राष्ट्रपती पदकासाठीच्या यादीतूनही नाव काढले !
नवी दिल्ली – १३ ऑगस्ट रोजी रात्री मुसलमानांनी श्रीनगरमध्ये घडवलेल्या दंगलीला जबाबदार धरून केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महानिरीक्षकांची बदली केली असून राष्ट्रपती पदकासाठी असलेल्या यादीतील त्यांचे नाव काढण्यात आले आहे.
श्रीनगर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान रहिवाशांच्या घरात घुसले, अशी आरोळी मशिदींतून ध्वनीक्षेपकावर ठोकण्यात आली. १९८० ते ९०च्या दशकात दहशतवाद्यांनी सैन्याच्या विरोधात अशाच पद्धतीचा अवलंब केला होता. या घोषणांना प्रतिसाद देऊन स्थानिक मुसलमानांनी बुधवारी दंगल घडवली. या दंगलीची दखल प्रशासनाने तात्काळ घेतली. या दंगलीला केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक श्री. जैन यांना जबाबदार
धरून केंद्र सरकारच्या वतीने राज्यपाल एन्.एन्. व्होरा यांनी महानिरीक्षकांची श्रीनगरमधून उचलबांगडी केली. (काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीनंतर केंद्रातील काँग्रेसप्रणित सरकार याहून वेगळे काही करील, अशी अपेक्षाच नाही ! – संपादक) एवढेच नव्हे तर स्थानिक मुसलमानांचे मन सांभाळण्यासाठी गृहमंत्रालयाने महानिरीक्षकांचे नाव राष्ट्रपती पदकासाठीच्या यादीतून काढून टाकले. (मुसलमानांचे कल्याण करण्याच्या भरात लायक नोकरवर्गाचे आयुष्याचे नुकसान होत आहे, त्याचे काय ? मुसलमानेतरांना या देशात भवितव्य आहे कि नाही ? – संपादक) केंद्र सरकारचा हा निर्णय धक्कादायक आहे. दहशतवादी व त्यांच्या समर्थकांच्यामधील रेषा अगदी पुसट आहे. अशा परिस्थितीत जवानांच्या नीतीधैर्यावर या निर्णयाचा विपरित परिणाम होणार आहे. कायदा हातात घेऊन संचारबंदी मोडून नियंत्रण रेषेकडे जाणार्या लोकांच्या दबावाला बळी पडून केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय दुर्दैवी असल्याची संतप्त प्रतिक्रिया केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने दिल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.
| मित्रांना पाठवा | छापील प्रत
|
निगडीत वृत्त : देशाचे वाटोळे करणार्या सर्वच राजकीय पक्षांना नष्ट करा !