ताजमहाल शिवमंदिर आहे, थडगे नव्हे !

२४ जुलै रोजी ताजमहाल शिवमंदिर असल्याचा दावा करत काही शिवसैनिकांनी ताजमहाल गाठले व तेथे पूजा केली. या घटनेमुळे ताजमहाल खरोखर पूर्वीचे हिंदूंचे मंदिर होते का, या चर्चेला उधाण आले. प्रसिद्ध इतिहाससंशोधक कै. प्रा. पु.ना. ओक यांच्या `ताजमहाल : द ट्रू स्टोरी’ या पुस्तकातील अनेक पुरावे ताजमहाल शिवमंदिरच असल्याची साक्ष देतात.

 

लेखक : डॉ. वासुदेव शं. गोडबोले, इंग्लंड
शहाजहानने ताजमहाल बांधला नाही, तर राजा जयसिंगाकडून बळकावला प्रा. पु.ना. ओक त्यांच्या `ताजमहाल : द ट्रू स्टोरी’ या पुस्तकात लिहितात, “ ताजमहाल हे बेगम मुमताज यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारलेले थडगे नव्हे, तर ते शिवाचे एक प्राचीन मंदिर होते. (`तेजोमहालय’ या नावाने त्या वेळी त्याला ओळखायचे.) शहाजहान यांनी हे शिवमंदिर त्या वेळचे जयपूरचे महाराजा जयसिंग यांच्याकडून बळकावले. शहाजहान यांनी स्वत:च्याच दरबारातील बखर असलेल्या `बादशहानामा’मध्ये, मुमताजचे थडगे बनवण्यासाठी आग्रा येथील सुंदर ताजमहाल राजा जयसिंग यांच्याकडून बळकावल्याचे मान्य केले आहे.

मुमताज महालमुळेच `ताजमहाल’ हा शब्द प्रचलित, असे म्हणणे आधारहीन ! जयपूरच्या महाराजांच्या पूर्वीच्या गोपनीय कागदपत्रांमध्ये शहाजहान यांचे ताजमहाल त्यांना सुपुर्द करण्याचे आदेश उपलब्ध आहेत. त्या काळी अशा प्रकारे बळाकावलेल्या इमारतींचा वापर राजदरबारातील मृतांच्या थडग्यांसाठी करण्याची पद्धत मुसलमान राज्यकर्त्यांमध्ये प्रचलित होती. हुमायून, अकबर, एतमूद-उद-दौला, सफ्दरजंग यांची थडगीही महालांमध्ये उभारण्यात आली आहेत. इमारतींसाठी `महाल’ हा शब्द मुसलमान राष्ट्रांमध्ये कधीच वापरला जात नव्हता. त्यामुळे मुमताज महालमुळेच `ताजमहाल’ हा शब्द प्रचलित झाल्याच्या विधानाला तर्कशास्त्रानुसार कोणताच आधार प्राप्‍त होत नाही.

ताजमहालचा दरवाजा शहाजहानच्या कालखंडाच्या ३०० वर्षे पूर्वीचा – मर्वीन मिलर यांची स्पष्टोक्‍ती !
मुमताज व शहाजहान यांची प्रेमकहाणी ही दरबारातील खुशामतींनी घडवलेली एक दंतकथा आहे; कारण या प्रेमकहाणीचा कोणताही पुरावा ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये उपलब्ध नाही, असा दावा प्रा. ओक यांनी केला होता. शहाजहान यांच्या खूप पूर्वीपासून ताजमहाल अस्तित्वात असल्याचे अनेक पुरावे प्रा. ओक यांनी सादर केले होते. ते पूर्वीचे शिवमंदिर होते व आग्रा शहरातील रजपूत तेथे पूजा करायचे. उदा. न्यूयॉर्कमधील प्रा. मर्वीन मिलर यांनी कार्बन डेटींगचा आधार घेऊन ताजमहालच्या नदीच्या बाजूच्या दरवाज्याची चाचणी केली होती. त्यामध्ये त्यांनी तो दरवाजा शहाजहानच्या कालखंडाच्या ३०० वर्षे पूर्वीचा असल्याचे सिद्ध केले होते. मुमताजच्या निधनानंतर एक वर्षांच्या आत आग्रा येथे भेट दिलेल्या पीटर मुंडी, या ब्रिटीश व्यक्‍तीनेही ताजमहाल शहाजहानच्या पूर्वीपासून त्या ठिकाणी अस्तित्वात होता, असे लिहून ठेवले आहे.

