणी लावण्याची परवानगी दिली. प्रदेश बैठकीचे आयोजन करण्यात श्री. संतोष व्यस्त होते. असे असतांनाही ते वेळात वेळ काढून समितीच्या स्टॉलच्या ठिकाणी येऊन कार्यकर्त्यांना मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल विचारत होते.

बेंगळुरूमध्ये पोलीसयंत्रणेकडून जनजागृती चळवळीस मोठ्या प्रमाणात हातभार !
११ ऑगस्ट रोजी बेंगळुरू शहराचे पोलीस आयुक्‍त श्री. शंकर बिद्री यांची हिंदु जनजागृती समितीच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळाने भेट घेतली व त्यांना समितीच्या सार्वजनिक गणेशोत्सव जनजागृती चळवळीविषयी माहिती दिली. या वेळी शिष्टमंडळातील एक सदस्या सौ. पौर्णिमा प्रभू यांनी सार्वजनिक गणेशोत्सवात होणार्‍या गैरप्रकारांबाबत जनजागृती करणारी ध्वनीचित्र-तबकडी श्री. बिद्री यांना दाखवली, तसेच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागील लोकमान्य टिळकांचा उद्देश विशद केला. सार्वजनिक गणेशोत्सवातील गैरप्रकारांबाबत जाणून घेतल्यानंतर श्री. बिद्री यांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले व सर्व पोलीस ठाण्यांना या गैरप्रकारांबाबत आवश्यक कारवाई करण्याबाबतचे आदेशपत्र पाठवण्याचे आश्‍वासन दिले. त्यांनी तात्काळ याविषयी सर्व पोलीस उपायुक्‍तांना आदेश देणारे पत्र पाठवण्याबाबत अतिरिक्‍त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) श्री. एम्.आर्. पुजार यांना सूचना केली. त्यानुसार त्या संध्याकाळीच श्री. पुजार यांनी सर्व उपायुक्‍तांना सदर मुद्याविषयी सूचना पाठवली. `सार्वजनिक गणेशोत्सवात काय असावे व काय नसावे’, याविषयी सादर केलेल्या मुद्यांवर आपण लवकरच पत्रकार परिषद बोलावू, असे आश्‍वासन श्री. बिद्री यांनी समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
२५ ऑगस्ट रोजी आदर्श हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या `आदर्श गणशोत्सव : कायदा व सुव्यवस्था’ या पत्रकार परिषदेला उपस्थित रहाण्याचे आश्‍वासन श्री. पुजार यांनी समितीला दिले आहे. पोलीस उपायुक्‍त (जनसंपर्क) श्री. रामय्या यांनी सोमवारी `सार्वजनिक गणेशोत्सवातील शिस्तपालन’ या विषयावर होणार्‍या पोलीस आयुक्‍तांच्या बैठकीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती मागवली आहे. समितीच्या शिष्टमंडळाशी बोलतांना श्री. रामय्या म्हणाले, “मी कर्माने प्रखर हिंदुत्ववादी आहे. मी नेहमीच माझ्या कार्यालयातील टेबलवर भगवद्‌गीता बाळगतो. त्यामुळे काम करण्यास स्फूर्ती मिळते.” या वर्षी पोलीस `एक गाव एक गणपति’ ही संकल्पना राबवणार असून हिंदु जनजागृती समितीच्या प्रयत्‍नांमुळेच हा निर्णय घेतल्याचे पोलीस उपायुक्‍त श्री. गोचीनकट्टी यांनी सांगितले. येथील आयुक्‍तांच्या कार्यालयातून हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते बाहेर जात असतांना `संजीवनी’ या कन्नड दैनिकाचे वार्ताहर श्री. धनंजयप्पा यांनी त्यांना गाठून गणेशोत्सव जनजागृती चळवळीसंबंधी माहिती घेतली. तसेच दुसर्‍या दिवशीच या चळवळीविषयी बातमी प्रसिद्ध केली.

