हिंदूंनो, एक दिवस आंदोलन करून थांबू नका, तर
जम्मूवासियांप्रमाणे समस्या सुटेपर्यंत आंदोलन करा !
नवी दिल्ली, १३ ऑगस्ट (प्रे.ट्र.) – अमरनाथ मुद्यावर आज विश्व हिंदु परिषदेने केलेल्या देशव्यापी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “काश्मीरचे राज्यपाल श्री. एन्.एन्. व्होरा यांना हटवण्यात यावे, तसेच अमरनाथ देवस्थान मंडळाला १०० एकर जमीन परत करण्यात यावी”, यासाठी विहिंपने देशव्यापी `चाक बंद’ आंदोलन केले. या आंदोलनामुळे दिल्लीतील विकास मार्ग, अक्षरधाम, दीपाली चौक, वझीपूर, मूलचंद व दिल्ली ते जयपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोलमडली. या वेळी विहिंपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
दिल्लीतील आंदोलनामध्ये संघ तसेच भाजपचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे नेते श्री. हर्षवर्धन यांनी केले. आज आंदोलनकर्त्यांनी भोपाळ शताब्दी एक्स्प्रेस रोखली. “विहिंपने छेडलेले हे आंदोलन अयोध्या आंदोलनाच्या धर्तीवर राष्ट्रव्यापी करण्यात येईल”, असे वक्तव्य विहिंपचे नेते श्री. प्रवीण तोगाडिया यांनी केले. या आंदोलनाची पार्श्वभूमी सांगतांना विहिंपचे नेते श्री. जुगलकिशोर म्हणाले, “गेले ४० दिवस जम्मूमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आंदोलनामध्ये ११ हिंदू ठार झाले; मात्र संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार अल्पसंख्यांकांना चुचकारण्यासाठी एकगठ्ठा मताचे राजकारण करत आहे.”
बडोदा, गुजरातमधील वाहतूक ठप्प
आज बडोदामध्ये विहिंपच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखून धरली. येथील मांडवी व रेस कोर्स परिसरातील वाहतूक ठप्प झाली. आंदोलन करणार्या ५५ कार्यकर्त्यांना आज पोलिसांनी अटक केली, अशी माहिती विहिंपचे स्थानिक नेते श्री. अजित जोशी यांनी दिली.
जालंधर, पंजाबमध्ये आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आंदोलनकर्त्यांनी दोन तास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. आंदोलनकर्ते पीएपी चौक व राममंडई चौकांत जमा झाले व त्यांनी वाहतूक रोखली. काही आंदोलनकर्त्यांनी जालंधर-फिरोझपूर एक्स्प्रेस रोखून धरली. आज शहरात मुसळधार पाऊस पडत असतांनाही त्याची पर्वा न करता आंदोलनकर्त्यांनी वाहतून रोखली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता; मात्र आंदोलनकर्त्यांचा उत्साह पाहून पोलिसांनी या आंदोलनाकडे बघ्याची भूमिका घेतली व आंदोलन करण्यास आडकाठी आणली नाही.
ओरिसामध्ये जनजीवन विस्कळीत
आज आंदोलनकर्त्यांनी कटक, बेहरामपूर, संबलपूर, सुंदरगढ व बोलानगीर येथे `चाक बंद’ आंदोलन केले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणा दिल्या व वाहतुकीची
कोंडी केली. आंदोलनामुळे भुवनेश्वरमधील जनपथ, राजमहल, मास्टर कॅनटिन येथील परिसरातील वाहतूक कोलमडली.
उत्तरप्रदेश, झारखंड व छत्तीसगड येथील वाहतूक विस्कळीत
झारखंडमधील आंदोलनामध्ये भाजपचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. राज्यातील बिरसा चौक, इलबर्थ इक्का चौक, पिस्का मोरे चौक येथील वाहतूक विस्कळीत झाली होती.
उत्तरप्रेदशची राजधानी लखनौ येथे आंदोलनकर्त्यांनी ठिकठिकाणी वाहतूक रोखली व
२५ आंदोलनकर्त्यांनी बाग एक्स्प्रेस रोखून धरली. पोलीस घटनास्थळी रवाना झाल्यावर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. येथील हुसेनगंज परिसरातील वाहतूक आंदोलनकर्त्यांनी रोखून धरली. त्या वेळी पालिसांनी १० आंदोलनकर्त्यांनी अटक केली.
