उद्यापासून खासदारांच्या घरांवर मोर्चा नेणार ! – विहिंप |
| मुंबई, ७ ऑगस्ट (वार्ता.) – अमरनाथ मंदिर न्यासाकडून परत घेतलेली जमीन पुन्हा न्यासाला देण्याची मागणी करत जम्मूमध्ये धर्माभिमानी हिंदूंनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. त्याला विश्व हिंदु परिषदेने सक्रीय पाठिंबा जाहीर केला असून हा विषय संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात यावा, यासाठी ८ व ९ ऑगस्ट या दोन दिवशी सर्व खासदारांच्या घरांवर मोर्चा नेण्याचा निर्णय विश्व हिंदु परिषदेने घेतला आहे, अशी माहिती विहिंपचे क्षेत्रीय संघटन मंत्री श्री. प्रशांत हरताळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जम्मूतील हिंदंूनी स्वयंप्रेरणेने सुरू केलेले आंदोलन गेले १ महिन्याहून अधिक काळ सुरू आहे. असे असतांना सरकार त्याची दखल घेत नाही. तरीही या दीर्घ आंदोलनाची काश्मीरच्या इतिहासात दखल घेतली जाईल. जर काश्मीरमध्ये मुसलमान दहशतवादी त्यांची दहशत बसवण्याचा जोरदार प्रयत्न करतात, तर हिंदू त्यांना धर्मयुद्धाच्या माध्यमातून तोडीस तोड उत्तर देतील, असेही श्री. हरताळकर म्हणाले. “समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा श्री. मुलायमसिंग यादव व जनता दलाचे अध्यक्ष श्री. लालूप्रसाद यादव यांनी `जर सिमीवर बंदी आणली जाते, तर विहिंप व संघ यांच्यावरही बंदी आणावी’, अशी मागणी केली आहे. (देश व धर्म यांसाठी ऐंशी वर्षांहून अधिक काळ अथक परिश्रम करणार्या रा.स्व. संघाची तुलना सिमीसारख्या राष्ट्रविघातक दहशतवादी संघटनेशी करतांना श्री. मुलायमसिंग यादव व श्री. लालूप्रसाद यादव यांना शरम कशी वाटत नाही ? – संपादक) असे करून ते सिमीसारख्या दहशतवादी संघटनेला पाठीशी घालत आहेत, हे स्पष्ट होते. अशा नेत्यांनी भारतात राहू नये”, अशी टीकाही श्री. हरताळकर यांनी या वेळी केली. | मित्रांना पाठवा | 1 – वाचक संख्या | छापील प्रत |
निगडीत वृत्त : देशाचे वाटोळे करणार्या सर्वच राजकीय पक्षांना नष्ट करा !


