तिरूमला तिरूपती देवस्थानच्या अध्यक्षपदी मद्यविक्री व्यावसायिक !

तिरूपती देवस्थानाच्या अध्यक्षपदी मद्यविक्रेत्याला नेमणार्‍या काँग्रेसला निवडणुकीत धडा शिकवा !

हैद्राबाद, २९ ऑगस्ट (वृत्तसंस्था) – तिरूमला तिरुपती देवस्थानच्या अध्यक्षपदी तेलगु देसम पक्षातून हकालपट्टी झालेले खासदार व मद्यविक्री व्यावसायिक डी.के. अडीकेसावलू यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

(देवस्थानच्या अध्यक्षपदी सात्त्विक व्यक्‍तीची निवड न करता तमोगुणी मद्यविक्री व्यावसायिकाची निवड होणे, हा देवस्थानचा व भक्‍तांचा घोर अपमानच आहे ! – संपादक) २२ जुलै रोजी लोकसभेत बहुमत सिद्ध करतेवेळी केंद्र सरकारच्या बाजूने मतदान केल्यानेच ही बक्षीसरूपी नियुक्‍ती झाल्याचे बोलले जात आहे. (हिंदूंची देवस्थाने म्हणजे स्वत:ची खाजगी मालमत्ता असल्याप्रमाणे वागणारी काँग्रेस ! हिंदूंनो, राजकीय खेळी जिंकण्यासाठी हिंदूंच्या श्रद्धास्थानांची बक्षिसे लावण्याची ही नवीन पद्धती वेळीच रोखा ! – संपादक) तिरूमला तिरूपती देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी असलेले श्री. करूणाकर रेड्डी यांचा २ वर्षाचा कार्यकाल या महिन्यात संपत असून त्यानांच वाढीव मुदत देण्यात येणार असल्याची चिन्हे होती; परंतु अडिकेसावलू यांनी मुख्यमंत्री सॅम्युअल राजशेखर रेड्डी यांची भेट घेतल्यानंतर चक्रे फिरल्याने सारेच अचंबित झाले आहेत. अडिकेसावलू हे २००४ साली ६ महिने तिरूमला तिरूपती देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी होते. मद्यविक्री व्यावसायिक असलेल्या व्यक्‍तीची देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्या वेळीही भक्‍तांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. या वेळी अडिकेसावलू हे ३ वर्षांसाठी अध्यक्ष असतील. मुख्यमंत्री सॅम्युअल राजशेखर रेड्डी यांनी अडिकेसावलू यांची देवस्थानच्या अध्यक्षपदी केलेली निवड ही राजकीय खेळी असल्याचे समोर येत आहे. (हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा राजकीय फायदा उठवण्यासाठी उपयोग करणारे काँग्रेसचे मुख्यमंत्री ! मंदिरांचे सरकारीकरण झाल्यास होणार्‍या परिणामांची ही एक झलक आहे ! – संपादक) देवस्थानच्या अध्यक्षपदी निवडून त्यांना चित्रपट कलावंत चिरंजीवी यांच्या पक्षात जाण्यापासून रोखण्यात आले. अडिकेसावलू हे रविवारी लोकसभेचा राजीनामा देतील. केंद्र सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर तेलगू देसम पक्षाचे चंद्रबाबू नायडू यांनी अडिकेसावलू यांची पक्षाच्या धोरणांविरूद्ध वागल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी केली होती.

 

निगडीत वृत्त : हिंदूंनो या धर्मद्रोह्यांना विसरू नका

ओरिसातील कंधमलमध्ये दिसताक्षणी गोळया घालण्याचे आदेश

ख्रिस्त्यांवर अत्याचार झाल्याची ओरड करणारे महेश भट हिंदूंवर वर्षानुवर्षे होणार्‍या अत्याचारांबाबत गप्प का ?

स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या हत्येनंतर हिंदूंचा उद्रेक कायम !

भुवनेश्‍वर, २७ ऑगस्ट (वृत्तसंस्था) – स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या हत्येनंतर कंधमलमध्ये उसळलेला हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून दिसताक्षणी गोळया घालण्याचे आदेश देण्यात
आले आहेत.