ताजमहालाचे सत्य लपवण्यासाठी इंदिरा गांधी यांची प्रा. ओक यांच्या पुस्तकावर बंदी
ताजमहाल हे शिवमंदिर असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रा. ओक यांनी तेथील नमुने, वास्तूशिल्पकला यांचा आधार घेतला होता. ताजमहालाच्या अनेक खोल्या शहाजहानच्या काळापासून बंदच होत्या व आताही त्या खोल्यांमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही. तेथे शिर छाटलेली शिवाची मूर्ती व हिंदूंच्या मंदिरांत वापरल्या जाणार्‍या इतर वस्तू आहेत. हे सत्य जगासमोर आल्यास राजकीय आकांडतांडव माजेल, या भीतीपोटी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रा. ओक यांच्या पुस्तकावर बंदी घातली होती.
विद्यमान सरकारने ताजमहालातील या खोल्या संयुक्‍त राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या समक्ष खुल्या कराव्यात व त्यांनाच त्यांची चौकशी करू द्यावी, ही अपेक्षा !

`ताजमहाल बांधण्यासाठी २० हजार माणसे २२ वर्षे सतत काम करत होती’, हे फ्रेंच व्यापारी टॅव्हर्नियरचे विधान म्हणजे शुद्ध भूलथाप आहे. हे आकडे आले कोठून ? – डॉ. वासुदेव गोडबोले
(संदर्भ : http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-03-30&action=fullnews&catid=9&id=6584)

 |  मित्रांना पाठवा |  12 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : इतिहासद्रोही राज्यकर्ते

राहुल पणजोबांपेक्षा वेगळा नाही !

लोकसभेच्या विश्‍वासदर्शक ठरावाच्या चर्चेच्या दरम्यान भाषण करतांना श्री. राहुल गांधी यांनी आपण `इंडियन’ आहोत, असे म्हटले आणि त्यानंतर ओमर फारुख अब्दुल्ला यांनी त्यांच्या भाषणात `आपण आधी मुसलमान आहोत, मग भारतीय आहोत’, असे सांगितले. जवाहरलाल नेहरूंचे पणतू श्री. राहुल गांधी हिंदूंना `इंडियन’ होण्याचे आवाहन करत आहे. त्यांच्या तोंडावर लोकसभेत ओमर अब्दुल्लांनी आम्ही मुसलमानच रहाणार आहोत, असे गर्जून सांगितले; पण मुसलमानांनी `इंडियन’ व्हायला पाहिजे, असे श्री. राहुल गांधी एकदाही म्हणत नाहीत !
श्री. राहुल गांधींना भारताचे भावी पंतप्रधान म्हणून लोकांसमोर उभे करण्याचा खटाटोप काँगे्रेस करत आहे. हे भावी पंतप्रधान त्यांच्या पणजोबांपेक्षा वेगळे नाहीत. पणजोबा इंग्लंडच्या आहारी केले होते, तर हे अमेरिकेच्या आहारी गेले आहेत !

