जम्मू-काश्मीर गेले दोन महिने होरपळतेय ! अमरनाथ जमीन हस्तांतर प्रकरणामुळे पहिले श्रीनगर व नंतर जम्मू पेटले. काश्मीरमधील या दोन राजधान्या गेले दीड महिना संचारबंदीच्या छायेत वावरल्या. तथापी धर्मांध मुसलमानांनी श्रीनगर येथे केलेले उग्र व हिंसक आंदोलन हिंदूंवर अन्याय करणारे होते. मुसलमानधार्जिणे सरकार या आंदोलनासमोर नमले व त्यांनी जागा परत घेतली. सरकारच्या अन्याय्य धोरणाचा निषेध करण्यासाठी सहनशीलतेचा अंत झालेले जम्मूतील धर्माभिमानी हिंदू गेली दीड महिना रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत. हे आंदोलन न्याय्य आहे. त्यामुळे त्याची दाहकता देशभर पसरली आहे !
काश्मीरमधील धर्मांधांनी व सत्ताधार्यांनी अमरनाथ यात्रेकरूंवर केलेल्या अन्यायाच्या
विरुद्ध देशातील सर्व सत्ताधारी हिंदू राज्यकर्ते `ब्र’ही का काढत नाहीत ?
गेली १६० वर्षे अमरनाथ यात्रा अखंडपणे चालू आहे. आषाढ पौर्णिमा ते श्रावण पौर्णिमा या काळात दररोज हजारो हिंदू या तीर्थक्षेत्री दर्शन घेण्यासाठी येतात. तरी अजूनही श्री अमरनाथ गुंफेजवळ रहाण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे यात्रेकरूंना पहाटे निघून संध्याकाळपर्यंत आपल्या पडावावर परत यावे लागते. बालतलमार्गे यात्रेकरूंना जातांना १६ कि.मी. व येतांना १६ कि.मी. असे एकूण ३२ कि.मी. अंतर एकाच दिवसात पायी कापावे लागते. या प्रवासादरम्यान लागणारे खाण्यापिण्याचे सर्व साहित्य त्यांना निघतांनाच बरोबर घ्यावे लागते. अमरनाथ यात्रेला येणार्या भाविकांना अत्यंत प्रतिकूल व लहरी हवामानामुळे व मूलभूत सोयीसुविधांच्या अभावामुळे कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागते. या यात्रेच्या मार्गात प्रत्येक पडावावर भाविकांची सोय तात्पुरत्या तंबूमध्ये केलेली असते. वनखात्याच्या जमिनीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करायला परवानगी नसल्याने यात्रेकरूंना नैसर्गिक विधी करता यावेत; म्हणून जमिनीत चर खणून त्याभोवती गोण्यांचा आडोसा करण्यात येतो. यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात तर परिस्थिती अजूनच बिकट आहे.
(हिंदूंनो, हज यात्रेकरूंसाठी हज घरे उभारणार्या व त्यात त्यांना पंचतारंकित सुविधा देणार्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांचा हिंदू यात्रेकरूंबद्दलचा हा उदासीनपणा जाणा ! – संपादक )




August 19, 2008 at 2:58 am
jammutil hinduncha ha aadarsh, bhartatil sarv hindunni aangikarava aasach aahe. Hindunna ya deshat manane jagayache aslyas tyan asa ladha dyavach lagel—-shashi