आणखी किती नागरिक बाँबस्फोटांत मेल्यावर राज्यकर्ते दहशतवादाबाबत आक्रमक भूमिका घेणार ?
१३ बाँबस्फोटांत १४ ठार
अहमदाबाद, २६ जुलै – काल बंगळुरू येथे बाँबस्फोटांची मालिका घडल्यानंतर आज अहमदाबादमध्ये साखळी बाँबस्फोट झाले. हाती आलेल्या अंतिम वृत्तानुसार एकापाठोपाठ एक असे १३ बाँबस्फोट होऊन त्यात १४ जण ठार झाले, तर ७० हून अधिक जण गंभीर जखमी झाले. (षंढ राज्यकर्त्यांच्या निष्क्रीयतेचे फलीत ! आणखी किती नागरिक बाँबस्फोटांत मेल्यावर राज्यकर्त्यांचे मन शांत होणार आहे ? लोकहो, अशा षंढ राज्यकर्त्यांना हटवा. – संपादक) या बाँबस्फोटांबाबतचे संगणकीय पत्र गुप्तचर संघटनेला आज सायं. ६ वा. मिळाले होते; मात्र यासंदर्भात तपास सुरू असतांनाच सायं. ६.३० वा. हे स्फोट झाले. यापैकी दोन बाँबस्फोट मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात झाले आहेत, तर एक बाँबस्फोट विहिंपतर्फे गरिबांसाठी चालवण्यात येणार्या धन्वंतरी रुग्णालयात झाला. (हिंदूंना लक्ष्य करणारे मुसलमान `दहशतवादी कोणत्याही धर्माचे नसतात’, असे म्हणणार्यांना याबाबत काय म्हणायचे आहे ? यातून देशाची सुरक्षायंत्रणा किती कमकूवत आहे, हे स्पष्ट होते. अशा सुरक्षायंत्रणेच्या हातात देश सुरक्षित काय रहाणार ?- संपादक)
काल बंगळुरू येथे ९ ठिकाणी बाँबस्फोट झाले. यानंतर संपूर्ण देशभरातील अतीसंवेदनशील शहरांत अतीदक्षतेचा इशारा देण्यात आला होता; मात्र या दक्षतेलाही न जुमानता दहशतवाद्यांनी आज सायंकाळी मणिपूर, सरदार पटेल हिराबाजार, सरनपुर ब्रीज, इसनपूर, हटकेश्वर सर्कल, रायपूर, बापूनगर, नरोल व अन्य ठिकाणी एका पाठोपाठ एक बाँबस्फोट केले. हे स्फोट अत्यंत गर्दीच्या ठिकाणी झाले असल्याने संपूर्ण शहर हादरले आहे. हे बाँब सायकलवर जेवणाच्या डब्यात ठेवण्यात आले होते. यापूर्वीही विविध ठिकाणी झालेल्या बाँबस्फोटांत सायकलचा वापर करण्यात आला होता. या स्फोटांत १४ ठार, तर अनेक गंभीर जखमी झाले आहेत. हे स्फोट कमी शक्तीशाली असल्याचे म्हटले जाते. (जनतेचा जीव घेणारे बाँबस्फोट म्हणे कमी शक्तीशाली ! – संपादक) या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात तिहेरी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
गुप्तचर संघटनेला इंडियन मुजाहिद्दीन (सिमी या बंदी असलेल्या संघटनेचे धारण केलेले नवीन नाव) या संघटनेने पाठवलेल्या संगणकीय पत्रात म्हटले आहे, “अहमदाबाद व गुजरात येथे ठिकठिकाणी आम्ही बाँबस्फोट करू. तुम्हाला हे स्फोट थांबवून दाखवायचे असेल, तर थांबवून दाखवा. जातीयवाद्यांना आमचा विरोध आहे. ही आमची सुरुवात आहे.” (भारतीय सुरक्षा यंत्रणेला इस्लामी दहशतवाद्यांचे आव्हान ! सिमीवर बंदी घालूनही तिच्या कारवाया चालू आहेत, ही सरकारला बसलेली चपराकच होय. – संपादक)
दहशतवाद्यांचे षडयंत्र – तोगडिया
विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस श्री. प्रवीण तोगडिया यासंदर्भात प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, हे दहशतवाद्यांचे षडयंत्र आहे. पूर्व अहमदाबाद हा हिंदुबहुल परिसर असून त्याला लक्ष्य करण्यात आले आहे.
| मित्रांना पाठवा | 14 – वाचक संख्या | छापील प्रत
|