* सामना, तरुण भारत (पुणे) व दी हिंदु ही वृत्तपत्रेही लक्ष्य * शिवसेनाप्रमुखांना ठार मारण्याचा पुनरुच्चार * छ. शिवाजी महाराजांचा अवमान
`सनातन प्रभात’कडून पोलिसांत तक्रार दाखल
मुंबई, ५ ऑगस्ट (वार्ता.) – `दैनिक सनातन प्रभात पिं्रट करना बंद करदो । नही तो हमारे मिरज के मुसलमान भाई उसे बमसे उडा देंगें’, अशी धमकी देणारे पत्र मिरज, जिल्हा सांगली येथील `दैनिक सनातन प्रभात’च्या कार्यालयात प्राप्त झाले आहे. त्यात `सनातन प्रभात’बरोबरच दैनिक `सामना’, दैनिक `तरुण भारत’ व `दी हिंदु’ ही वृत्तपत्रेही त्यांच्या यादीत असल्याचे म्हटले आहे, अशी खळबळजनक माहिती पनवेल सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, “पत्र पाठवणार्याने त्याचे नाव म. रऊफ म. रझाक बिराजदार, मरजेवाडी, जिल्हा सोलापूर, असे लिहिले आहे. हिरव्या शाईने लिहिलेल्या या पत्रात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना `चूहा’ संबोधण्यात आले आहे, तर शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्यासह हिंदुत्ववादी नेत्यांना ठार मारणार आहोत, असेही म्हटले आहे.” या पत्रातील काही मजकूर पुढीलप्रमाणे
आहे, `वह कौन शिवाजी चूहा था, जिसे हमारा अफझलखान कैद कर रखा था । वहा बाळया ठाकर्या, उसके चेले सभी खालीपिले गरजते है । हर कुत्ता अपनी गलीमें शेर बनता है, लेकीन हमारा छोटा मुसलमान भाई उसे बमसे उडा देंगे । `दैनिक सामना’, मुंबई, `तरुण भारत’, पुणे, `दी हिंदु’ इन सभी अखबार प्रेस हमारे लिस्टमें मौजूद है । सिमी हमारा कर्नल रियाझभाई के राजस्थान से पार्सल का हमें इंतजार है । बाळया ठाकर्या, लाल्या आडवान्या, तोगड्या, अशोक सिंघल इन सभी कुत्ते को एकसाथ इस्लामी गोली मार देंगे । मुसलमान जो कहता है वह सच करके दिखाता है । पाकिस्तान झिंदाबाद, हिंदोस्ताँ मुर्दाबाद ।’ या पत्रात ज्या प्रकारे राजस्थानमधून `पार्सल’ येण्याची वाट पहाण्याबाबत, तसेच सिमीचा कर्नल रियाझभाई राजस्थानमध्ये असल्याचे म्हटले गेले आहे, याचा गांभीर्याने विचार केल्यास नुकत्याच राजस्थानमधील जयपूर शहरात झालेल्या बाँबस्फोटाशी त्याचा संबंध असण्याच्या शक्यतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही श्री. वर्तक म्हणाले. ते पुढे म्हणाले, “याबाबत `दैनिक सनातन प्रभात’चे व्यवस्थापक व हिंदुत्ववादी संघटना यांनी १० जुलै २००८ रोजी रात्री मिरज शहर पोलीस ठाणे व सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या संदर्भातील तपशीलवार निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, दहशतवादविरोधी पथक, राजस्थान पोलीस महासंचालक व केंद्रीय गृहमंत्री यांनाही पाठवण्यात आले आहे, तसेच दैनिक `सामना’चे कार्यकारी संपादक व शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनाही या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यांनी यात स्वत: लक्ष घालणार असल्याचे सांगितले आहे. बेंगळुरू व अहमदाबाद येथे झालेले साखळी बाँबस्फोट व सुरतमध्ये सापडलेले २४ जिवंत बाँब या पार्श्वभूमीवर या प्रकरणात तातडीने लक्ष घालून चौकशीची मागणी करण्यात येत आहे.”
