काश्मीरमधील दहशतवाद्यांना युरोपमधून निधीपुरवठा !

जम्मू, २७ जुलै (संकेतस्थळावरून) – काश्मीरमधील दहशतवाद्यांना पैसा पुरवणार्‍या नेदरलँडमधील एक बिगरसरकारी संस्था, कोलकाता येथील एक महिला प्राध्यापक व अहमदाबादस्थित एक वकील यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करणारे एक पत्र गुप्‍तचर संस्थेने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला लिहिले आहे.

(अशा भारतद्वेष्ट्यांवर तात्काळ कारवाई करण्याऐवजी धिम्या गतीने काम करणारी गुप्‍तचर संस्था ! – संपादक) या देशद्रोही भारतियांनी एकत्र येऊन युरोपमध्ये भारताच्या विरोधात प्रचार सुरू केला आहे. तसेच काश्मीरमधील दहशतवादी संघटनांना पैसा पुरवण्यासाठी ते युरोपमध्ये निधी उभारत असून आतापर्यंत कोट्यवधी रुपये जमा केले आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
अमेरिकेत कार्यरत असलेल्या काश्मीरमधील काही विघटनवादी व नेदरलँड येथील बिगर सरकारी संघटना काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा प्रचार युरोपमध्ये करत आहेत. (काश्मीरमधील दहशतवादी दररोज बाँबस्फोट व हिंसाचार यांद्वारे जनतेच्या मानवाधिकारांचे उल्लंघन करत असतांना त्याविषयी मूग गिळून बसणारे वैचारिक क्रांती अपरिहार्य करतात ! – संपादक) गुलाम नबी फाई हा देशद्रोही सध्या अमेरिकेत कार्यरत असून तो स्वत:ची संपूर्ण शक्‍ती भारतविरोधी प्रचार करणे व दहशतवाद्यांसाठी पैसा उभारणे यांसाठी वापरत आहे. तसेच युरोपमधील पाकिस्तानच्या वकिलाती भारताच्या विरोधात कारवाया करण्यामध्ये गुंतलेल्या आहेत. (याबाबत पाकिस्तान सरकारला केंद्र सरकार जाब विचारणार का ? – संपादक)
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कोलकाता येथील आयएस्आयची हस्तक असलेली महिला प्राध्यापक व अहमदाबाद येथील वकील यांचे पारपत्र रद्द करण्यासाठी प्रयत्‍न सुरू केले आहेत. भारत या प्रकरणी नेदरलँडच्या उच्चायुक्‍तांकडे संपर्क साधण्याचीही शक्यता आहे.

 |  मित्रांना पाठवा |  39 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : दहशतवादाने पोखरलेला भारत

अहमदाबाद व सुरत येथे स्फोटकांनी भरलेल्या गाड्या सापडल्या

लोकहो, सावधान ! दहशतवाद गावागावांत पोहोचला आहे !


सिमीच्या दहशतवाद्याला अटक


३० जण ताब्यात

 

 


 

अहमदाबाद, २७ जुलै (वृत्तसंस्था / प्रे.ट्र.) – सुरत येथे पोलिसांना स्फोटकांनी भरलेल्या दोन चारचाकी गाड्या सापडल्या. आज शहरातील पूनागम रुग्णालयाच्या नजीक डिटोनेटर्सने भरलेली काळया रंगाची वॅगनआर् गाडी सापडली, तर वरच्छा परिसरामध्ये स्फोटकांनी भरलेली लाल रंगाची मारुती सापडली. या दोन्ही गाड्यांवरील क्रमांकाच्या पट्ट्या बनावट असल्याचे पोलिसांनी सांगितले. (सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी काश्मीरमधील दहशतवाद वेळीच निपटला असता, तर आज सर्वत्र दहशतवाद फोफावला नसता ! – संपादक)
“काल रात्रीपासून पूनागम रुग्णालयाच्या नजीक चारचाकी गाडी उभी होती”, अशी माहिती स्थानिकांनी दिली. “बाँब तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य या गाडीमध्ये उपलब्ध आहे”, अशी माहिती पोलिसांनी दिली. आज अहमदाबाद व सुरत या शहरांमध्ये सापडलेले जिवंत बाँब निकामी करण्यात आले. या घटनेमुळे गुजरातमधील जनता अजूनही भीतीच्या सावटाखाली वावरत आहे.
काल अहमदाबादमध्ये झालेल्या १६ बाँबस्फोटांमधील मृतांची संख्या ४५ वर गेली असून बाँबस्फोटांमध्ये १६२ जण जखमी झाले आहेत. (निष्पाप नागरिकांचे बळी घेणार्‍या दहशतवादाचे दुष्टच्रक थांबवू न शकणारे नाकर्ते राज्यकर्ते वैचारिक क्रांती अपरिहार्य करतात ! – संपादक) आज अहमदाबादमध्ये लष्कराने ध्वजसंचलन केले.


