म्हणे राष्ट्रीय स्मारक होण्यासाठीचे निकष रामसेतू पूर्ण करत नाही !

आता राष्ट्रीय स्मारकाचे निकष लावून रामसेतू नष्ट करू पहाणारे धर्मद्रोही केंद्र सरकार !

रामसेतू हिंदूंचा, म्हणून त्याचा द्वेष करणारे केंद्रातील सरकार !

नवी दिल्ली – कोणतीही वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी जे निकष ठरलेले आहेत, त्या निकषांमध्ये रामसेतू बसत नाही, या निष्कर्षाप्रत सरकार पोहोचले आहे, असे केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात सांगितले.

(याला म्हणतात राज्यकर्त्यांचा कर्मदरिद्रीपणा ! रामसेतू अन्य कुठल्या देशात असता, तर `जगातील सर्वांत पुरातन सेतू’ म्हणून त्या देशाने तो अभिमानाने मिरवला असता ! – संपादक) सरन्यायाधीश श्री. बालकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील खंडपिठासमोर ज्येष्ठ विधीज्ञ फाली नरीमन यांनी आज सरकारची बाजू मांडली. रामसेतू उद्ध्वस्त न करता सेतूसमुद्रम प्रकल्प पर्यायी मार्गाने राबवता येणार का, असे खंडपिठाने विचारल्यावर अँड्. नरीमन म्हणाले, “तशी कोणतीही स्पष्ट सूचना सरकारने मला दिलेली नाही. तथापी आज संध्याकाळी किंवा उद्या याविषयी सरकारकडून तसे कळवले जाऊ शकते. पर्यायी मार्ग अवलंबण्याचा मुद्दा विशेष आहे. त्याविषयी शास्त्रशुद्ध अभ्यास केला जात आहे. मंगळवारी किंवा बुधवारी मी न्यायालयात याविषयीचे सरकारचे म्हणणे मांडीन.” रामानेच रामसेतू उद्ध्वस्त केला, असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने २४ जुलै रोजी न्यायालयात सादर केले होते. (एकदा `राम काल्पनिक होता’, असे केंद्र सरकार म्हणते, तर एकदा `रामानेच रामसेतू उद्ध्वस्त केला’, असे म्हणते. काल्पनिक राम रामसेतू उद्ध्वस्त कसा करणार ? हिंदुद्वेषापोटी विसंगत विधाने करून आपण स्वत:चे हसे करून घेत आहोत, याचेही भान न उरलेले केंद्र सरकार ! – संपादक) दुसर्‍या दिवशी सरकारने स्वत:ची भूमिका बदलत `सरकार पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याच्या विचर करत आहे, अशी भूमिका मांडली.

 |  मित्रांना पाठवा |  38 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : रामसेतू प्रकरण

Leave a Reply