राणे `प्रहार’ कोणावर करणार ?

श्री. नारायण राणे मुंबईहून `प्रहार’ नावाचे दैनिक सुरू करणार आहेत. नव्या दैनिकातून त्यांनी हिंदुत्वाच्या विचारांचा प्रसार करावा, ही त्यांना पहिली सूचना आणि उघडपणे हिंदुत्व मांडता येत नसेल, तर हिंदुत्वाला विरोध करणार्‍या लेखांना थारा देऊ नये, ही दुसरी सूचना. मुसलमानांचे लांगूलचालन न करता त्यांच्यावर मायेने योग्य वेळी योग्य तेवढे `प्रहार’ केले, तर ते मुख्य धारेत येऊ शकतात.

या दसर्‍याला महसूलमंत्री श्री. नारायण राणे मुंबईहून `प्रहार’ नावाचे दैनिक सुरू करणार असून ते दैनिकाचे मुख्य संपादक असणार आहेत आणि त्या नात्याने अग्रलेखही लिहिणार आहेत. त्यांच्या संपादक असण्याला आणि संपादकीय लेखनाला त्यांची मंत्रीपदाची गोपनीयतेची शपथ आणि लाभाचे पद न बाळगण्याची अट आड येऊ शकते; पण याचा विचार त्यांनी केलाच असेल. लोकांना उत्सुकता आहे ती संपादकीयातून ते विचार कोणता मांडणार, याची. राणे यांचे सगळे राजकीय आयुष्य शिवसेनेत भगव्या ध्वजाखाली गेले. त्याच पक्षाचे म्हणून ते मुख्यमंत्री झाले. पुढे त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी न पटल्याने ते काँग्रेसमध्ये गेले आणि तेथेही त्यांचे सर्व प्रयत्‍न मुख्यमंत्री होण्यासाठीच चालले आहेत. याचा अर्थ असा होतो की, राण्यांचा संबंध मुख्यमंत्रीपदाशी असतो. शिवसेनेच्या किंवा काँग्रेसच्या विचारांशी त्यांचा संबंध जेवढ्यास तेवढा असतो. महाराष्ट्राचे भाग्य हे आहे की, हिंदुत्वाचा विचार न पटल्याने आपण शिवसेना सोडल्याचे त्यांनी अद्यापपावेतो एकदाही म्हटलेले नाही. तोच आशेचा धागा पकडून लोकांच्या वतीने दोन सूचना करण्याचे धाडस या स्तंभातून मी करणार आहे. ते काँग्रेसमध्ये प्रविष्ट झाले असले, तरी नव्या दैनिकातून त्यांनी हिंदुत्वाच्या विचारांचा प्रसार करावा, ही पहिली सूचना आणि उघडपणे हिंदुत्व मांडता येत नसेल, तर हिंदुत्वाला विरोध करणार्‍या लेखांना त्यांनी थारा देऊ नये, ही दुसरी सूचना. लाला लजपतराय, मदनमोहन मालवीय,
डॉ. राजेंद्र प्रसाद आणि सरदार पटेल हे काँग्रेसचे निष्ठावान नेते. लोकादरास ते पात्र होते. तथापी त्यांनी हिंदुत्वाची हानी होईल, असे वाक्य उच्चारले नाही वा काम केले नाही. त्या वेळी मोहनदास गांधी यांच्या विभूतीमत्वाच्या आभासास भुलून ही नेतेमंडळी असावध राहिली आणि फाळणीला विरोध करण्यासाठी त्यांना रस्त्यावर उतरण्याचे धाडस झाले नाही. तथापी नेहरूंच्या मनात हिंदुहिताविषयी उदासीनता आणि मुस्लिमहिताविषयी फाजील जिव्हाळा असे. तसे या नेत्यांचे नव्हते. आज काँग्रेसचे नेतृत्व लाचार काँग्रेसजनांनी सोनिया गांधींच्या हाती सोपवले आहे. सोनिया गांधींना हिंदुत्वाविषयी प्रेम नाही, उलट हिंदुत्वविचाराला विशिष्ट मर्यादेत ठेवण्यासाठी हिंदुत्वविरोधी शक्‍तींना प्रोत्साहन देण्यास त्या उत्सुक असतात, उदा. अमरनाथ यात्रेकरूंच्या सुविधांसाठी दिलेली ४० हेक्टर वनभूमी सोनिया गांधींची संमती नसती, तर परत घेण्याचे धाडस जम्मू आणि काश्मीर सरकारला झाले नसते. नारायण राणे यांचे `प्रहार’ दैनिक या विषयात हिंदूंची बाजू लावून धरणार आहे का ? मुसलमानांनी काश्मीर खोर्‍यात काही दिवस आंदोलन करताच सरकारने घाबरून लगेच हिंदूंना यात्रेसाठी दिलेली भूमी परत काढून घेतली; परंतु गेला महिनाभर जम्मूमध्ये ही भूमी परत मिळवण्यासाठी हिंदू उग्र आंदोलन करत असूनही सरकारला त्याकडे बघायला वेळ नाही. `प्रहार’ दैनिक अशीच अनास्था हिंदूंच्या प्रश्‍नांविषयी दाखवणार असेल, तर त्या दैनिकाची हिंदु समाजाला मुळीच आवश्यकता नाही, हे राणे यांनी लक्षात ठेवावे. काँग्रेसची तळी उचलून धरणारी आणि हिंदूंचे अशुभ चिंतणारी अनेक वृत्तपत्रे आहेत; परंतु मागासवर्गियांत हिंदुत्वाविषयी प्रेम वाढत असून त्या प्रमाणात अशा दैनिकांचा खप कमी होत आहे. संविधानाच्या चौकटीत राहून कितीतरी विषय राणे यांना धसास लावता येतील. बांगलादेशी मुसलमानांना हुसकावून लावण्यासाठी प्रभावी मोहीम त्यांना उघडता येईल. समान नागरी कायद्याची मागणी घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांत आहे. ती `प्रहार’ने लावून धरली, तर काँग्रेसचे नेते काही बोलू शकणार नाहीत; मात्र हिंदुत्वनिष्ठांचा फार मोठा वाचकवर्ग `प्रहार’ला मिळू शकेल. हीच शक्‍ती भविष्यातील राजकारणासाठी राणे यांना उपयोगी पडणार आहे. उद्धव आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा भारताशी एकजीव होण्यास नकार देणारा मुसलमान समाज अधिक धोकादायक आहे, हे राणे यांनी ओळखले पाहिजे. मुसलमानांचे लांगूलचालन न करता त्यांच्यावर मायेने योग्य वेळी योग्य तेवढे `प्रहार’ केले, तर ते मुख्य धारेत येऊ शकतात.
- सुघोष

 |  मित्रांना पाठवा |  31 – वाचक संख्या |  छापील प्रत

 निगडीत वृत्त : शरसंधान

Leave a Reply