छत्तीसगड राज्यात विहिंपने केलेल्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली. राज्यातील बस्तर, बिलासपूर, दुर्ग, सारगुजा या जिल्ह्यांमध्ये विहिंपने `चाक बंद’ आंदोलन केले. `हे आंदोलन शांततेत पार पडले’, असे विहिंपने सांगितले आहे.
बिहारमध्ये १ हजार भाजप कार्यकर्त्यांनी स्वत:हून अटक
आज पाटणामध्ये भाजपच्या १ हजार कार्यकर्त्यांनी स्वत:हून अटक करून घेतली. आजच्या आंदोलनामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी ठिकठिकाणी वाहतूक रोखून धरली. आंदोलनकर्त्यांनी विमानतळाकडे जाणारा मार्गही रोखून धरला, तसेच काही काळ रेल्वे वाहतूक रोखून धरल्यामुळे रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकारवर परिणाम झाला.
तामिळनाडूमध्ये आंदोलनकर्त्यांना अटक
आज चेन्नईमध्ये आंदोलन करणार्या भाजप व विहिंप यांच्या सहाशेहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते श्री. एल्. गणेशन व विहिंपचे आर्.बी.व्ही.एस्. मणीयन यांचा समावेश आहे. त्यांनी अण्णा सलाई रोखून धरण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांना एका सभागृहामध्ये ठेवण्यात आले होते.
नाशिकमध्ये १५० आंदोलनकर्त्यांना अटक
नाशिकमध्ये विहिंप व भाजप यांच्या १५० कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. द्वारका पॉइंर्ट’ परिसरात आंदोलन करत असतांना त्यांना अटक करण्यात आली. आंदोलनामुळे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग व नाशिक-पुणे महामार्गाच्या वाहतुकीवर परिणाम झाला.
जम्मूमध्ये अमरनाथ संघर्ष समितीचा भव्य मोर्चा
जम्मूमध्ये अमरनाथ संघर्ष समितीने भव्य मोर्चा काढला. या मोर्च्यामध्ये १५ हजाराहून अधिक आंदोलक सहभागी झाले होते. शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असतांनाही समितीने हा मोर्चा काढला. कठुआ, उधमपूर व सांबा या शहरांमध्येही आज समितीच्या सदस्यांनी मोर्चा काढला.
किश्तवर येथे दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश
अमरनाथ मुद्यावर किश्तवर शहरात काल हिंदू व मुसलमान यांच्यात दंगल उसळली. यामुळे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांना दिसताच क्षणी गोळया घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी लोकांना घरातून बाहेर न पडण्याचे आदेश ध्वनीक्षेपकावरून दिले. श्रीनगरमध्ये विविध ठिकाणी हिंसक जमावाने सुरक्षाजवानांवर दगडफेक केली. काश्मीरमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्या गाड्या अमरनाथ संघर्ष समितीच्या आंदोलनकर्त्यांनी रोखून धरल्याचा आरोप काश्मीरमधील मुसलमान करत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी गेले दोन दिवस काश्मीरमधील मुसलमानांनी खोर्यात हिंसाचार केला. दोन दिवस चाललेल्या या हिंसाचारामध्ये २१ जण ठार झाले. आज नवाकडाल, फतेहकडाल, करणनगर, नतीपाडा व बेमिना या परिसरात हिंसक जमावाने सुरक्षाजवानांवर दगडफेक केली. असे असतांनाही शहरातील संचारबंदी काही काळ शिथिल करण्यात आली. मागील तेरा वर्षांत प्रथमच संपूर्ण काश्मीर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मुंबई व ठाणे येथे शेकडो कार्यकर्त्यांना अटक
हिंदूंनो, केवळ एक दिवस आंदोलन करून थांबू नका, तर अमरनाथ
देवस्थानाला त्याची जमीन परत मिळेपर्यंत सनदशीर मार्गाने आंदोलन सुरूच ठेवा !
