| नवी दिल्ली, २१ ऑगस्ट (प्रे.ट्र./वृत्तसंस्था) – अमरनाथ देवस्थानाला सरकारने भूमी हस्तांतरित करावी, या मागणीसाठी विहिंपने केलेल्या `तुरुंग भरा’ आंदोलनाला आज देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राजधानी दिल्लीसह राजस्थान, पंजाब व महाराष्ट्र येथे विविध ठिकाणी हजारोंच्या संख्येने आंदोलनकर्त्यांनी निदर्शने केली.
दिल्लीमध्ये विहिंपचे वरिष्ठ नेते डॉ. प्रवीण तोगाडिया यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते व कार्यकर्ते यांनी आज स्वत:हून अटक करून घेतली. शहरातील राजौरी उद्यानात हजारो आंदोलनकर्त्यांनी निदर्शने केली. या वेळी दिल्ली विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री. जगदीश मुखी, आमदार श्री. ओ.पी. बब्बर, एच्.एस्. बाली तसेच इतर वरिष्ठ नेत्यांनी स्वत:हून अटक करून घेतली. या आंदोलनामध्ये ७ हजारांहून अधिक आंदोलनकर्त्यांनी सहभाग घेतला, अशी माहिती विहिंपच्या सूत्रांनी दिली. “अमरनाथ मुद्दा आता केवळ जम्मूपुरता मर्यादित नाही. हे आता राष्ट्रव्यापी आंदोलन झाले आहे. आमच्या तीन मागण्या आहेत. अमरनाथ देवस्थान मंडळाला भूमी परत द्यावी, यात्रेचे नियोजन अमरनाथ देवस्थान मंडळाकडे सोपवावे व राज्यपाल श्री. एन्.एन्. व्होरा यांना अटक करण्यात यावी”, असे डॉ. तोगाडिया म्हणाले. राजस्थानमध्ये हजारो आंदोलनकर्त्यांकडून स्वत:हून अटक पंजाबमध्येही निदर्शने अमरावतीमध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळला औरंगाबादमध्येही आंदोलन अलिबाग - आज देशभरात रा.स्व. संघाने केलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आलिबागमधील जोगळेकर नाक्यावरील श्री काशी विश्वनाथ मंदिरासमोर आमरनाथ संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. या वेळी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, रा.स्व. संघ, भाजप व शिवसेना यांचे १०० कार्यकर्ते उपस्थित होते. काश्मीरमधील फळ बागायतदारांचा उपोषणावर जाण्याचा इशारा हिंदूंनो, इतर काही करत नाही, तर निदान आंदोलन यशस्वी होण्यासाठी दररोज प्रार्थना तरी करा ! काश्मीरचे राज्यपाल श्री. एन्.एन्. व्होरा यांनी अमरनाथ देवस्थान मंडळाला दिलेली जमीन परत घेतल्यानंतर जम्मूमधील धर्माभिमानी हिंदू पेटून उठले ! विहिंपच्या `तुरुंग भरा’ आंदोलनानंतर आता हे आंदोलन राष्ट्रव्यापी होत आहे. `अमरनाथ भूमीचा प्रश्न हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे’, हे प्रत्येक हिंदूने लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होता नाही आले, तरी हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रत्येक हिंदूने दररोज निदान प्रार्थना तरी करणे आवश्यक आहे.काश्मीरमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या वाहनावर हल्ला आज समितीच्या आंदोलनकर्त्यांनी काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते श्री. मंगतराम शर्मा यांच्या वाहनावर हल्ला केला. आंदोलनकर्ते लोखंडी सळया व हातात दगड घेऊन श्री. शर्मा यांच्या वाहनावर चाल करून गेले. आज श्री. शर्मा त्यांच्या नातवासह डॉक्टरकडे जात असतांना आंदोलनकर्त्यांनी हा हल्ला केला. श्री. शर्मा यांच्याबरोबर असलेल्या सुरक्षाजवानांनी त्यांची आंदोलनकर्त्यांच्या हल्ल्यापासून सुटका केली. या वेळी आंदोलनकर्त्यांनी तीन वाहनांची तोडफोड केली. गुलाम नबी आझाद यांच्या मंत्रीमंडळात पूर्वी उपमुख्यमंत्री असलेले श्री. मंगतराम यांच्या घरावर आंदोलनकर्त्यांनी आतापर्यंत दोन वेळा हल्ला केला आहे. | मित्रांना पाठवा | |
निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!
|



4 – वाचक संख्या |