(ओरिसातील आंदोलक हिंदू आहेत म्हणून धर्मद्रोही राज्यकर्ते तेथे आंदोलकांवर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देतात; मात्र काश्मीरमधील आंदोलक उघडउघड देशद्रोह करत असतांना राज्यकर्ते गप्प बसतात; कारण तेथील आंदोलक मुसलमान आहेत ! – संपादक) जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. श्रीप्रकाश जयस्वाल यांनी आज जिल्ह्याला भेट दिली. “जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली, तरी काही ठिकाणी अजूनही हिंसाचार सुरू आहे”, अशी माहिती विभागीय आयुक्‍त श्री. सत्यकात साहू यांनी दिली.
बालीगुडा व उदयगिरी या शहरांच्या मध्ये असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात लोक गोळा झाले व त्यांनी लाठ्या व इतर हत्यारे घेऊन हिंसाचार करायला सुरुवात केली. रायकीयामध्ये संतप्‍त हिंदूंनी दोन जणांना मारहाण केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. शहरात संतप्‍त जमावाने माजी पोलीस अधीक्षकाच्या निवासस्थानावर हल्ला केला. रायकीयामध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून या शहरातील बरीच ख्रिस्ती कुटुंबे अरण्यात पळून गेली आहेत. कंधमलमधील ६ शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत १०० हून अधिक घरांना आग लावण्यात आली आहे. त्यापैकी ६० घरे बारीमुंडा गावात जाळण्यात आली.

सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाजपच्या आमदारांची मागणी
ओरिसामध्ये बिजू जनता दल व भाजप यांच्या युतीचे सरकार आहे. आज भाजपच्या संतप्‍त आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिल्यामुळे बिजू जनता दल व भाजप यांच्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. झारसीगुडा जिल्ह्यातील लाईकेराचे आमदार श्री. वृंदावन माझी यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे वैयक्‍तिक पत्र विधानसभेच्या सभापतींचा सादर केले. “स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांना सुरक्षाव्यवस्था पुरवण्यास अपयश आल्याचे सरकारने मान्य केले आहे. सरकारचा पाठिंबा काढून घेण्याबाबत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या परवानगीची आम्ही वाट पहात आहोत”, अशी माहिती दुसरे एक आमदार श्री. महेश साहू यांनी दिली. “कंधमलमध्ये तैनात करण्यात आलेल्या निमलष्करी दलाचा वापर हिंदूंच्या विरोधात करण्यात येत आहे”, अशी टीका भाजपच्या आमदारांनी केली. कंधमलमध्ये समाजकंटकांच्या प्रवेशास आळा घालता यावा, यासाठी जिल्ह्याच्या सीमारेषेवर नाकेबंदी करण्यात आली आहे. स्वामी लक्ष्मणानंद यांच्या हत्येनंतर ३ वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये कंधमलचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. एन्. कनोडिया यांचा समावेश आहे.

पुरावा सापडल्याशिवाय विशिष्ट गटावर कारवाई करणे चुकीचे – शिवराज पाटील
कोणताही पुरावा हाती सापडल्याशिवाय एका विशिष्ट गटाला स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या हत्येला जबाबदार धरणे योग्य नाही, असे वक्‍तव्य केंद्रीय गृहमंत्री श्री. शिवराज पाटील यांनी केले. (गृहमंत्र्यांच्या या भूमिकेतून हाती काहीच लागणार नाही, हे स्पष्ट आहे. – संपादक) “स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या हत्येचा निषेध करणे आवश्यक आहे; प्राथमिक अहवालानुसार नक्षलवाद्यांनी स्वामी लक्ष्मणानंद यांची हत्या केल्याचा अंदाज आहे; मात्र त्याबाबत पुरावे हाती लागल्याशिवाय कोणतीही कारवाई करणे चुकीचे आहे”, असे ते म्हणाले. (नक्षलवाद्यांनी हत्या केली, हा विचार आता मागे पडला आहे. गृहमंत्री अद्ययावत माहितीच्या आधारे का बोलत नाहीत ? – संपादक)


ओरिसामध्ये ख्रिस्ती धर्मियांवर हिंदु धर्मियांकडून अत्याचार ! – महेश भट यांचा कांगावा
मुंबई, २७ ऑगस्ट (वार्ता.) – ओरिसामध्ये विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांनी ख्रिस्ती धर्मियांवर अत्याचार सुरू केले आहेत. तेथील दोन ख्रिस्ती धर्मियांना या संघटनांनी जिवंत जाळले आहे. त्यामुळे सरकारने या ठिकाणी सैनिकी कारवाई करावी, असे तथाकथित निधर्मीपणाचा आव आणणारे चित्रपट निर्माता श्री. महेश भट यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.(हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या िख्र्त्यासंना विरोध करणारे स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती व ४ हिंदुत्ववादी यांची िख्र्त्यासंनी निर्घृण हत्या केली, याबाबत श्री. भट गप्प का ? – संपादक) `ऑल इंडिया िख्र्चाश्‍न कौन्सिल’तर्फे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते उपस्थित होते. या वेळी श्री. तुषार गांधी, मौलाना मस्तुकीम व ऑर्डिनल ओस्वाल्ड ग्रॅसिस आदी उपस्थित होते. या वेळी या सर्वांनी त्या दोन ख्रिस्ती धर्मियांच्या हत्येचा निषेध केला. हिंदुत्ववादी संघटनांनी आजही बंद पुकारला असून पाद्री व नन यांच्यासह अनेक ख्रिस्ती धर्मियांना जबरदस्तीने हाकलवून जंगलामध्ये सोडत आहेत. अल्पसंख्याकांप्रती संवेदनशील असणार्‍या सरकारने या प्रकरणी ख्रिस्ती धर्मियांवरील संकटाचा गांभिर्याने विचार करावा, असेही श्री. महेश भट म्हणाले. जर अल्पसंख्यांच्या जीविताच्या संरक्षणासाठी कायद्यामध्ये बदल करण्याची गरज असेल, तर त्याप्रमाणे त्वरित बदल करण्यात यावे. अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराचा मुद्दा येत्या निवडणुकांमध्ये परिणाम घडवून आणू शकतो, असा इशाराही या संघटनेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून दिला आहे.

