राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र पोलिसात मुसलमानांचा सामावेश करण्याचा विचार करत आहेत. हा निर्णय होण्यापूर्वी हिंदूंनी आपल्या हिताच्या गोष्टी कोणत्या ते सर्वप्रथम निश्चित केले पाहिजे. काँग्रेसवर मुस्लीम लांगूलचालनाचा कितीही आरोप झाला, तरी गृहमंत्रीपद मुसलमानाला द्यायचे नाही, हा अलिखित नियम काँग्रेसने अव्याहतपणे काटेकोरपणे पाळला आहे. तेव्हा मुसलमानांना आधी भारतभक्त बनू द्या. जेवढा हिंदू या देशावर प्रेम करतो, तेवढे मुसलमानांनाही करायला शिकवा. `अनिर्बंध संतती कि पोलिसांत नोकरी’ असा पर्याय समोर ठेवा आणि मुसलमान काय उचलतात, ते पहा. मग निर्णय घेणे योग्य ठरेल !
लेखक – ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी
मुसलमानांना पोलिसांच्या नोकरीत घेण्यापूर्वी हिंदुहित निश्चित करा !
मुसलमानांनी पोलिसांत भरती व्हावे; म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख आपला जीव पाखडायला उत्सुक आहेत. सोनिया गांधींच्या सरकारने सच्चर समितीचे प्रतिवृत्त तंतोतत कार्यवाहीत आणायचे ठरवले आहे. `हिंदु मुसलमानांशी चांगले वागत नसल्यामुळे ते मागास राहिले’, असा निष्कर्ष समितीने काढल्यामुळे थेट पोलिसांतच भरती करून `आम्ही तुमच्याशी किती चांगले वागतो, ते पहा’, असे म्हणत मुसलमानांची समजूत काढण्याचा प्रयत्न काँग्रेसने करायचा ठरवले आहे. मुसलमान पूर्वी हिंदु होते. ते भारताचे नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना चाकरी देऊन त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न थोडाफार सोडवण्यात हिंदंूना आनंदच होणार आहे.
तरीसुद्धा हिंदु मुसलमानाला नोकरी देणार असल्यामुळे हिंदूने आपल्या हिताच्या गोष्टी कोणत्या ते सर्वप्रथम निश्चित केले पाहिजे. त्यानंतर मुसलमानांना पोलिसांत घेतले, तर त्यांच्याकडून हिंदुहिताचे पुरेसे संरक्षण होईल का, हा प्रश्न हिंदूंनी सोनिया गांधी इत्यादी कोणाचेही चित्र डोळयांपुढे न आणता स्वत:च्या छातीवर हात ठेवून विचारला पाहिजे.
मुसलमान हिंदुहिताशी किती प्रामाणिक आहेत. याविषयी पुढील माहिती वाचतांना मुसलमानांचे अनुभव मोहनदास गांधी आणि सी. सुब्रह्मण्यम यांना कसे आले, ते प्रथम लक्षात घेतले पाहिजेत. हिंदु-मुस्लीम ऐक्याचे गेली ३२ वर्षे आपण सातत्याने प्रयत्न केले; पण आपल्याला काहीही यश आले नाही, असे गांधी त्यांच्या अंतकाळी म्हणत असत. दुसरे सी. सुब्रह्मण्यम हे केंद्रीय कृषीमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होते. त्यांचे एक वाक्य आहे की, काश्मीरमधील विकासावर उर्वरित भारताने गेल्या ५० वर्षांत एक लाख कोटी रुपये खर्च केले. तेथील मुसलमानांना आटोकाट प्रयत्न करून सुखांत ठेवण्याचा प्रयत्न भारताने केला; पण मुसलमानांचे प्रेम त्याला मिळवता आले नाही.
गुन्हेगारी आणि पोलिसीनीती !