 

राहुल गांधी आणि अणूऊर्जासंधी !
लोकसभेतील विश्‍वासदर्शक ठरावावरील चर्चेला अनेक पैलू आहेत. या लेखात श्री. राहुल गांधी आणि उमर फारुख अब्दुल्ला या दोघांच्या भाषणांचा विचार करणार आहोत. दोघेही तरुण आहेत आणि भविष्याविषयी तरुणांच्या मनात जे विचार असतात, ते या दोघांच्या भाषणातून व्यवस्थित व्यक्‍त होतात, असे मानण्याची बौद्धिक शिस्त विचारवंतांनी घालून दिली आहे. आपण काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून नव्हे, तर `इंडियन’ म्हणून बोलायला उभे राहिलो आहोत, अशी सुरुवात श्री. राहुल गांधी यांनी केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या अलीकडील विदर्भ दौर्‍याची कथा सांगितली. कर्ज फेडता येणे अशक्य असलेल्या आणि म्हणून आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या झोपडीस त्यांनी भेट दिली. काबाडकष्ट करून शेतकर्‍याची पत्‍नी आपला मोठा परिवार जगवण्याचा प्रयत्‍न करत असल्याचे त्यांनी पाहिले. `मुले अभ्यास कधी करतात ?, कसा करतात ?’, हे विचारल्यावर त्या बाईने रॉकेलवर जळणारा भगभगीत दिवा म्हणजे टेंभा समोर आणून ठेवला आणि त्या प्रकाशात रात्री, सर्व पोटापाण्याची कामे उरकून झाल्यावर मुले अभ्यास करतात, असे सांगितले. ही कथा सांगून झाल्यावर श्री. गांधी यांनी पददलितांचे संसार सुखी होण्यासाठी विजेची आवश्यकता असून ती पूर्ती अणूऊर्जासंधीने होणार आहे, असे सांगितले. अशी दृष्टी अटलबिहारी वाजपेयींना होती, असेही जाता जाता त्यांनी सांगितले.

राहुल गांधीच्या `इंडियन’ भूमिकेला ओमर अब्दुल्लाचे आव्हान !
ओमर अब्दुल्लांनी आपण भारतीय असलो, तरी मुसलमान आहोत, हे आग्रहाने सांगितले. त्यानंतर लगेच त्यांनी हेही सांगून टाकले की, पूर्वी वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री म्हणून काम करून त्यांनी मोठी चूक केली असून भाजपसमवेत मैत्री करण्याची चूक ते पुन्हा करणार नाहीत. त्याचे कारण देतांना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, भाजप प्रत्येक प्रश्‍नाकडे जातीय दृष्टीने पहातो. अमरनाथ यात्रा सुरळीत चालू होती, त्यात यांनी हिंदु-मुस्लिम असा भेद आणला. काश्मीरची भूमी आमची आहे. त्यासाठी आमचा संघर्ष चालू आहे. जीवनमरणाचा लढा चालू आहे. आमची भूमी आम्ही कोणालाही देणार नाही, हे भाजपवाले समजून घेत नाहीत. श्री. राहुल गांधींच्या भूमिकेला ओमर अब्दुल्लांनी आव्हान दिले आहे. तरी दोघेही बरोबर आहेत, असे मुकाट्याने मानून हिंदूंनी अणूऊर्जासंधीला मान्यता द्यावी, असा त्या दोघांचा आग्रह आहे; म्हणून या दोघांच्या भाषणांची चिकित्सा केली पाहिजे. भारतात दोनच जाती आहेत, असे स्वामी चिन्मयानंद म्हणत. एक म्हणजे आज जे हिंदु आहेत ते आणि दुसरे म्हणजे कालपर्यंत जे हिंदु होते ते. तत्त्वत: स्वामी चिन्मयानंदांची वर्गवारी योग्य आहे; परंतु व्यवहारत: बोलायचे झाले, तर या दोन जातींत तिसरी जात येऊन बसली आहे आणि ती सगळयांत मोठी आहे. ही जात स्वत:ला `इंडियन’ म्हणवून घेते. कांँग्रेसच्या पहिल्याच अधिवेशनात म्हणजे १८८५ मध्ये मुसलमानांची मने जिंकण्यासाठी ज्यांनी `हिंदुत्वाचा’ त्याग केला आणि `हिंदीत्वाचा’ स्वीकार केला, त्या काँग्रेसजनांचे वंशज आज स्वत:ला `इंडियन’ म्हणवून घेतात!

