शबानाच्या उलट्या बोंबा !

मुसलमानांना घरे मिळत नसल्याची ओरड करणार्‍या शबाना घरातून हुसकावण्यात आलेल्या काश्मिरी हिंदूंबद्दल गप्प का !

<!–

18-08-2008 by shashi

–>हिंदी चित्रपटांतील एक जुनी नटी शबाना आझमीने आपणाला हिंदु वस्तीत रहाण्यास घर मिळत नसल्याची तक्रार केली आहे. शबानाला किंवा मुंबईतील मुसलमानाला राहत्या घरातून अजून कुणी हुसकावून लावलेले नाही; पण काश्मीर खोर्‍यातून पाच लाख हिंदूंना राहत्या घरातून हुसकावण्यात आले आहे.

ते हिंदू कोठे रहात आहेत, याची चौकशी शबाना करणार आहे का ? या हिंदूंची घरे सुरक्षित राहिले पाहिजेत आणि ती त्यांना परत मिळाली पाहिजेत, यासाठी शब्द खर्चण्याची उदारता शबाना दाखवणार का ? हिंदी चित्रपटांतील एक जुनी नटी शबाना आझमीने `भारताच्या राजकारणात मुसलमानांना न्यायपूर्ण वागणूक मिळत नाही. हिंदूंकडून त्यांना पक्षपाती वागणूक मिळते’, असे उघड आरोप केले असून आपणाला हिंदु वस्तीत रहाण्यास घर मिळत नाही, असे उदाहरण दिले आहे. जावेद अख्तर हा शबानाचा नवरा. तो चित्रपटांत संवाद लिहितो. चांगले लिहितो. हिंदूंनी या दोघांवर त्यांच्यात जेवढे कलागुण आहेत, त्या तुलनेत अधिकच प्रेम केले आहे. उषाकिरण नटीची मुलगी तन्वी हिने शबानाच्या भावाबरोबर लग्न केले. त्यावर हिंदूंनी मोर्चा काढलेला नाही. तरी सी.एन्.एन्.-आय.बी.एन्.वर `इस्लाम खतरेमें’ थाटात शबाना का किंचाळते, ते तपासले पाहिजे. हिंदू मुसलमानाला काही देत नसतील, तर त्यामुळे शबानाला जर राग येत असेल, तर मुसलमान हिंदूला काही देत नसतांना पाहूनही तिला राग यायला पाहिजे. बाबा अमरनाथच्या यात्रेकरूंना दोन महिन्यांसाठी दिलेली भूमी खोटीनाटी कारणे देऊन मुसलमानांनी परत घेतली. `भूमी देणार नाही’, असे ओमर अब्दुल्लाने लोकसभेत सांगितले. `काश्मीरमध्ये सैन्याला दिलेली भूमी काढून घ्या’, अशी मागणी गिलानीसारखे नेते करत आहेत. शबानाला आता राग यायला पाहिजे. `हा अन्याय आहे’, असे तिने म्हटले पाहिजे. भिवंडीमध्ये महाराष्ट्र शासनाला पोलीस ठाणे स्थापन करायला जागा हवी आहे. मुसलमान ती देत नाहीत. रागावून मुसलमानांनी भिवंडीतील दोन पोलिसांची हत्या केली. त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली. हा अन्याय आहे, असे शबानाने म्हणावे, अशी अपेक्षा आहे. गृहमंत्री आबा पाटील यांच्यासमवेत भिवंडीला जाऊन तेथील मुसलमानांची समजूत शबानाने काढली पाहिजे. शबाना बाई आहे. बाईची दु:खे तिला कळतात. काश्मीरमध्ये इस्लामी आतंकवाद्यांच्या भीतीने हिंदु स्त्रियांची मासिक पाळी वयाच्या तिसाव्या वर्षी बंद होते. शबानाने तेथे गेले पाहिजे. हिंदु स्त्रियांची चौकशी केली पाहिजे. घर मिळत नसल्याची तक्रार शबानाने केली आहे. शबानाला किंवा मुंबईतील मुसलमानाला राहत्या घरातून अजून हुसकावून लावलेले नाही; पण काश्मीर खोर्‍यातून पाच लाख हिंदूंना राहत्या घरातून हुसकावण्यात आले आहे. ते हिंदू कोठे रहात आहेत, याची चौकशी शबाना करणार आहे का ? शबानाचे फारूख अब्दुल्लाशी चांगले संबंध आहेत. या हिंदूंची घरे सुरक्षित राहिली पाहिजेत आणि ती त्यांना परत मिळाली पाहिजेत, यासाठी शब्द खर्चण्याची उदारता शबाना
दाखवणार का ? काश्मीरचे महाराज हरिसिंग यांना शेख अब्दुल्ला आणि नेहरू यांनी मिळून काश्मिरातून हाकलून दिले. ते परत कधीही स्वत:च्या राज्यात जाऊ शकले नाहीत, हे शबानाला माहीत आहे का ? पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी मुसलमानांनी घरात घुसून हिंदु स्त्रियांवर बलात्कार केले ते न्यायसंगत वर्तन होते का ? शबाना किंचाळते आहे; कारण जम्मूचे आंदोलन भारतभर पसरणार आहे, हे तिला कळले आहे; म्हणून आतापासूनच चोरांच्या उलट्या बोंबा मारायला तिने सुरुवात केली आहे. स्वत:चे भवितव्य धोक्यात आहे, याची जाणीव हिंदूंना होऊ लागली आहे. अशी जाणीव होते, तेव्हा मन्वंतराची चाहूल लागते. अशा वेळी गिधाडे अभद्र स्वर काढत असतात ! – सुघोष

| मित्रांना पाठवा | - वाचक संख्या 1 – वाचक संख्या | छापील प्रत

निगडीत वृत्त : शरसंधान

Leave a Reply