सर्वसामान्य हिंदु आणि मुसलमान माणसाचे हितसंबंध आणि त्या हितसंबंधाचे रक्षण करणारे पोलीस यांचे हितसंबंध सर्वसाधारणपणे समान आहेत का, हे बघणे हा साधा व्यवहार आहे.
पोलिसांचे काम अपराध शोधणे, तसे अपराध पुन्हा होऊ नये; म्हणून धाक निर्माण करणे, जे संशयित आहेत त्यांना शिक्षा होईल, असे खरेखुरे पुरावे गोळा करणे आणि जे दंडित आहेत त्यांना शिक्षा पुरेपूर भोगायला लावणे, हे असते. `परित्राणाय साधुनाम विनाशायच दुष्कृताम, हे पोलिसांचे ब्रीद असते. सर्वसाधारण नीतीमत्तेचे दंडक समाजाने पाळले पाहिजेत आणि संसद वा विधिमंडळ जे निर्बंध पारित करेल, त्याचा आदर केला जाईल, हे पहाण्याचे काम पोलिसांचे असते. काही गुन्हे पोटासाठी होतात, काही रागापोटी, अभिमानापोटी, क्षणिक आवेगापोटी होतात. हे जे किरकोळ गुन्हेगार असतात, त्यांचे राज्यशासनाशी आणि त्याच्या उद्घोषित उद्दिष्टांशी काही भांडण नसते. किरकोळ गुन्हेगारांच्या दृष्टीने पोलीस म्हणजेच शासन किंवा सरकार असते. त्याच्या गुन्हा करण्याच्या मार्गात पोलीस आडवा येतो; म्हणून त्याचे पोलिसांशी भांडण असते; पण राष्ट्रपे्रम या विषयात गुन्हेगाराचे पोलिसांशी एकमत असते.
गृहमंत्रीपद मुसलमानाला द्यायचे नाही, हा काँग्रेसचा अलिखित नियम !
गुन्हेगारांमध्ये हिंदु आणि मुसलमान असे दोन भाग असतात. पोलिसांमध्ये प्रामुख्याने हिंदूच असतात. सैन्यात आणि पोलिसात मुसलमानांना घेऊ नये, असा अलिखित नियम आहे. घ्यावे लागलेच तर नाजूक कामे त्यांच्याकडे देऊ नयेत, हे पथ्य पाळले जाते. विश्वनाथ प्रतापसिंग यांनी पंतप्रधान झाल्यावर मुफ्ती महंमद सईद यांना गृहमंत्री नेमले, तेव्हा शंकरराव चव्हाण अतिशय कृद्ध झाले होते आणि मलबार हिलवरील सह्याद्री अतिथीगृहात आपला संताप त्यांनी माझ्याजवळ व्यक्त केला होता. काँग्रेसवर मुस्लीम लांगूलचालनाचा कितीही आरोप झाला, तरी गृहमंत्रीपद मुसलमानाला द्यायचे नाही, हा अलिखित नियम काँग्रसने अव्याहतपणे काटेकोरपणे पाळला आणि त्याचे उल्लंघन पहिल्यांदा विश्वनाथ प्रतापसिंगांकडून झाले, हे मला बारकाव्यानिशी समजावून सांगण्यात शंकररावांनी एक संध्याकाळ खर्च केली आहे. तेव्हा अपराध्यांमध्ये हिंदु आणि मुसलमान असे दोन भाग असले तरी पोलिसांत तसे दोन भाग निर्माण करणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक ठरणार आहे, हे विलासरावांनी लक्षात ठेवले पाहिजे.
राष्ट्रप्रेमाविषयी मुसलमान हिंदूंना संशयास्पद वाटत असतात !