वार्ताहर परिषदेला उपस्थित राहून प्रतिसाद देणारी वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या !
दैनिक `दी हिंदु’, दैनिक `सामना’, दैनिक `इंडियन एक्स्प्रेस’, दैनिक `तरुण भारत’, दैनिक `लोकमत’, दैनिक `आपला वार्ताहर’, दैनिक `पुण्यनगरी’, दैनिक `नवभारत’, दैनिक `संदेश’, सांजदैनिक `महानगर’, `उत्तरभूमी’, `निर्भय पथिक’, `वंदे मातरम’, `खबरे आज तक’, `समभावदूत’, `मुंबई वचननामा’, `सहारा ऊर्दू’ व `हिंदुस्तान डेली’, तसेच `दूरदर्शन’, `ई-टीव्ही’, `टीव्ही ९’ व `न्यूज टुडे’
`सनातन प्रभात’ला दहशतवादाची प्रचीती देणार्या यापूर्वीच्या घटना
दहशतवाद्यांनी `दैनिक सनातन प्रभात’ला पाठवलेल्या पत्रातील `अब दैनिक सनातन प्रभात प्रिंट करना बंद कर दो, नहीं तो हमारा मिरजके, मुस्लीम भाई उसे बमसे उडा देंगे’ हे वाक्य गंभीर आहे; कारण या वाक्याची प्रचिती येणार्या काही अनुषंगाने घटना अलीकडेच घडल्या आहेत. त्याचा क्रमवार तपशील पुढे देत आहे.
१. ३.११.२००५ रोजी मिरज येथील २०० मुसलमानांच्या सशस्त्र जमावाने `दैनिक सनातन प्रभात’च्या कार्यालयावर हल्ला करून कार्यालयाची तोडफोड केली होती.
२. मिरज येथील `सनातन प्रभात’ कार्यालयात समाजकंटकांकडून धमक्यांचे दूरध्वनी येतात. त्याबद्दल २.३.२००७ रोजी मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
३. `दैनिक सनातन प्रभात’च्या मिरज येथील कार्यालयात संशयित मुसलमान व्यक्ती विनापरवानगी घुसली होती. त्यासंदर्भात २८.५.२००७ रोजी मिरज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
४. `दैनिक सनातन प्रभात’चे मिरज येथील कार्यालय जाळण्याची धमकी आतंकवाद्यांनी दिली होती. त्याबाबतची तक्रार ८.९.२००७ रोजी मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
५. फेबु्रवारी २००६ मध्ये औरंगाबाद येथून शेख अब्दुल रझाक या नावाने पत्र पाठवणार्या दहशतवाद्याने `सनातन प्रभात’च्या संपादकांना `मुसलमान धर्माचा स्वीकार करा अन्यथा दणका देऊ’ अशी धमकी दिली होती. या पत्राची तक्रारही पोलिसांत दिली होती.
६. `दैनिक सनातन प्रभात’च्या रामनाथी, फोंडा, गोवा येथील
मुख्यालयाची छायाचित्रे दोन संशयित मुसलमानांनी काढली होती.
त्यांचा पाठलाग केल्यावर ते पळून गेले. त्यांची छायाचित्रे फोंडा,
गोवा येथील पोलिसांना दिल्यावर त्यांनी ते दहशतवादी असल्याची पुष्टी दिली होती. याबाबतची तक्रार फोंडा, गोवा येथील पोलीस ठाण्यात २.६.२००८ रोजी दिली आहे.
७. जयपूर बाँबस्फोट प्रकरणात अटक केलेल्या सिमीच्या दहशतवाद्यांचे संबंध सोलापूर येथील विजापूर नाका परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी `सनातन प्रभात’ला याच परिसरातून धमकीचे पत्र पाठवले आहे.
वरील सर्व घटनाक्रम पहाता `दैनिक सनातन प्रभात’ची कार्यालये दहशतवाद्यांच्या `हिटलिस्ट’वर आहेत, हे स्पष्ट होते.