अमरनाथ आंदोलनाबाबत विशेष

 

 

 

http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-08-26

सरकारशी सुरू असलेल्या चर्चेतून माघार घेण्याचा अमरनाथ संघर्ष समितीचा इशारा !

जम्मू, २६ ऑगस्ट (प्रे.ट्र.) – काही पोलीस अधिकार्‍यांनी येथील निरपराध जनतेवर गोळीबार केला. त्यांची त्वरित बदली करण्यात यावी अन्यथा सरकारशी सुरू असलेल्या चर्चेतून माघार घेण्यात येईल, असा इशारा अमरनाथ संघर्ष समितीने दिला आहे. तीन दिवसांपूर्वी अमरनाथ संघर्ष समिती व राज्यपाल श्री. एन्.एन्. व्होरा यांनी स्थापन केलेली समिती यांची बैठक पार पडली.

ही बैठक फलदायी झाल्याचे सांगण्यात आले होते. “जम्मूमधील पोलीस महानिरीक्षक श्री. राजेंद्र कुमार, जम्मूचे पोलीस अधीक्षक श्री. मनोहर सिंग व कटुआ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. एस्.पी. पानी यांची बदली झाल्याशिवाय सरकारशी पुढील चर्चा करणार नाही”, अशी भूमिका समितीने घेतली आहे. अमरनाथ देवस्थान मंडळाला भूमी परत द्यावी, यासाठी अमरनाथ संघर्ष समितीने आंदोलन छेडले आहे. आज सलग ५९ व्या दिवशी जम्मूमधील जनजीवन विस्कळीत राहिले. आज दुकाने व व्यापारी आस्थापने बंद राहिली. शहरातील वाहतूक ठप्प असल्यामुळे शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमधील उपस्थितीवर त्याचा परिणाम झाला. आज कटुआ जिल्ह्यातील परिस्थिती पूर्वपदावर आल्यामुळे तेथील संचारबंदी उठवण्यात आली. पूंछमध्ये जातीय दंगल भडकल्यामुळे तेथे गेले चार दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. किश्तवारमध्येही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येत आहे.

 | मित्रांना पाठवा छापील प्रत

  निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!

कधीतरीच हिंदूंच्या संतापाच्या ज्वालामुखीचा उद्रेक ! – फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए

जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याऐवजी सरकारने जम्मूमधील हिंदूंचा संताप जाणून घेण्याचा प्रयत्‍न केल्यास योग्य होईल ! अमरनाथ मुद्यावर आत्मचिंतन करण्याची संधी सरकारने घालवू नये; कारण कधीतरी हिंदूंच्या संतापाच्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो. हिंदूंच्या संतापामागे अमरनाथ जमिनीचा एकच मुद्दा आहे का ? त्यांच्यामध्ये संताप निर्माण करण्यासाठी इतर मुद्दे नाहीत का ? या गोष्टींचा उहापोह होणे आवश्यक आहे.
- फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए

 

शतकभरात काश्मीरसह ईशान्येकडील राज्यांत हिंदू अल्पसंख्य !
हिंदू शांतीप्रिय नागरिक आहेत; मात्र जगात प्रत्येक ठिकाणी हिंदूंची अवहेलना केली जाते. फिजी, पाकिस्तान किंवा बांगलादेश येथे भारताच्या विरोधात संताप व्यक्‍त करतांना हिंदूंना लक्ष्य ठरवले जाते. १९०० सालात काश्मीर खोर्‍यात १० लाख हिंदू होते, तर आता तेथे काही शेकडोच हिंदू शिल्लक आहेत. दहशतवाद्यांमुळे काश्मीर सोडून पळून जाण्याची वेळ त्यांच्यावर आली. आसाम, त्रिपुरा किंवा नागालँड येथे तेथील हिंदूंपेक्षा बेकायदेशीरपणे घुसखोरी केलेल्या बांगलादेशींची संख्या जास्त आहे. तसेच या राज्यांत िख्र्तासीवाद्यांचा दहशतवादही मोठ्या प्रमाणात पसरला आहे.