मुसलमानांना पोलिसांत घेऊ नये, या भूमिकेमागे वैयक्तिक रागलोभ नसून तात्त्विक आणि मूलग्राही कारणे आहेत. पोलिसांचे दायित्व निष्ठेने पार पाडण्याइतके प्रगल्भ मन मुसलमानांजवळ नाही. त्याला मुसलमानांप्रमाणे हिंदूही कारणीभूत आहेत. लहान मुलांना आपण काचसामानाला हात लावू देत नाही. त्याचे कारण त्या मुलांविषयी आपल्या मनात वाईट भावना असते, असे नाही. काचेच्या वस्तू लहान मुलांना नीट सांभाळता येणार नाहीत आणि त्यांच्या हातून त्या फुटू शकतात, हे कारण असते. याचा अर्थ आपण लहान मुलांना काचेच्या वस्तूंना कधीच हात लावून देणार नसतो, असे नाही. उलट अशा वस्तू कशा हाताळाव्या आणि सांभाळाव्या, याचे शिक्षण आपण मुलांना द्यायला सुरुवात केलेली असते. ते शिक्षण पूर्ण होऊन काचवस्तू फुटणार नाही, असा विश्वास मुलांच्याकडून मिळत नाही, तोपर्यंत आपण त्यांच्याकडे संशयानेच पहात असतो.
हिंदु मुसलमानांकडे संशयाने पहातात; कारण `राष्ट्र’ हा अत्यंत संवेदनशील विषय कसा हाताळावा, याचे प्रशिक्षण त्याला अद्याप मिळालेले नाही. राष्ट्रावर प्रेम करायला हिंदूला शिकवावे लागत नाही. जगत्जननी भारतभूच्या रूपाने अवतरली आहे, अशी त्याची श्रद्धा आहे. जन्मत:च तो मातृभक्त आणि देशभक्त असतो. या देशाबाहेर त्याला श्रद्धास्थान नाही. गंगानदीला तो गंगामैया म्हणतो. प्रादेशिक भाषाभेदामुळे भारताची एकात्मता धोक्यात येत नाही. संस्कृत हा मूलस्रोत म्हणजे रिझर्व्ह बँक आहे आणि तिने सर्व भाषाभगिनींना धरून ठेवले आहे. उत्तर भारतातील हिंदूंना मुक्त करण्यासाठी मराठ्यांची एक लाख बांगडी फुटते, तेव्हा सह्याद्रीच्या मावळयांना विशेष त्याग केल्याचा अभिमान नसतो. आपण जन्मदत्त कर्तव्य केले, अशी त्याची भावना असते. पुन्हा पानिपतावर चालून जाण्यासाठी अब्दालीच्या विरुद्ध दंड थोपटून तो उभा रहातो. सावरकर गोदाकाठी जन्मले; पण सिंधू मुक्त केल्यावाचून महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार अगदी सहजपणे त्यांच्या तोंडून बाहेर पडतो.
परकीय आक्रमणाच्या वेळी मुसलमानांची भारतनिष्ठा दोलायमान होऊ शकते ! – इति डॉ. बाबासाहेब आंबेडकर
देशावर परकीय आक्रमण होते, तेव्हा हिंदू हे आक्रमकांना आतून सामील होतील, अशी भीती पोलिसांना नसते. हिंदूंचे पक्षीय मतभेद राष्ट्रीय आपत्तीत गळून पडतात. भारत-पाक १९६५ च्या युद्धात दिल्लीतील वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी लाल बहादूर शास्त्रींनी रा.स्व. संघाची साहाय्यता घेतली होती. दंगे होतात तेव्हा मुस्लीम वस्तीत पोलीस बंदोबस्त वाढवावा लागतो. दंग्यात हिंदूंनी भरपूर मार खाल्ला असून आता तरी मुसलमानांना आवरण्यासाठी आम्हाला अधिकार द्या, अशा विनवण्या करत पोलीस अधिकार्यांना सत्ताधिशांच्या दारात उभे रहावे लागते.
