पुणे, १० ऑगस्ट (वार्ता ) – आपल्या देवतांनी हातात धारण केलेली शस्त्रे ही केवळ पूजेसाठी नाहीत. त्याचा त्यांनी योग्य वेळी वापर केला आहे. यातूनच प्रेरणा घेऊन हिंदूंनी इतिहास घडवण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार श्री. मधुकर सरपोतदार यांनी येथे केले. समस्त हिंदु आघाडीच्या वतीने खंडुजीबाबा चौकातील मशिदीच्या अनधिकृत बांधकामाला विरोध दर्शवण्यासाठी पुण्यातील सर्व गणेशमंडळांची बैठक शनिवारी शिवाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते.
या प्रसंगी व्यासपिठावर कर्नल श्री. सदानंद साळुंखे, समस्त हिंदु आघाडीचे अध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे, काश्मिरी हिंदु सभेचे सचिव श्री. रोहित भट व शिवसेनेचे नगरसेवक श्री. अजय भोसले हे मान्यावर उपस्थित होते. या बैठकीस पुण्यातील १३७ गणेशमंडळांच्या प्रतिनिधींसह सुमारे ४०० कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
श्री. सरपोतदार पुढे म्हणाले, “हिंदु धर्मियांना जी गोष्ट मागून मिळत नाही, ती मुसलमानांना मात्र लगेच मिळते. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळापासून हे लांगूलचालन चालत आलेले आहे. पुण्यातही जेथे मुसलमान वस्ती नाही, नमाज पडला जात नाही, तेथे मशिदीला परवानगी हवीच कशाला ? या प्रकरणात आपणही लक्ष घालणार असून सर्वसंबंधितांना पत्रे पाठवू.”
या वेळी त्यांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकार्यांशी चर्चा करण्याचे आश्वासनही दिले.
तर बाबरीची पुनरावृत्ती होईल – मिलिंद एकबोटे
डेक्कन येथील मशिदीचे सर्वार्थाने अनधिकृत बांधकाम रद्द झाले नाही, तर नाईलाजाने गणेशभक्तांना कायदा हाती घ्यावा लागेल व तेथे बाबरी मशिदीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा समस्त हिंदु आघाडीचे अध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे यांनी दिला. हिंदु बहुसंख्य असलेल्या या देशात अशी आंदोलने करावी लागणे, हेच अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. बांधकामाचे सर्व नियम डावलून व गृहखात्याचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे टाळून मशिदीला परवानगी देण्यापर्यंतचा सर्व इतिहास त्यांनी उपस्थितांना सविस्तर सांगितला. याबाबत नेमलेल्या नाईक समितीचाही सदर मशिदीबाबत प्रतिकूल अहवाल असतांनाही परवानगी देण्याचे कारणच काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एकीकडे रस्तारूंदीकरणाच्या नावाखाली शेकडो वर्षांपूर्वीचे संत ज्ञानेश्वर पादुका मंदिर हटवायचे, तर दुसरीकडे रस्तारूंदीकरणाची आवश्यकता असतांनाही ती रद्द करून मशिदीच्या अनधिकृत बांधकामाला परवानगी द्यायची, हा पुणे महापालिकेचा दुटप्पीपणा आहे, असा आरोपही त्यांनी केला. या वेळी कर्नल साळुंखे यांनी सर्वांना एकजूट होऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचे आवाहन केले.
क्षणचित्रे
* कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांचा `प्रेरणामंत्र’, तर शेवट `ध्येयमंत्र’ म्हणून झाला.
* कार्यक्रम चालू असतांना `छत्रपती शिवाजी महाराज की जय’, `धर्मवीर संभाजी महाराज की जय’, `हरहर महादेव’ आदी घोषणा कार्यकर्ते देत होते.
मधुकर सरपोतदार यांना `आदर्श हिंदु लोकप्रतिनिधी पुरस्कार’ प्रदान
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार श्री. मधुकर सरपोतदार यांना समस्त हिंदु आघाडीच्या वतीने कर्नल सदानंद साळुंखे यांच्या हस्ते `आदर्श हिंदु लोकप्रतिनिधी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. भगवा फेटा, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी उपस्थितांनी `जय भवानी, जय शिवाजी’च्या जोरदार घोषणा दिल्या.
| मित्रांना पाठवा | 44 – वाचक संख्या | छापील प्रत



