आठवले, तुमच्या `बिग बॉस’ना ओळखा !

ज्याची पटकथा लिहिलेली नसते, असा `बिग बॉस’ हा अमेरिकेच्या दूरचित्रवाणीवरील लोकप्रिय `रिअँलिटी शो’ आहे. एका व्यक्‍तीच्या, म्हणजे `बिग बॉस’च्या नियंत्रणाखाली निवडक प्रतिष्ठित मंडळी जगापासून अलिप्‍त जागेत काही काळापुरती स्वेच्छेने बंदिस्त रहातात. त्या जागेत तेवढा काळ त्यांना पुष्कळ स्वातंत्र्य असते; परंतु `बिग बॉस’चे त्यांच्यावर बारीक लक्ष असते.

माणसे मोठी असली, तरी त्यांच्या मनात लहान विचार येऊन त्या विचारांच्या प्रभावाखाली हेवेदावे करून सहजीवनात टाळता येण्याजोगी कटुता ते कशी आणतात, हे दूरचित्रवाणीवरून विस्तृतपणे प्रक्षेपित होणार्‍या त्यांच्या वर्तनावरून कळते. भारतात कोर्‍या करकरीत असलेल्या `कलर्स’ वाहिनीवर चित्रपट नटी शिल्पा शेट्टी ही `बिग बॉस’ असलेल्या कार्यक्रमात आधी सांगूनही घेतले नाही म्हणून रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठवले यांनी प्रगटपणे संताप व्यक्‍त केला त्यांच्या अनुयायांनी रस्त्यावर उतरून उग्र निदर्शने करत शिल्पाचा कागदी पुतळा जाळला आणि त्या वाहिनीच्या कार्यालयात घुसून मोडतोड केली. आठवले हे स्वयंभू असल्याने समुपदेशनाच्या पलीकडचे आहेत; परंतु दलित जनतेचे देशाविषयीचे प्रेम, निष्ठा आणि कर्तव्यभावना कमी झाली नसल्याने तिने आठवल्यांचा थयथयाट, आठवले कोणाच्या संगतीत किती काळ रमू इच्छितात आणि त्यांचा किंवा भारतियांचा खरा `बिग बॉस’ कोण असला पाहिजे, या मुद्यांच्या संदर्भात गंभीरपणे विचार केला पाहिजे. शिल्पा शेट्टीच्या कार्यक्रमात येन केन प्रकारेण नाव कमावलेल्या एकूण १४ व्यक्‍ती तीन महिने लोणावळयाजवळील एक सर्व सुखसोयींनी युक्‍त अशा बंगल्यात रहाणार आहेत. ३२ कॅमेरे त्यांच्याकडे बहुतेक काळ रोखून बघणार आहेत. `बिग बॉस’चे समाधान होईल, अशा प्रकारे शेवटपर्यंत जो राहू शकेल, त्यास सात लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. संजय निरूपम, राहूल महाजन, मोनिका बेदी यांचा त्यांत समावेश आहे. मोनिकाने अबू सालेम या आतंकवाद्याला शरीर दिले आहे. राहूल व्यसनाधीन आहे. त्याचा कर्तृत्ववान बाप त्याचा `बिग बॉस’ नव्हता. राहूल मादक द्रव्यांचा दास होता. अशांसाठी आयुष्यातील ९० दिवस आठवले खर्चू इच्छितात. आठवले यांची बांधीलकी कोणाशी आहे ? ते खासदार आहेत. दलितांचे नेते आहेत. आठवले यांना दलितांचे प्रश्‍न संसदेच्या व्यासपिठावर मांडून जगाच्या निदर्शनास हे आणून द्यायचे आहे की, अनेक प्रकारचे अन्याय सहन करूनही प्रसंगी माणुसकीला पारखे होऊनही दलित समाज राष्ट्रनिष्ठ राहिला. बंधुभावाला पारखा झाला नाही. त्याचे स्त्रीदाक्षिण्य शुष्क झाले नाही. मुसलमानांप्रमाणे दलितांनी त्यांच्या मागण्यांसाठी दंगे आणि घातपात केले नाहीत; म्हणून या समाजाकडे `कमोडिटी’ म्हणून न बघता माणूस म्हणून बघितले पाहिजे. या कामाला आयुष्य पुरणार नाही; पण आठवल्यांच्या मनात तसा विचार येत नाही. दलितांचा `बिग बॉस’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, शिल्पा शेट्टी नव्हे. `आंबेडकरांचे वाङ्मय एकदातरी नीट वाचू या’, असा विचार आठवलेंना सुचत का नाही ? खरे म्हणजे आंबेडकरांचा `बिग बॉस’ होता भारतमाता. त्यांनी कठोर तपश्चर्येने ज्ञान मिळवले, दलितांना संघटित केले, ते भारताच्या काळजीने. `भारताचे अहित होईल, असे मी काही करणार नाही’, असे धर्मांतराच्या वेळी त्यांनी निक्षून सांगितले होते. तरीही भारतापेक्षा पाकिस्तानची चिंता वहाणार्‍या काँग्रेस संस्कृतीच्या दारात आठवले लाचारासारखे उभे असतात. अशांना दलितांनीच दूर केले पाहिजे.
- सुघोष

| मित्रांना पाठवा | - वाचक संख्या 2 – वाचक संख्या | छापील प्रत

निगडीत वृत्त : शरसंधान

Leave a Reply