तात्पर्य हे आहे की, मनुष्यामध्ये विविध कारणांनी ज्या कमीअधिक प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती असतात, त्याचा अतिरेक होऊन उद्रेक झाला की, तेवढा नियंत्रणात आणणे एवढेच काम हिंदु समाज पोलीस यंत्रणेला पुरवतो. हिंदु देशाला धोका देणार नाही, ही निश्चिती असल्याने प्रत्येक हिंदूंकडे संशयाने पहावे लागणार नाही आणि हिंदु वस्तीत बंदोबस्त ठेवावा लागणार नाही, हे पोलिसांना माहीत असते. असे मुसलमानांविषयी म्हणता येणार नाही. पाकिस्तान निर्मितीला भारतातील सर्व भागांतील मुसलमानांनी पाठिंबा दिल्यामुळे पाकिस्तानचे आक्रमण होते. तेव्हा येथील मुसलमान आतून काय करतील, हे शोधण्यासाठी पोलिसांना धावपळ करावी लागते. परकीय आक्रमणाच्या वेळी मुसलमानांची भारतनिष्ठा दोलायमान होऊ शकते, असे स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून ठेवले आहे.
देशांतर्गत सुरक्षा यंत्रणेत दुफळी करणे, हे अराजकाचे संकट ओढावून घेण्यासारखे आहे !
अर्थात मुसलमानांच्या संशयास्पद वागण्याविषयी संपूर्ण दोष मुसलमानांना देता येणार नाही. मुसलमानांना बदलण्यासाठी हिंदूंनी करायला पाहिजे, तेवढे प्रयत्न केले नाहीत. हा दोष हिंदूंनी स्वीकारला पाहिजे. हिंदु आणि मुसलमान ही दोन स्वतंत्र आणि युद्धमान राष्ट्रे आहेत आणि त्यांचे सहजीवन अशक्य आहे, असे १८८८ मध्ये सर सय्यद अहमद यांनी उद्घोषिल्यानंतर मुसलमानांची स्वतंत्रता आणि युद्धमानता नष्ट करून ते प्रेमाने आणि शांतीने हिंदूंशी वर्तन करतील, असे संस्कार हिंदूंनी करायला हवे होते; परंतु गांधीयुग सुरू झाले आणि नंतर नेहरूंच्या हाती देशाचा कारभार गेला आणि मुसलमान हिंदूंसारखे देशभक्त होतील, ही शक्यता संपली. मुसलमान या देशाला आई मानीत नाहीत, ते भारताला दार-उल्-हरब म्हणजे परक्याची भूमी मानतात. ही भूमी जोपर्यंत दार-उल्- इस्लाम होत नाही, तोपर्यंत येथील लोकांशी म्हणजे हिंदूंशी जिहाद करून त्यांना संपवणे, हे मुसलमान धार्मिक कर्तव्य समजतात. या देशाविषयी शत्रूभाव बाळगणार्या लोकांतून काहींची पोलिसांत भरती करणे म्हणजे देशांतर्गत सुरक्षा यंत्रणेत दुफळी करणे, हे अराजकाचे संकट ओढवून घेण्यासारखे आहे.
तेव्हा मुसलमानांना आधी भारतभक्त बनू द्या. जेवढे हिंदू या देशावर प्रेम करतो, तेवढे मुसलमानांनाही करायला शिकवा. भारतावर प्रेम करण्याच्या मोबदल्यात हिंदु काही मागत नाही. तसे निरपेक्ष प्रेम करण्याचा संस्कार मुसलमानांवर करूया. भारतप्रेमाची पहिली साक्ष म्हणजे समान नागरी संहिता मुसलमानांनी मान्य करणे. ज्याला सर्व बायकांची मिळून दोनच मुले आहेत, त्याच मुसलमानाला पोलिसांत भरती होता येईल, असे सरकारने घोषित करावे, `अनिर्बंध संतती कि पोलिसांत नोकरी’, असा पर्याय समोर ठेवा आणि मुसलमान काय उचलतात, ते पहा. मग निर्णय घेणे योग्य ठरेल. देशहिताचे ठरेल.
| मित्रांना पाठवा | 8 – वाचक संख्या | छापील प्रत
निगडीत वृत्त : लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार
|





