चिक्कमगळूर येथील दत्तपिठात हिंदु व मुसलमान यांना दर्शनाची संधी द्या ! – कर्नाटक उच्च न्यायालय

हिंदूंनो, चिक्कमगळूर येथील दत्तपिठात हिंदूंना दर्शनाची संधी मिळाल्याने ईश्‍वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्‍त करा !

<!–

06-08-2008 by shashi

–>

हिंदु धर्माभिमान्यांच्या लढ्याला यश !

चिक्कमगळूर, ६ ऑगस्ट (वार्ता.) – येथील मुसलमानांनी अतीक्रमण केलेल्या दत्तपिठावर हिंदूंना पूजा करण्यास परावृत्त करणारा आदेश फेब्रुवारी २००७ मध्ये देवेगौडा सरकारच्या एन्डोवमेंट विभागाने दिला होता. या सरकारी आदेशाच्या विरोधात जागरूक हिंदूंनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय खंडपिठाने हा सरकारी आदेश रद्दबातल ठरवत `हा आदेश का दिला गेला’, याची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. तसेच `हिंदु व मुसलमान यांना परंपरागत दर्शनाची संधी देणारी नियमावली तयार करा’, असाही आदेश दिला होता.

कर्नाटक सरकारने या आदेशाला हरकत घेत कर्नाटक उच्च न्यायालयात फेरयाचिका दाखली केली होती व न्यायालयीन आदेशावर आठ आठवड्यांची स्थगिती मिळवली होती. अलीकडेच या मुद्यावर निकाल देतांना कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. दीपक वर्मा यांच्या नेतृत्वाखालील द्विसदस्यीय खंडपिठाने सरकारची याचिका रद्दबातल करत `तात्काळ एकसदस्यीय खंडपिठाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करा’, असा आदेश जारी केला.

| मित्रांना पाठवा | - वाचक संख्या 4 – वाचक संख्या | छापील प्रत

निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!

Leave a Reply