पाकमधून येणार्‍या रेल्वे प्रवाशांवर ध्वनीचित्रीकरणाद्वारे करडी (?) नजर !

नवी दिल्ली, १७ ऑगस्ट (प्रे.ट्र.) – भारत-पाक सीमेवरील अट्टारी व मुन्नाबाव या रेल्वेस्थानकांवरील सुरक्षाव्यवस्था वाढवण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रवाशांचे ध्वनीचित्रीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या दोन्ही स्थानकांवर सर्वेक्षणासाठी अत्याधुनिक उपकरणे बसवण्यासाठी गृहखात्याने निविदा मागवल्या आहेत, अशी माहिती गृहखात्याच्या सूत्रांनी दिली.

(आज देशाला अत्याधुनिक सुविधांबरोबरच ती हाताळण्यासाठी राष्ट्राभिमानी व्यक्‍तींची खरी गरज आहे. राष्ट्राभिमानशून्य राज्यकर्ते अशा राष्ट्रभिमानी व्यक्‍ती कोठून आणणार ? – संपादक) पंजाबमधील अट्टारी व राजस्थानमधील मुन्नाबाव या रेल्वेस्थानकांवर येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांचा तपशील गुप्‍तचर विभागाला ठेवावा लागणार आहे. थार एक्स्प्रेस व समझौता एक्स्प्रेस या भारत व पाकिस्तान यांमध्ये धावणार्‍या रेल्वेगाड्या या स्थानकांवरून प्रवास करतात. या प्रवेशद्वारांवर सतर्कता राखण्यासाठी `क्लोज सर्कीट टीव्ही’ बसवण्यात येत आहे, अशी माहिती या सूत्रांनी दिली.

 |  मित्रांना पाठवा |  52 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : देशाचे वाटोळे करणार्‍या सर्वच राजकीय पक्षांना नष्ट करा !

One Response to “पाकमधून येणार्‍या रेल्वे प्रवाशांवर ध्वनीचित्रीकरणाद्वारे करडी (?) नजर !”

  1. yogeshborsepatil Says:

    i am very happy & inspire
    such a very good


Leave a Reply