काँग्रेस पक्ष स्थापनेच्या वेळी हिंदुत्वनिष्ठ होता !
परंतु त्या वेळच्या आणि आजच्या काँग्रेसजनांमध्ये खूप मोठा फरक आहे. हिंदी राष्ट्रवादाची निर्मिती हा त्या वेळच्या काँग्रेसजनांच्या दृष्टीने एक प्रयोग होता. त्यांनी मुसलमानांचे लांगूलचालन सुरू केले नव्हते. तसेच हिंदु परंपरांचा अभिमान बाळगण्यात चूक होत असल्याचे त्यांना वाटत नव्हते. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी `आजपासून मी हिंदु राहिलो नाही’ असे घोषित केले, तरी त्यांनी लिहिलेल्या `राईज ऑफ मराठा पॉवर’ (न.र.फाटकांनी केलेले मराठी भाषांतर : मराठी सत्तेचा उत्कर्ष) या पुस्तकावरून श्री शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे मर्म त्यांना कळले होते आणि जरी व्यवहारात हे हिंदी राज्य होणार असले, तरी तत्त्वत: हे हिंदु राष्ट्रच, अशी त्यांची भूमिका होती. पुढे ३० वर्षांनी लो. टिळकांनी लखनौशी संधी करून त्या वेळच्या राजकारणात ब्रिटिशांकडून मिळणार्‍या सवलतीत मुसलमानांना थोडा अधिक वाटा दिला. तरी मुसलमानांची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी श्री गणेशोत्सव आणि हिंदूंना स्वराज्याचा अर्थ नेमका कळण्यासाठी श्री शिवजयंत्युत्सव त्यांनी सुरू केला. त्यावरून ते हिंदुत्वाचे अभिमानी होते, हे सिद्ध होते. राजकारणाची सूत्रे गांधींच्या हाती गेली आणि राष्ट्रवादाच्या संकल्पनात आरपार बदल झाला. हिंदी राष्ट्र निर्मितीसाठी हिंदुत्वाचा म्हणजे हिंदु परंपरांचा तिरस्कार केला पाहिजे, हे पहिले सूत्र गांधींनी रुजवले. दुसरे सूत्र लांगूलचालनाचे. मुसलमानांनी `इंडियन’ होण्यासाठी त्यांच्या मनातील `हिंदु’विषयाची भीती नाहीशी झाली पाहिजे. मुसलमानांच्या मागण्या उदारपणे मान्य करण्याने ही भीती नाहीशी होईल आणि मुसलमानांना हिंदी राष्ट्राविषयी प्रेम निर्माण होईल अणि एकसंध राष्ट्र नव्याने निर्माण होऊन जगासमोर आदर्श उभा केला जाईल, असे स्वप्न गांधींनी हिंदूंना दिले.