सर्वसमावेशक हिंदूंना लक्ष्य का केले जाते ?
गेल्या ३ हजार ५०० वर्षांचा इतिहास पहाता, हिंदूंनी कधीच इतर देशावर आक्रमण केलेले नाही. तसेच त्यांनी त्यांचा धर्म इतरांवर कधीच लादला नाही. सांप्रत काळात हिंदु धर्माची उपांगे असलेल्या योग, ध्यान, आयुर्वेद, प्राणायम यांचा अंगीकार जगभरातील लाखो नागरिक करत आहेत. जगातील बहिष्कृत अल्पसंख्यांकांना हिंदूंनी नेहमीच आश्रय दिलेला आहे. अशा हिंदूंना िख्र्तासींनी धर्मांतराच्या माध्यमातून, तर मुसलमानांनी रक्‍तरंजित आक्रमणांनी नेहमी विरोधच केला.

अमरनाथमधील उद्रेक कशासाठी ?
गुजरात दंगलीची आपण निंदाच केली पाहिजे; मात्र त्यामागची कारणे जाणून घेणे तेवढेच आवश्यक आहे. गुन्हेगाराच्या एका गटाने ५९ निष्पाप हिंदूंना रेल्वेमध्ये जाळून टाकले होते. त्यामुळे हिंदूंचा संताप अनावर झाला. एवढ्यावरच हा संताप सीमित नाही, तर वर्षांनुवर्षे गुजरातच्या हिंदूंवर झालेल्या अन्यायांचाही संताप होतो, हे आपण जाणले पाहिजे. अमरनाथ मुद्याच्या बाबतीतही तसेच आहे. मुसलमानांना हज यात्रेसाठी कोट्यवधी रुपये सरकारकडून दिले जातात, त्याबद्दल हिंदूंनी कधी तक्रार केलेली नाही; मात्र जेव्हा हिंदूंना यात्रेसाठी सुविधा हव्या आहेत, तेव्हा त्या सरकारकडून नाकारल्या जातात; म्हणूनच हा उद्रेक आहे ! या सरकारने किंवा पुढे येणार्‍या सरकारने हिंदूंच्या या संतापाची दखल घेतली नाही, तर आणखी अनेक `जम्मू’ ज्वालामुखीप्रमाणे उद्रेक झालेले आपल्याला दिसतील !

अमरनाथ आंदोलनाबाबत विशेष

  • वाचा…. अमरनाथ विशेष

 

 

 

http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-08-26

हिंदु धर्मजागृती सभा : राष्ट्र व धर्म कार्यार्थ जागृत हिंदुतेजाचा आविष्कार !

ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी हिंदुसंघटन, हेच उत्तर !

सद्यस्थितीत हिंदूंचे धर्मांतर, हिंदूंच्या देवतांचे विडंबन, प्रखर हिंदुत्ववादी नेते व हिंदु धर्मगुरु यांच्या होणार्‍या हत्या, जिहादी दहशतवाद, हिंदूंच्या मंदिरांच्या जागांवर होत असलेली अतीक्रमणे, हिंदु धर्मविरोधी कायदे असे अनेक आघात हिंदु धर्मावर होत आहेत. धर्मावरील ही आक्रमणे परतवण्यासाठी हिंदुजागृती व हिंदुसंघटन ही काळाची गरज आहे. हिंदु जनजागृती समिती विविध माध्यमांतून यासाठी कार्यरत आहे. याचाच एक भाग म्हणून समितीने जानेवारी २००८ ते जून २००८ या कालावधीत महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या राज्यांमध्ये एकूण ४३ ठिकाणी हिंदु धर्मजागृती सभांचे आयोजन केले. या सभांद्वारे १ लाख ६४ हजारहून अधिक धर्माभिमानी हिंदूंनी राष्ट्र व धर्म कार्यार्थ कृतीशील होण्याचा निर्धार केला.

