`न्यू सह्याद्री इंडस्ट्रिज लि.’, `स्वस्तिक रूफिंग लि.’ या कंपनीकडून जाहिरातीमध्ये देवतांचे विडंबन

जोपर्यंत हिंदू धर्महानी रोखण्यासाठी जागे होत नाहीत, तोपर्यंत असे घडतच रहाणार !

आमच्या भवानी सभागृहामध्ये `न्यू सह्याद्री इंडस्ट्रिज लि.’, `स्वस्तिक रूफिंग लि.’ या कंपनीचा संसारे ग्रुपमार्फत नुकताच जाहिरातींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात कंपनीकडून एक मराठी चित्रफित दाखवण्यात आली. स्वस्तिक सिमेंट पत्रा कसा मजबूत आहे, हे दाखवण्यासाठी कंपनीने चित्रगुप्‍त, ब्रह्मदेव व यमदेव यांचा जाहिरातीसाठी विडंबनात्मक वापर केला.

(हिंदू निद्रिस्त असल्यामुळेच कोणीही धर्म व देवता यांवर सहज टीका करण्याचे धाडस करतो. असे धाडस मुसलमान किंवा ख्रिस्ती यांबाबत केल्यास त्याचे परिणाम काय होतील, हे सर्वांनाच माहीत आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे ! – संपादक)
वीस मिनिटांची चित्रफित दाखवून झाल्यावर कंपनीचे पदाधिकारी यांनी उपस्थित ६० लोकांना चित्रफित आवडल्याचे विचारताच सर्वांनी `चांगली आहे’ व `आवडली’, असे सांगितले; परंतु त्यातील विडंबनात्मक भाग पाहून मला चीड आली. मी कंपनीच्या पदाधिकार्‍यांकडून ध्वनीक्षेप हातात घेतला व `मला काही सांगायचे आहे’, असे सांगून मी त्यांचे खालीलप्रमाणे प्रबोधन केले. साहेबांनी चित्रफित बघून आवडली, असे विचारताच तुम्ही होकार दिलात. यात आपल्या देवतांचे विडंबन आहे. ज्या देवतांना आपण पू्ज्य मानतो, त्याचा यांनी जाहिरातीसाठी वापर करून विडंबन केले आहे. हे योग्य आहे का ? बर्‍याचशा कंपन्या हे असे विडंबन करत आहेत. आपण ते खपवून घेत आहोत. केवळ हिंदूंच्याच देवतांचे विडंबन केले जाते आणि हिंदूच ते सहन करतात. आपण ज्या देवतांकडे नवस करतो, उपास-तापास, व्रत वैकल्ये करतो, त्या देवतांचे हे विडंबन तुम्ही सहन करून घेऊ नका. (असे निर्भिडपणे सांगून हिंदूंमध्ये जागृती करणारे धर्माभिमानी हिंदू हिच धर्माची खरी शक्‍ती आहे. – संपादक) जेथे असे दिसेल, तेथे विरोध करा. अशी मी तुम्हा सर्वांच्या चरणी मस्तक ठेवून विनंती करतो. मी सनातनच्या माध्यमातून साधना करत असल्याने मला हे कळते. आपणही यात सहभागी व्हा. त्यानंतर श्री. दिलीप सेवाकरी व श्री. पवार यांनी आम्ही केवळ करमणूकीकरता म्हणून हे दाखवले. (हिंदूंनो, करमणूकीसाठी देवतांचा वापर करणार्‍यांना चांगला धडा शिकवा व धर्म आणि देवता यांचे विडंबन करणार्‍या कंपन्यांच्या उत्पादनावर बंदी घाला ! – संपादक) त्यावर मी म्हणालो, `तुम्हा मिडियावाल्यांना आमच्या हिंदूंच्या देवता कशा दिसतात ? तुमची हिंमत असेल, तर अन्य धर्मियांचे असे विडंबन करून दाखवा. कुठे दूरच्या देशात घडलेल्या घटनेचे सोलापुरात पडसाद उमटतात.’ यावर ते दोन्ही साहेब म्हणाले, पुढील वेळेस असा भाग असणार नाही. याची तुम्हाला खात्री देतो. आम्हीही हिंदु आहोत. (केवळ जन्माने हिंदु असून उपयोग नाही, तर कर्महिंदु होण्यासाठी धर्महानी रोखण्यासाठी पुढे आले पाहिजे. – संपादक) ध्वनिक्षेपक हातात घेऊन निर्भिडपणे बोलायचे सामर्थ्य मला प.पू. डॉक्टर यांनीच दिले. दुसर्‍या दिवशी उपस्थितांपैकी काही जणांना मी विचारल्यावर त्यांनाही हे चुकीचे आहे, हे पटले. त्यावर माझ्या मनात विचार आला. प.पू. डॉक्टरांनी पेरलेले बी शंभरनंबरी आहे. आम्ही साधकांनी जमीन कसून भरघोस पिक घ्यायला हवे.

विडंबनात्मक भाग
जाहिरातीमधील एका दृष्यात चित्रगुप्‍त, इंद्र व यम या देवतांचा उपयोग केला आहे. जाहिरातीमधील नायक त्यांना पृथ्वीवर तमाशा दाखवायला आणतो व त्यांना म्हणतो, `ये तुझे रेडकू माझ्यासमोर आणू नकोस.’ तिघांना सांगतांना `तुम्ही आधी खाऊन पिऊन घ्या. आधी पिऊन मग खाल्ल तरी चालेल.’ तमाशातील बाईकडे निर्देश करून `तुम्हाला आवडली का हो ? तुमच्या स्वर्गातील अप्सरेपेक्षा चांगली आहे.’ (हे सर्व वाचून ज्याचे रक्‍त सळसळत नाही, ते हिंदूच नव्हेत ! – संपादक) अशाप्रकारे देवतांचा वापर व त्यांचा एकेरी उल्लेख या जाहिरातीत करण्यात आला आहे.
वरील घटनेनंतर काही दिवसांनी कंपनीच्या वरील दोन्ही पदाधिकार्‍यांकडे संपर्क साधला असता त्यांनी `ती चित्रफित आम्ही पुन्हा दाखवली नाही व यापुढेही दाखवणार नाही, असे सांगितले.’ – श्री. रवींद्र सदाशिव संसारे, शृंगारतळी, तालुका – गुहागर, जिल्हा – रत्‍नागिरी.

मित्रांना पाठवा | - वाचक संख्या 1 – वाचक संख्या |  छापील प्रत

निगडीत वृत्त : हे वाचून ज्याचे रक्त सळसळत नाही, तो हिंदू नव्हे

Leave a Reply