राहुल गांधी मुसलमानांना `इंडियन’ होण्याचा आग्रह का धरत नाहीत ?
तेव्हापासून हिंदी राष्ट्र उभे करण्याच्या एकमेव ध्यासाने हिंदू पछाडलेले दिसतात. मुसलमानांना बरे वाटावे; म्हणून काँग्रेसजन हिंदु परंपरांपासून जेवढे दूर जाता येईल, तेवढे दूर जात आहेत आणि मुसलमान मागतील, ते त्यांना देत आहेत. काँग्रेसने हिंदूंना स्वतंत्र करण्याआधी मुसलमानांना स्वतंत्र केले आणि त्यांना सिंहासनात चिणून बसवण्यासाठी पाकिस्तान नवे राष्ट्र निर्माण करून दिले. म्हणजे हिंदी राष्ट्र बनवण्याच्या ढोंगाखाली काँग्रेसने पाकिस्तान बनवले. गांधींनी हिंदी राष्ट्राचे स्वप्न दिले; पण वास्तवात त्यांनी नव्या इस्लामी राष्ट्राची स्थापना केली. साठ वर्षांनंतर काँग्रेसने असा पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या रूपाने उभा केला की, जो राष्ट्रीय संपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे, असे म्हणेल. याच मनमोहनसिंग यांच्या सरकारने सच्चर समिती नेमून मुसलमानांना हवे ते वैधपणे देण्याची सोय केली. काँग्रेस सहजपणे मुसलमानांच्या दबावाला बळी पडते. काँग्रेस तेवढ्याच सहजपणे अमेरिकेच्या दबावाला बळी पडणार आहे. अमेरिका जेथे मिळेल, तेथे मुसलमानांना ठोकून काढण्यासाठी उत्सुक आहे; पण आशियात मात्र हिंदूंना ठोकून काढण्यासाठी ती मुसलमानांचा पक्ष उचलून धरणार आहे. अशा अमेरिकेशी भारत सरकार अणूऊर्जासंधी करणार असून त्याचे समर्थन करतांना जवाहरलाल नेहरूंचे पणतू श्री. राहुल गांधी हिंदूंना `इंडियन’ होण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या तोंडावर लोकसभेत ओमर अब्दुल्लांनी `आम्ही मुसलमानच रहाणार आहोत’, असे गर्जून सांगितले; पण मुसलमानांनी `इंडियन’ व्हायला पाहिजे, असे श्री. राहुल गांधी एकदाही म्हणत नाहीत. हिंदूंना आम्ही भूमी देणार नाही, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले, तेव्हा त्यांच्या या विधानाचा निषेध एकाही काँग्रेसजनाने केला नाही.
श्री. राहुल गांधींना भारताचे भावी पंतप्रधान म्हणून लोकांसमोर उभे करण्याचा खटाटोप काँगे्रेस करत आहे. हे भावी पंतप्रधान पणजोबांपेक्षा वेगळे नाहीत. ते इंग्लंडच्या आहारी केले होते; हे अमेरिकेच्या आहारी गेले आहेत.

देशाची सुरक्षा व सार्वभौमत्व गहाण ठेवायला लावणारा अणूऊर्जासंधी नकोच !
अणूऊर्जासंधीने वीज मिळेल, या प्रकाशात विदर्भातील दारिद्र्य पीडित मुलांना अभ्यास करून आयुष्य घडविता येईल, हे सांगायला श्री. राहुल यांची आवश्यकता नाही. अणूपासून वीजोत्पादनास कोणाचा विरोध नाही. त्यासाठी भारताची सुरक्षितता आणि सार्वभौमता गहाण टाकण्यास देशभक्‍तांचा विरोध आहे; कारण जी नवी वीज मिळेल, तिच्या प्रकाशात अभ्यास कोणता करायचा ते ठरवण्याचे स्वातंत्र्य हिंदूंना असणार नाही. त्यांना इस्लामचा अभ्यास करता येईल. ख्रिस्ती तत्त्वांचा अभ्यास करता येईल; पण हिंदु संस्कृतीचा अभ्यास प्रतिगामित्वाचा उपक्रम म्हणून त्याज्य समजण्यात येईल; म्हणून अणूकरार अत्यंत सावधपणे स्वीकारावा लागणार आहे. हिंदुहितरक्षण या एकमेव कसोटीवर प्रत्येक गोष्टीचा स्वीकार वा धिक्कार करावा लागणार आहे.

 |  मित्रांना पाठवा |  17 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार

साखळी बाँबस्फोटांनी अहमदाबाद हादरले

आणखी किती नागरिक बाँबस्फोटांत मेल्यावर राज्यकर्ते दहशतवादाबाबत आक्रमक भूमिका घेणार ?