 

 
हिंदु धर्मजागृती सभांची वैशिष्ट्ये या सभांना संतांचे आशीर्वाद व त्यांचा कृतीशील सहभागही लाभला. लहान-मोठे अनेक हिंदुत्ववादी पक्ष, संघटना, तसेच धर्माभिमानी हिंदू यांच्यामध्ये या सभांद्वारे एकतेची भावना निर्माण झाली. हिंदु जागृत असून आपण त्यांना फसवू शकत नाही, हे या सभांतून हिंदूंनी राज्यकर्त्यांना, तसेच हिंदुद्रोही व हिंदुद्वेष्टे यांना ठणकावले. या सभांमधून हिंदूंना धर्माच्या सद्यस्थितीबाबत जागरूक करण्याबरोबरच प्राप्‍त परिस्थिती बदलण्यासाठी आत्मबळ वाढवण्याच्या दृष्टीने साधना करणे कसे अनिवार्य आहे, हेही सांगण्यात आले. धर्मासाठी काहीतरी करू इच्छिणार्‍या, पण `मी एकटा काय करू ?’ या विचारात असणार्‍या समस्त धर्माभिमानी हिंदूंना धर्मकार्य करण्यासाठी दिशा मिळाली. सभांमध्ये `हर हर महादेव’च्या उत्स्फूर्त गजरात धर्माभिमानी हिंदूंनी संमत केलेले ठराव !
१. रामसेतू पाडणार्‍या सरकारचा निषेध !
२. प्रखर हिंदुत्ववादी `सनातन प्रभात’च्या संपादकांना अन्यायपूर्वक अटक करणार्‍या आणि त्याच वेळी हिंदूंच्या देवता व भारतमाता यांची नग्न चित्रे रेखाटणार्‍या म.फि. हुसेनसारख्यांना अटक करू न शकणार्‍या सरकारचा निषेध !
३. गोवा राज्यातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींच्या तोडफोडीकडे सरकार गांभीर्याने पहात नाही. ही देवळे पाडणे, हे मूर्तीभंजन होणे, म्हणजे आमच्या हिंदुहृदयावर झालेला आघात आहे व तो आम्ही कधीही सहन करणार नाही.
४. महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन व मंदिर सरकारीकरण या हिंदु धर्मविरोधी कायद्यांचा तीका निषेध !
धर्मसभांची क्षणचित्रे
१. प्रत्येक धर्मसभेची सुरुवात वेदमंत्रांच्या पठणाने झाली.
२. सभास्थळी धर्माभिमानी बालकांनी पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण व हिंदुत्वाचे आचरण यांविषयी प्रबोधन करणारा कक्ष उभारला होता.
३. सभास्थळी विविध आध्यात्मिक संस्थांनी धर्मविषयक प्रबोधन
करणारे कक्ष उभारले होते.
४. जिहादी दहशतवादामुळे काश्मीरमधील हिंदूंची झालेली विदारक स्थिती फॅक्ट’निर्मित `दहशतवादाचे भीषण सत्य’ या प्रदर्शनाद्वारे दाखवण्यात आली.

समितीची यशस्वी वाटचाल आता उत्तर भारताकडे !
तीन राज्यांतील हिंदूंच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता हिंदु जनजागृती समितीतर्फे उत्तर भारतात इंदूर, अहमदाबाद, फरीदाबाद, दिल्ली, वाराणसी, कतरास व धनबाद या सात ठिकाणी धर्मजागृती सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

जाहीर सभांमध्ये `आम्ही हे करू, हे देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी बनवणार्‍या राजकीय पक्षांचे नेते काळाच्या ओघात विस्मृतीत जातात, तर जनतेला त्याग शिकवणारे लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखे नेते अजरामर होतात !’ समितीच्या धर्मसभाही हिंदूंना त्यागाची शिकवण देत आहेत.

 |  मित्रांना पाठवा छापील प्रत

  निगडीत वृत्त : हिंदु जनजागृती समिती

अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण हीच काँग्रेसची नीती !

२२ ऑगस्ट रोजी मुंबई येथील के.सी. कॉलेजच्या सभागृहात `अमरनाथ यात्रा व जम्मू-काश्मीर वाद’ या विषयाच्या अनुषंगाने झालेल्या भाजपच्या सभेत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केले.

 