मुंबई, १३ ऑगस्ट (वार्ता.) – काश्मीरमधील श्री अमरनाथ देवस्थान मंडळाला जमीन परत देण्यात यावी, या मागणीसाठी गेले ४५ दिवस जम्मूमधील हिंदु धर्मीय एकाकी आंदोलन करत आहेत. या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आज विश्व हिंदु परिषदेने देशभर `रस्ता बंद’ आंदोलन केले. महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरांसह, नागपूर, वर्धा, नाशिक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात विहिंप व बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या वेळी शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
मुंबईतील मालाड, अंधेरी येथील सबवे; शीव, बोरीवली, गिरगाव आदी सर्व ठिकाणी विहिंपच्या कार्यकर्त्यांनी रस्ता बंद आंदोलन केले. नवी मुंबईत काही ठिकाणी जाळपोळ केली. नागपूर, वर्धा, यवतमाळ, पुणे, नाशिक या ठिकाणीही सकाळी विहिंपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवरील वाहतूक अडवली. सकाळी ९ ते ११ या वेळेत हे आंदोलन सर्वत्र करण्यात आले. या वेळी पोलिसांनी ठिकठिकाणी आंदोलनकर्त्यांना अटक केली. या आंदोलनामागे `अमरनाथ देवस्थानाला जमीन द्यावी’, या मागणीसोबत `अमरनाथ यात्रेचे नियंत्रण राज्यपालांकडून काढून ते श्री अमरनाथ देवस्थान मंडळाकडे देण्यात यावे’, याही मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे, असे विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय संघटक प्रा. व्यंकटेश आबदेव म्हणाले. वसई येथे स्वामी करुणानंद यांनी श्री अमरनाथ देवस्थान मंडळाला जमीन देण्यात यावी, यासाठी महापूजा व रुद्राभिषेक केला.
प्रसारमाध्यमांचे आकांडतांडव !
आज देशभर विहिंपचे आंदोलन जोर धरत असतांना प्रसारमाध्यमांनी मात्र थेट विहिंपच्याच विरोधात मोर्चा सुरू केला. (हिंदुबहुल भारतात स्वत:चे पोट भरून उघड उघड हिंदुत्वविरोधी भूमिका घेणारी हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे ! हिंदूंनो, या हिंदुद्वेष्ट्यांचा सनदशीर मार्गाने निषेध करा ! – संपादक) रस्ता बंद आंदोलनात गाड्या थांबल्याने दोन रुग्ण ठार झाल्याची बातमी वारंवार दाखवून प्रसारमाध्यमांनी आकांडतांडव केले. (काश्मीरमध्ये आतापर्यंत हजारो हिंदू मृत्यूमुखी पडले व आजही दहशतवादी हिंदूंना वेचून काढून ठार मारत आहेत, याचा पुसटसा तरी उल्लेख या वाहिन्यांनी कधी केला आहे का ? – संपादक)
पुण्यात ६ ठिकाणी आंदोलन
पुणे, १३ ऑगस्ट (वार्ता.) – अमरनाथ देवस्थानाला दिलेली वनखात्याची जमीन जम्मू काश्मीर सरकारने परत घेतल्याच्या प्रकरणी आज पुण्यात विहिंपने रामवाडी जकात नाका, लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन चौक, मगरपट्टा सिटी, सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल, सेनापती बापट रस्त्यावरील वेताळबाबा चौक व वारजे जकात नाका अशा ६ ठिकाणी चाक बंद आंदोलन केले. लक्ष्मी रस्ता येथे सकाळी ९.३० वाजता कार्यकर्त्यांनी चाक बंद व निदर्शने सुरू केली. या वेळी कार्यकर्ते `अमरनाथ बाबा की जय’, `अमरनाथची जमीन मिळालीच पाहिजे’, `भारतमाता की जय’ आदी घोषणा देत होते. अर्धा तास चालू असलेल्या या आंदोलनामध्ये विहिंप, बजरंग दल, भाजप व संघ यांचे सुमारे ४० कार्यकर्ते उपस्थित होत. चाक बंद व निदर्शने केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी २५ ते ३० कार्यकर्त्यांना अटक केली.