दैनिक सनातन प्रभातला प्राप्त झालेल्या धमकीच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर सांगली येथेही पत्रकार परिषद
सांगली – आज सायंकाळी ४.३० वाजता येथील नगरवाचनालय येथे वरील विषयावर पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला दैनिक सनातन प्रभातच्या सांगली, कोल्हापूर, सोलापूर व सातारा आवृत्तीचे व्यवस्थापक श्री. प्रदीप जोशी यांनी संबोधित केले. या वेळी हिंदु एकता आंदोलन पक्षाचे कार्याध्यक्ष श्री. नारायणराव कदम व सनातन संस्थेचे डॉ. चारूदत्त पिंगळे हेही उपस्थित होते.
समाजात फूट पाडण्याचे कारस्थान – नारायणराव कदम
हिंदुत्वविरोधी घटना या स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहेत. दिल्ली व पंजाब येथेही हिंदूंवर स्वांतत्र्यपूर्व काळात हल्ले झाले आहेत. स्वातंत्र्यानंतर हिंदूंमध्ये आलेली मरगळ झटकून टाकून त्यांना जागृत करणे व त्यांना संघटित करण्याच्या कामात `दैनिक सनातन प्रभात’ अग्रेसर आहे. त्यामुळे समाजात फूट पाडण्यासाठी अशा धमक्या येत आहेत, असे मत हिंदु एकता आंदोलन पक्षाचे कार्याध्यक्ष श्री. नारायणराव कदम यांनी व्यक्त केले.
पत्रकारांच्या प्रश्नांना श्री. अभय वर्तक यांनी दिलेली उत्तरे
सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरे पुढे देत आहोत.
पत्रकार : १० जुलै रोजी धमकीचे पत्र मिळूनही आपण इतक्या उशिरा पत्रकार परिषद का घेत आहात ?
श्री. वर्तक : धमकीचे पत्र मिळाल्यावर आम्ही तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या संदर्भातील तपशीलवार निवेदन मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त, दहशतवादविरोधी पथक व केंद्रीय गृहमंत्री यांना, तसेच या पत्रात राजस्थानचा संबंध असल्याचा उल्लेख असल्याने राजस्थान पोलीस महासंचालकांना आम्ही कळवले. पोलिसांकडून या धमकीचा गांभीर्याने तपास होऊन संबंधितांना अटक व्हावी व त्यांना तपासात कोणताही अडसर होऊ नये, या हेतूने आम्ही याबाबत प्रसिद्धीमाध्यमांकडे गेलो नाही. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आम्हाला पत्र मिळाल्यानंतर बेंगळुरू व अहमदाबाद येथे बाँबस्फोट व सुरत येथे बाँब सापडले. काही महिन्यांपूर्वी राजस्थानातील जयपूर येथे बाँबस्फोट झाले आहेत.
पत्रकार : पोलिसांकडून याबाबत काय तपास झाला आहे ?
श्री. वर्तक : आमच्या माहितीप्रमाणे पोलिसांनी या धमकीचा गांभीर्याने तपास केला नसल्याचे लक्षात येत आहे. या प्रकरणी पोलिसांच्या तपासात प्रगती नसल्याचेच दिसत आहे; म्हणूनच साधारणत: एक महिना होत आल्याने आम्ही तुमच्या माध्यमातून हा विषय सरकारने गांभीर्याने घ्यावा, यासाठी आज पत्रकार परिषद घेत आहोत.
पत्रकार : तक्रार केल्यावर तुमच्या कार्यालयाला पोलीस संरक्षण देण्यात आले का ?
श्री. वर्तक : तक्रार केल्यावर तातडीने पोलीस संरक्षण देण्यात आले नाही. मात्र माझ्या माहितीप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून पोलीस संरक्षण देण्यात येत आहे. पोलीस संरक्षण मिळावे, म्हणून आम्ही मागणी केली होती.
पत्रकार : यापूर्वी तुम्हाला धमकी आली होती का ?