श्री. नितीन गडकरी यांच्या भाषणाचा संक्षिप्‍त वृत्तांत
“भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करण्याची नीती काँग्रेसने अवलंबली आहे. हिंदूंच्या अस्मितेचा कोणताही विषय असो त्याविषयी सातत्याने अन्यायाची भूमिका घेणे म्हणजे धर्मनिरपेक्षता आहे, असा अर्थ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी काढला आहे. मुंबई दहशतवाद्यांचे केंद्र बनले आहे; सरकारची भूमिका मात्र अतिशय नरम आहे. काश्मीरमध्ये जे दहशतवादी होते, जे पाकिस्तानच्या बाजूने लढत होते ते `हिंदुस्थान मुर्दाबाद’चे नारे देत होते. त्यांच्यापैकी ज्यांचा मृत्यू झाला त्यांना सरकारने पाच लाख रुपये मदत जाहीर केली, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांच्या परिवाराला आता पेन्शन जाहीर केले. महाराष्ट्राचे शिवराज पाटील केंद्रात गृहमंत्री असतांनाही संसदेवर हल्ला करणारा अफझलची धारिकाच राष्ट्रपतींकडे गेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई बाँबस्फोटांतील आरोपीचा वकील मजीद मेमन यांना अखिल भारतीय सरचिटणीस बनवले. त्यामागील त्यांचा उद्देश एकच होता. तो म्हणजे मुसलमान समाजाची सहानुभूती मिळवणे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तारिक अन्वर व काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून अझफलची शिक्षा माफ व्हावी, असे सांगितले. अशा एका ना अनेक गोष्टी आहेत. सर्व धर्मांना समान न्याय मिळाला पाहिजे, ही आपली अपेक्षा आहे; पण अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करण्याचे धोरण काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी अवलंबले. ज्या सिमीचा मुंबईपासून, गुजरात, बेंगळूरू अशा अनेक ठिकाणी बाँबस्फोट करण्यामागे हात आहे, त्या सिमीला काँग्रेसचे सहकारी श्री. मुलायमसिंग यादव, लालुप्रसाद यादव व काँग्रेसचे नेते यांनी देशभक्‍तीचे `प्रमाणपत्र’च दिले. काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी जेव्हा मुंबईत आल्या, तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले, `मुसलमान समाजाला चौकशीकरता `टार्गेट’ करू नका.’ या शंभर कोटींच्या हिंदुस्थानमध्ये अमरनाथच्या यात्रेकरूंच्या सुविधांकरता शंभर एकर जमीन मिळू शकत नाही.
सर्व काँग्रेसचे नेते बाँबस्फोटांतील आरोपींना संरक्षण देण्याचे काम करत आहेत. दाऊदचा भाऊ इब्राहीम हा उद्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला, तरीही मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. हिंदुत्व मुसलमानांच्या विरोधात नाही. काँग्रेसने मुसलमानांचा उपयोग केवळ भावनात्मक राजकारणाकरता केला. अमरनाथ प्रकरणी राष्ट्रवादीच्या मुस्लीम नेत्यांनी विरोध करण्याचे कारण काय ?”

वाचा…. अमरनाथ विशेष

 

 |  मित्रांना पाठवा छापील प्रत

  निगडीत वृत्त : नालायक लोकप्रतिनिधी

गुजरातमधील दंगलींमध्ये हिंदूंना दोषी ठरवणार्‍यांनो, `गोध्रामध्ये काय घडले होते’, हे लक्षात ठेवा !

२७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरातमधील गोध्रा रेल्वेस्थानकावर ९१६६ क्रमांकाच्या मुजफ्फरपूर-अहमदाबाद साबरमती एक्स्प्रेसच्या एस्-६ डब्याला धर्मांध मुसलमानांनी आग लावून ५९ हिंदूंना जिवंत जाळले. त्यांच्यापैकी ७ जण ओळख पटण्यापलीकडे जळाले. जळालेला डबा हा राममंदिरासाठी जाणार्‍या कारसेवकांचा होता.

 