गणेशोत्सवातील गैरप्रकार रोखण्यासाठी पत्रकार परिषदेतून प्रबोधन !
सार्वजनिक गणेशोत्सवातील गैरप्रकार रोखण्यासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने `प्रेस क्लब ऑफ बेंगळुरू’ येथे २२ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत ठेवण्यात आलेली सनातन-निर्मित श्री गणेशमूर्ती व श्री गणेशाचे सात्त्विक चित्र यांमुळे उपस्थित पत्रकार प्रभावित झाले.
श्री. सुरेश हेरूर यांनी उपस्थित पत्रकारांना लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागील दृष्टीकोन समजावून सांगितला व सद्यस्थितीत सार्वजनिक गणेशोत्सवात होणार्‍या गैरप्रकारांबाबत माहिती दिली. या वेळी `गणेश उत्सव’ ही कन्नड भाषेतील ध्वनीचित्र-तबकडी दाखवण्यात आली. या प्रसंगी सनातन-निर्मित श्री गणेशमूर्तीची वैशिष्ट्ये श्रीमती प्रभू यांनी सांगितली. सनातन-निर्मित श्री गणपतीचे चित्र व इतरत्र उपलब्ध चित्र यांचा प्रयोग उपस्थितांकडून करून घेण्यात आला. सार्वजनिक गणेशोत्सवात होणार्‍या गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी सर्व पत्रकारांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. सुरेश यांनी केले. २६ ऑगस्ट रोजी बेंगळुरू येथील कॉर्ड रस्त्याच्या पश्चिमेला असलेल्या पद्मावती कल्याण मंडपामध्ये हिंदु जनजागृती समितीतर्फे साजर्‍या होणार्‍या आदर्श गणेशोत्सवाबाबतही पत्रकारांना माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेनंतर या चळवळीविषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी `दी टाइम्स ऑफ इंडिया’, `डेक्कन हेराल्ड’, `उदयवाणी’ आणि `विजय कर्नाटक’ या वृत्तपत्रांच्या वार्ताहरांनी समितीच्या सदस्यांना संध्याकाळी परत दूरध्वनी केले. स्थानिक प्रसिद्धीमाध्यमांनी गणेशोत्सव मोहिमेला चांगली प्रसिद्धी दिली. येथील डेक्कन हेराल्ड, दी न्यू इंडियन एक्स्प्रेस, संजीवनी, प्रजावाणी, दी विजय कर्नाटक, संयुक्‍त कर्नाटक, दी टाइम्स ऑफ इंडियाची कन्नड आवृती व उदयनी या वृत्तपत्रांनी या चळवळीविषयी बातमी छापली.

जनतेचा प्रतिसाद
१. एनर्जी मॅनेजमेंट ग्रुपमधील श्री. सूद यांनी दूरध्वनी करून श्री गणेशमूर्तीसाठी नैसर्गिक रंग वापरावेत, या हिंदु जनजागृती समितीच्या सूचनेचे कौतुक करून समितीचे अभिनंदन केले, तसेच त्यांनी ज्या ठिकाणी मूर्तीविसर्जन केले जाते, त्या ठिकाणच्या लोकांना रासायनिक रंगांमुळे काय समस्या येतात, याविषयी माहिती दिली.
२. श्रीमती अनघा यांनी दूरध्वनीवरून त्यांच्यासाठी व त्यांच्या मित्रमैत्रिणींसाठी अशी श्री गणेशमूर्ती उपलब्ध होईल का, याविषयी दूरध्वनीवरून चौकशी केली.
३. श्री. शेषगिरी राव या ८० वर्षांच्या गृहस्थाने हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक केले व या विषयावर त्यांनी लिहिलेली काही माहिती पाठवण्याचे आश्‍वासन दिले, तसेच सायंकाळी परत दूरध्वनी करून त्यांनी आपण या मोहिमेसाठी काही देणगी देऊ शकतो का, अशी विचारणा केली.
४. येथील एक शिक्षक व पर्यावरणवादी श्री. उमाशंकर यांनी दूरध्वनी करून सांगितले, “बेंगळुरूपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या बॅनरघाट्टा गावात जनजागृतीसाठी त्यांनी ३ हजार पत्रके छापण्याचे ठरवले आहे.” त्यांनी २० किलोमीटर अंतरावरून बेंगळुरू येथे येऊन या चळवळीसंबंधी पत्रके, श्री गणपतीचे छायाचित्र व ग्रंथ नेले, तसेच त्यांनी या गावात जनजागृती करण्यासाठी फेरी काढण्याकरता हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित केले. श्री गणेशमूर्तींना दिल्या जाणार्‍या रासायनिक रंगांचा तळयातील पाण्यावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यासाठी श्री. उमाशंकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने एक प्रकल्प हाती घेतला आहे.

| मित्रांना पाठवा | | छापील प्रत

निगडीत वृत्त : हिंदु जनजागृती समिती