श्री. वर्तक : हो. यापूर्वी दूरध्वनीद्वारे एक-दोन वेळा धमक्या आल्या आहेत. प्रत्येक वेळेस आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पत्रकार : तुम्हालाच का धमकी आली ?
श्री. वर्तक : आम्हालाच नव्हे, तर दैनिक `दी हिंदु’, दैनिक `सामना’ व दैनिक `तरुण भारत’ यांनाही धमकी देण्यात आली आहे, तसेच शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे, श्री. लालकृष्ण अडवाणी इत्यादींनाही धमकी देण्यात आली आहे.
पत्रकार : पत्रात उल्लेख असलेल्या सोलापूर येथील ठिकाणाचा शोध घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला का ?
श्री. वर्तक : नाही. आम्हाला याबाबत मर्यादा आहेत. कायदेशीररीत्या तपास करण्याचे कर्तव्य पोलिसांचे आहे.
पत्रकार : सोलापुरात सिमीचे कार्यालय आहे का ?
श्री. वर्तक : माहिती नाही. पोलिसांनी याचा तपास करावा.
पत्रकार : तुमचा सिमीवर संशय आहे का ?
श्री. वर्तक : पोलिसांनी गांभीर्याने तपास केला, तर हे कोणाचे षडयंत्र आहे, ते उघड होईल. आताच तसा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.
पत्रकार : चेष्टा म्हणून कोणी असा प्रकार केला असू शकतो का ?
श्री. वर्तक : चेष्टा म्हणून याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. तसे करून पुढे काही घडल्यास त्याचा पश्चात्ताप होऊ नये; म्हणून तपास व्हावा, हा उद्देश आहे. `दैनिक सनातन प्रभात’चे कार्यालय सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमात असल्यामुळे दहशतवादी हल्ला झाल्यास सनातनच्या आश्रमालाही त्याची झळ पोहोचेल, म्हणून या धमकीबाबत आम्ही गंभीर आहोत. महाराष्ट्रात वृत्तपत्रांची गळचेपी होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. रा.रा. पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना धमकी देण्यात येत आहे. याचा गांभीर्याने तपास व्हावा, अशी अपेक्षा श्री. पाटील यांच्याकडून आम्ही करत आहोत.
|
मित्रांना पाठवा |
111 – वाचक संख्या |
छापील प्रत
निगडीत वृत्त : सनातनला विरोध
- साप्ताहिक चित्रलेखाच्या विरोधात सनातन संस्थेने दाखल केलेल्या फौजदारी खटल्याच्या प्राथमिक सुनावणीला प्रारंभ : 2008-07-29
- सायंदैनिक `आपलं महानगर\’च्या विरोधात पनवेल सनातन संस्थेतर्फे न्यायालयात फौजदारी खटला दाखल : 2008-07-10
- सनातनच्या संस्थापकांना ताब्यात घेण्याची नाट्यनिर्मात्यांची मागणी ! : 2008-06-28
- म्हणे सनातन संस्थेच्या प्रमुखांवर अतिरेकी म्हणून कारवाई करा ! : 2008-06-25
- कुठे कामगार, शिक्षक, डॉक्टर इत्यादींवर अन्याय झाल्यास सक्रीय होऊन …. : 2008-02-12
- एका मोठ्या पत्रकार संघटनेच्या अध्यक्षाची `सनातन प्रभात\’च्या संपादकांवरील कारवाईबाबत बेजबाबदार वृत्ती ! : 2008-02-11
- भारिपच्या कार्यकर्त्यांकडून प्रखर हिंदुत्ववादी `साप्ताहिक सनातन प्रभात\’च्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव : 2008-01-31
- सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात धार्मिक कृती व `सनातन प्रभात\’ यांवर टीका ! : 2007-12-18
- देशाची दु:स्थिती महाविद्यालयातील प्रदर्शनातून मांडण्यास विरोध करणारे प्राचार्य ! : 2007-12-09
- धर्मांतरीत ख्रिस्तींच्या भावना दुखावतील म्हणून पुणे येथे `संस्कारभारती\’कडून सनातनच्या प्रवचनास नकार ! : 2007-12-07