त्यांनी राममंदिर बांधण्यासाठी जाऊ नये, यासाठी हे नरसंहारक कृत्य करण्यात आले, हे सुस्पष्ट आहे. मुसलमानांनी हे दहशतवादी कृत्य घडवून आणल्यावर त्यांना पाठीशी घालण्यासाठी निधर्मीवादी राज्यकर्त्यांनी व पत्रकारांनी `रेल्वेला लागलेली आग हा अपघात होता’ व `ते हत्याकांड नव्हते, तर जळीतकांड होते’, असा कांगावा सुरू केला. हल्लेखोरांना `या रेल्वेत कोण आहेत’, याची संपूर्ण माहिती होती. त्यांच्यावर कसा हल्ला करायचा, हे त्यांनी आधीच ठरवले होते. अन्यथा डिझेल अन् पेट्रोल घेऊन कोणी रेल्वेकडे धावणार नाही व ती पेटवण्याचा विचारही करणार नाही. समुदायाने ज्या संख्येने हा हल्ला केला व ज्या झपाट्याने ठरवलेले निर्घृण कृत्य घडवून आणले, त्या बाबी पूर्वनियोजनानेच घडू शकतात. इतका पराकोटीचा द्वेष, क्रूरता व त्यानुरूप संघटित कृती करण्याची तयारी एखाद्या समुदायाकडून होत असेल, तर ती एका दिवसात घडणारी घटना असूच शकत नाही.
वृत्तपत्रकार व प्रसारमाध्यमे यांनी `गुजरातमध्ये गोध्राकांडानंतर उसळलेल्या दंगलींमध्ये `निरपराध मुसलमानांची कत्तल करणारे नाझी’, असे हिंदूंचे वर्णन केले. हिंदूंना मूलतत्त्ववादी संबोधण्यात आहे. गुजरातच्या प्रकरणावरून सर्व हिंदूंना मूलतत्त्ववादी म्हणणे, म्हणजे त्यांचा केवळ निर्बुद्धपणाच नव्हे, तर त्यात त्यांनी केलेला अन्याय व पक्षपातही दिसून येतो. गोध्रा प्रकरणानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलींमध्ये जे घडले, त्यात २५ टक्के हिंदूही मारले गेले होते व त्यानंतर ज्या दंगली झाल्या, त्या मुसलमानांकडूनच झाल्या होत्या. याची नोंद करण्यास पत्रकार व राज्यकर्ते विसरतात. गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमधील उसळलेल्या दंगलींच्या वेळी पाश्चिमात्य पत्रकारांनी हिंदूंबद्दल जे काही विपर्यस्त लिहिले त्याचा प्रतिवाद पें्रऎच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांनी त्या वेळी केला होता. तो पुढीलप्रमाणे आहे,
“पाश्चिमात्य वृत्तपत्र व इंग्रजी माध्यमाच्या भारतीय प्रसारमाध्यमांनी, `माथेफिरू मूलतत्त्ववादी हिंदू शांतीप्रिय मुसलमानांच्या मागे लागलेले आहेत’, असे गुजरामधील दंगलीसंदर्भात म्हटल्याचे आपण पहातो; परंतु वस्तूस्थिती वेगळी आहे. सतत होणारी बदनामी, हल्ले, कत्तली, स्त्रियांवरील बलात्कार, बंदुकीच्या गोळया व हातगोळे यांच्या मार्‍याने वरून उद्ध्वस्त होणारी मंदिरे यांमुळे सहिष्णू, ईश्‍वराप्रती श्रद्धा असणारे, शांतताप्रिय हिंदू त्रासलेले नाहीत का ? या ग्रहावरील अत्यंत शांतताप्रिय, अनुशासनप्रिय, कायदा पाळणारा, सहिष्णू व वैभवसंपन्न, असा हा हिंदु समाज आहे. अखिल विश्‍वात यांची संख्या शंभर कोटी आहे. म्हणजे जगाच्या मानवजातीच्या एक षष्ठांश प्रतिनिधित्व हिंदूंचे आहे. त्यामुळे निधर्मी पक्ष व प्रसारमाध्यमे यांनी हिंदूंना माथेफिरू म्हणून हिणवण्याऐवजी अथवा देशातील केवळ मुसलमानांचा विचार न करत हिंदूंच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत.”

 

वाचा…. अमरनाथ विशेष

 |  मित्रांना पाठवा | छापील प्रत

  निगडीत वृत्त : हे वाचून ज्याचे रक्त सळसळत नाही, तो हिंदू नव्हे

जम्मू लढ्याचे सामरिक महत्त्व !

गेल्या ६१ वर्षांत केंद्रातील एकाही सरकारने पाकव्याप्‍त काश्मीर भारतात आणण्याचा प्रयत्‍न केला नाही. काश्मीरमधील आतंकवाद मोडण्याची स्पष्ट सूचना सैन्याला मिळालेली नाही. इस्लामी आतंकवादाविरुद्ध कठोर कारवाई केल्यास भारतातील मुसलमान दु:खी होतील आणि हिंदी राष्ट्र बनवण्यास त्यांचे सहकार्य मिळणार नाही, या भीतीने भारत सरकार आतंकवादाकडे काणाडोळा करते. अशा स्थितीत जम्मूमधील हिंदूंनी दाखवलेला पुरुषार्थाचा आविष्कार पाहून सर्व डोळस भारतियांना, विशेषत: भारताच्या सेनादलांना हर्ष होणे साहजिक आहे !

