An error has occurred; the feed is probably down. Try again later.
जम्मूमधील हिंदूंनी सुरू केलेले धर्मरक्षणाचे आंदोलन राष्ट्रव्यापी बनवा !
August 13, 2008 — dainiksanatanprabhat
हिंदूंनो, अमरनाथ जमिनीबाबतच्या आंदोलनात लक्षावधींच्या संख्येने सहभागी व्हा !
मुंबई – १९८९ साली काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना मुसलमानांनी परागंदा केले. त्या वेळी या काश्मिरी हिंदूंचा आवाज उर्वरित हिंदूंपर्यंत पोहोचला नाही. जम्मूमधील मूठभर हिंदू श्री अमरनाथ देवस्थानाला सरकारी जमीन मिळावी, यासाठी प्राणपणाने आंदोलन करत असतांना जीवघेण्या बघ्याच्या भूमिकेत राहू नका ! हिंदूंनो, धर्मरक्षणासाठी अमरनाथ जमिनीच्या प्रकरणी सुरू झालेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनात हजारोंनी नव्हे, लक्षावधींच्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन सनदशीर मार्गाने यशस्वी करा, असे आवाहन सनातन संस्थेने केले आहे.
आज इचलकरंजीत `चक्का जाम’
इचलकरंजी, १२ ऑगस्ट (वार्ता.) – अमरनाथ देवस्थानला देऊ केलेली जमीन केवळ मुसलमान अतिरेक्यांच्या दडपणाला बळी पडून जम्मू-काश्मीर सरकारने परत घेतली आहे. याच्या निषेधार्थ अमरनाथ संघर्ष समितीने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी विश्व हिंदु परिषदेने १३ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतभर `चक्का जाम’ आंदोलन पुकारले आहे. `या आंदोलनासाठी १३ ऑगस्ट रोजी येथील जनता चौकात दुपारी १२ वाजता जास्तीतजास्त नागरिकांनी उपस्थित रहावे व अमरनाथ संघर्ष समितीला पाठबळ द्यावे’, असे आवाहन सद्गुरु बाळ महाराज व विश्व हिंदु परिषद, तसेच भारतीय जनता पक्ष, भाजप विद्यार्थी आघाडी, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था, श्री नरेंद्र संप्रदाय यांच्या पदाधिकार्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
Rites are the experiments of highest order, beyond the reach of science.
The various rites specified in Hindu dharma, right from birth of an individual till its death like marriage, rituals like Vastushanti and the rituals performed for a departed soul (... (More...)
– H.H. Dr. Jayant Athavale, Founder, Sanatan Sanstha