ध्वजारोहणानंतर ध्वजवंदन न करता व राष्ट्रगीत न म्हणता शाळेला सुटी दिली ! जाब विचारणार्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मुख्याध्यापकाकडून उर्मट उत्तरे !
August 17, 2008 — dainiksanatanprabhat
स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीत न म्हणणारा मुसलमान मुख्याध्यापक राष्ट्रद्रोहीच होय !
उत्राण (जिल्हा जळगाव) येथील मुसलमान मुख्याध्यापकाचा राष्ट्रद्रोह !
उत्राण (तालुका एरंडोल), १६ ऑगस्ट (वार्ता.) – जळगाव जिल्ह्यातील उत्राण या
गावातील उर्दू शाळेतील मुसलमान मुख्याध्यापकाने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहणानंतर ध्वजवंदन न करता व राष्ट्रगीत न म्हणता विद्यार्थ्यांना सुटी दिली.
(या प्रकारे राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्यांना या राष्ट्रात रहाण्याचा काय
अधिकार ? – संपादक) या घटनेचा जाब विचारायला गेलेल्या अखिल भारतीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना या मुख्याध्यापकाने “ये हमारे धर्मके खिलाफ है”, असे उर्मट उत्तर दिले. (मुसलमानांना हे उत्तर मान्य आहे का ? या मुख्याध्यापकाचा त्वरित जाहीर निषेध करून मुसलमानांनी ते देशप्रेमी असल्याचे सिद्ध करावे ! – संपादक) या शिक्षकाने `भारतमाता की जय’ या घोषणेऐेवजी `सोनिया गांधीकी जय’, अशी घोषणा मुलांना द्यायला लावली. (काँग्रेसजनांनी या घटनेचा खरोखरीच अंतर्मुख होऊन विचार करावा अन्यथा राष्ट्राभिमानी भारतीय नागरिक या घटनेवरून काय समजायचे, ते समजून गेले आहेतच ! – संपादक) याबाबत विचारणार्या अखिल बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना त्या मुख्याध्यापकाने “तुम्हें जो करना है, वो करो”, असे उर्मट उत्तर दिले. हा वृत्तांत या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय बजरंग दलाचे अध्यक्ष श्री. प्रमोद भोईटे यांना जळगाव येथे कळवल्यानंतर त्यांनी या शिक्षकाविरुद्ध जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी व शिक्षणमंत्री यांना निवेदन देण्याच्या सूचना केली. त्याप्रमाणे गावाचे सरपंच, तलाठी व पंचमंडळ यांनी ठराव करून निवेदन तयार केले आहे. (देशभक्त नागरिकांनो, या राष्ट्रद्रोही शिक्षकाला कडक शिक्षा होईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करा ! – संपादक)