 

श्री बाबा अमरनाथ लढ्यात जम्मूची जनता एकजुटीने रस्त्यावर उतरली आणि तिची भूमिका उर्वरित भारताने उचलून धरली. या घटनेला एक सामरिक अर्थ आहे. इस्लामी दहशतवादाविरुद्ध लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुढे आले, अशी घटना भारतात प्रथमच घडत आहे. हा पुरुषार्थाचा आविष्कार आहे. तो पाहून सर्व डोळस भारतियांना हर्ष होणे साहजिक आहे. तथापी सर्वाधिक आनंद भारताच्या सेनादलांना, विशेषत: भूदलाला झाला आहे; कारण या लढाईतील महत्त्वाची आघाडी सांभाळायला साक्षात जनताजनार्दन पुढे आल्याने भूदलाने फार मोठा सुस्कारा टाकला आहे. भूदलाचे सामर्थ्य वाढले आहे. काश्मीर आघाडीवर गेली ६१ वर्षे एकाकी लढत देणार्‍या भारतीय भूदलाची कहाणी जशी रोमांचक आहे, तशी शोकात्मसुद्धा आहे. १९४७ मध्ये पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले तेव्हा ते परतवून लावण्यास भारतीय सैन्य सिद्ध होते. त्यांनी अर्धे काश्मीर मुक्‍तही केले होते आणि उरलेले काश्मीर पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी ते सैन्य पुढे जात होते. पंतप्रधान नेहरूंनी भारतीय सैन्याला मध्येच थांबण्याची आज्ञा दिली. त्यांनी हा विषय संयुक्‍त राष्ट्र संघाच्या दारात नेऊन ठेवला. त्याचा पाकिस्तानवर काही परिणाम झाला नाही. काश्मीरसाठी पाकिस्तानने चार मोठी आक्रमणे भारतावर केली. भारतीय सैनिकांपेक्षा पाकिस्तानी सैनिक शौर्यात कमी पडल्याने त्यांनी समोरासमोर युद्ध टाळून छद्मी युद्धाचा आश्रय घेतला. आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनांशी पाकिस्तानचे साटेलोटे आहे. पाकिस्तान स्वत:च प्रमुख इस्लामी आतंकवादाचे केंद्र आहे. आयएस्आय आणि अशाच संघटनांकरवी घातपाती कृत्यांंनी संपूर्ण भारत खिळखिळा करण्याची पाकिस्तानची योजना आहे. कितीही नाही म्हटले, तरी वाट चुकलेल्या भारतातील मुसलमान समाजाचा ही योजना यशस्वी करण्यात सहभाग आहे. `काश्मीरवाचून फाळणीचे हिशेब पूर्ण होत नाहीत’, असे प्रत्येक पाकिस्तानी पंतप्रधान म्हणत आला आहे. तेव्हा काश्मीरच्या मुद्यावर पाकिस्तानी राज्यकर्ते आणि एकंदर राजकीय जग, पाकिस्तानी सैन्य, तेथील सर्वसाधारण जनता, तसेच भारतातील मोठ्या प्रमाणातील पाकिस्तानी प्रवृत्तीचे मुसलमान या सगळयांचे एकमत आहे. त्यांना काश्मीर भारतापासून तोडून पाकिस्तानात समाविष्ट करायचे आहे. भारतात नेमकी उलट परिस्थिती असून तीच भारतीय सैन्याची मोठी डोकेदुखी ठरली आहे. गेल्या ६१ वर्षांत केंद्रातील एकाही सरकारने पाकव्याप्‍त काश्मीर भारतात आणण्याचा प्रयत्‍न केला नाही. काश्मीरमधील आतंकवाद मोडण्याची स्पष्ट सूचना सैन्याला मिळालेली नाही. इस्लामी आतंकवादाविरुद्ध कठोर कारवाई केल्यास भारतातील मुसलमान दु:खी होतील आणि हिंदी राष्ट्र बनवण्यास त्यांचे सहकार्य मिळणार नाही. या भीतीने भारत सरकार आतंकवादाकडे काणाडोळा करते. खुशवंतसिंग स्वत: आणि त्यांच्या पठडीतले स्वच्छंदी पत्रकार `काश्मिरातील मुसलमानांना जे हवे ते देऊन टाका आणि प्रश्‍न कायमचा मिटवा’, असा प्रचार गेला महिनाभर करत आहेत. त्यामुळे काश्मिरात भारतीय सैन्य एकाकी पडले आहे. भारताचे सार्वभौमत्व, अखंडत्व आणि एकात्मता यांचे रक्षण करण्यासाठी सैन्याने पाऊल उचलले की, `मानवाधिकाराचा भंग होतो’, अशी ओरड जगातील भारतविरोधी संघटना करतात. आता जम्मूची जनता मैदानात युद्धमान अवस्थेत उतरली आहे. त्यामुळे भारतविरोधी सर्व संबंधित घटकांना काश्मिरात दोन आघाड्यांवर लढावे लागेल. उर्वरित भारतातून जनतेचा पाठिंबा सक्रीय झाल्यास तिसरी आघाडी उघडली जाईल. जनता आणि सैन्य यांचे ध्येय एक होईल. मग चुटकीसरशी काश्मीर प्रश्‍न सुटेल !
- सुघोष

 |  मित्रांना पाठवा छापील प्रत

  निगडीत वृत्त : शरसंधान