अहमदाबाद व सुरत येथील जिवंत बाँब निकामी
सुरतमध्ये जिवंत बाँब व स्फोटके असलेले साहित्य असणार्‍या गाड्या सापडल्यानंतर प्रशासनाने शहरात दक्षतेचे आदेश दिले आहेत. अहमदाबादमधील हाटकेश्‍वर परिसरामध्ये कचरा कुंडीमध्ये जिवंत बाँब सापडला. सुरत येथील सिटीलाईट परिसरामध्ये नुपूर रुग्णालयाच्या नजीक जिवंत बाँब सापडला. या दोन्ही बाँबना `टायमर’ बसवलेला होता. पोलिसांच्या बाँब निकामी करणार्‍या पथकाने हे बाँब निकामी केले. सुरतमध्ये जिवंत बाँब व स्फोटके भरलेल्या गाड्या सापडल्यामुळे तेथे दक्षतेचे आदेश देण्यात आले. त्यामुळे शहरातील चित्रपटगृहे व व्यापारी आस्थापने बंद करण्याची सूचना प्रशासनाने दिली.


अहमदाबादमधील बाँबस्फोटांच्या प्रकरणात सिमीच्या दहशतवाद्याला अटक
सरकारने बंदी घातलेल्या सिमी या दहशतवादी संघटनेच्या अब्दुल हलीम या दहशतवाद्याला अटक करण्यात आली. गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलींनंतर तो फरारी होता. “अब्दुल दिल्लीत लपून बसला आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर आम्ही दिल्लीच्या पोलिसांना कळवले होते. तो ज्या ठिकाणी लपून बसला होता, तेथील माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली”, अशी माहिती अहमदाबादचे पोलीस सहआयुक्‍त श्री. आशिष भाटिया यांनी दिली. “काल झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर त्याला अटक करण्यात आली. “गुजरातमधील दंगलींच्या वेळी बळी पडलेल्या लोकांसाठी अहमदाबाद व त्यांच्या परिसरात पुनर्वसन केंद्रे उभारण्यात आली होती. त्या केंद्रांतून असंतुष्ट युवकांना उत्तरप्रदेशमध्ये नेण्यात आले. तेथून भारताच्या सीमापार असलेल्या दहशतवादी तळांमध्ये त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी दहशतवाद्यांचे एक जाळे कार्यरत होते. या जाळयातील अब्दुल हा घटक होता”, अशी माहिती श्री. भाटिया यांनी दिली. बंगळुरू व अहमदाबाद येथे झालेल्या बाँबस्फोटांमध्ये साम्य होते. अहमदाबादच्या गुप्‍तचर विभागाने ३० जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये २ सायकल विक्रेत्यांचाही समावेश आहे. प्रत्यक्षदर्शीचीही पोलीस कसून चौकशी करत आहेत.

संशयिताचे रेखाचित्र तयार
आज अहमदाबादमधील पोलिसांनी एका संशयिताचे रेखाचित्र तयार केले. एका प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरून हे रेखाचित्र काढण्यात आले आहे. संबंधित प्रत्यक्षदर्शी संध्याकाळी चार वाजता तेथील सरकारी रुग्णालयामध्ये गेला होता. त्या वेळी सदर संशयिताचे भ्रमणध्वनीवरील संभाषण त्याने ऐकले. “बंगळुरूमधील चुका येथे होणार नाहीत. आम्ही येथे चुकणार नाही”, असे संशयित भ्रमणध्वनीवरून सांगत होता. प्रत्यक्षदर्शी म्हणाला,“मी या संभाषणाकडे गांभीर्याने घेतले नाही; मात्र बंगळुरू व अहमदाबाद येथील बाँबस्फोटांच्या नंतर मला सदर व्यक्‍तीचा संशय आल्याने मी पोलिसांना माहिती दिली.”

लालकृष्ण अडवाणी यांची जखमींना भेट
आज भाजपचे वरिष्ठ नेते श्री. लालकृष्ण अडवाणी यांनी जखमींची सरकारी रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी त्यांच्यासोबत होते.

 |  मित्रांना पाठवा |  67 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : दहशतवादाने पोखरलेला भारत