१३ बाँबस्फोटांत १४ ठार

 

अहमदाबाद, २६ जुलै – काल बंगळुरू येथे बाँबस्फोटांची मालिका घडल्यानंतर आज अहमदाबादमध्ये साखळी बाँबस्फोट झाले. हाती आलेल्या अंतिम वृत्तानुसार एकापाठोपाठ एक असे १३ बाँबस्फोट होऊन त्यात १४ जण ठार झाले, तर ७० हून अधिक जण गंभीर जखमी झाले. (षंढ राज्यकर्त्यांच्या निष्क्रीयतेचे फलीत ! आणखी किती नागरिक बाँबस्फोटांत मेल्यावर राज्यकर्त्यांचे मन शांत होणार आहे ? लोकहो, अशा षंढ राज्यकर्त्यांना हटवा. – संपादक) या बाँबस्फोटांबाबतचे संगणकीय पत्र गुप्‍तचर संघटनेला आज सायं. ६ वा. मिळाले होते; मात्र यासंदर्भात तपास सुरू असतांनाच सायं. ६.३० वा. हे स्फोट झाले. यापैकी दोन बाँबस्फोट मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात झाले आहेत, तर एक बाँबस्फोट विहिंपतर्फे गरिबांसाठी चालवण्यात येणार्‍या धन्वंतरी रुग्णालयात झाला. (हिंदूंना लक्ष्य करणारे मुसलमान `दहशतवादी कोणत्याही धर्माचे नसतात’, असे म्हणणार्‍यांना याबाबत काय म्हणायचे आहे ? यातून देशाची सुरक्षायंत्रणा किती कमकूवत आहे, हे स्पष्ट होते. अशा सुरक्षायंत्रणेच्या हातात देश सुरक्षित काय रहाणार ?- संपादक)
काल बंगळुरू येथे ९ ठिकाणी बाँबस्फोट झाले. यानंतर संपूर्ण देशभरातील अतीसंवेदनशील शहरांत अतीदक्षतेचा इशारा देण्यात आला होता; मात्र या दक्षतेलाही न जुमानता दहशतवाद्यांनी आज सायंकाळी मणिपूर, सरदार पटेल हिराबाजार, सरनपुर ब्रीज, इसनपूर, हटकेश्‍वर सर्कल, रायपूर, बापूनगर, नरोल व अन्य ठिकाणी एका पाठोपाठ एक बाँबस्फोट केले. हे स्फोट अत्यंत गर्दीच्या ठिकाणी झाले असल्याने संपूर्ण शहर हादरले आहे. हे बाँब सायकलवर जेवणाच्या डब्यात ठेवण्यात आले होते. यापूर्वीही विविध ठिकाणी झालेल्या बाँबस्फोटांत सायकलचा वापर करण्यात आला होता. या स्फोटांत १४ ठार, तर अनेक गंभीर जखमी झाले आहेत. हे स्फोट कमी शक्‍तीशाली असल्याचे म्हटले जाते. (जनतेचा जीव घेणारे बाँबस्फोट म्हणे कमी शक्‍तीशाली ! – संपादक) या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशभरात तिहेरी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
गुप्‍तचर संघटनेला इंडियन मुजाहिद्दीन (सिमी या बंदी असलेल्या संघटनेचे धारण केलेले नवीन नाव) या संघटनेने पाठवलेल्या संगणकीय पत्रात म्हटले आहे, “अहमदाबाद व गुजरात येथे ठिकठिकाणी आम्ही बाँबस्फोट करू. तुम्हाला हे स्फोट थांबवून दाखवायचे असेल, तर थांबवून दाखवा. जातीयवाद्यांना आमचा विरोध आहे. ही आमची सुरुवात आहे.” (भारतीय सुरक्षा यंत्रणेला इस्लामी दहशतवाद्यांचे आव्हान ! सिमीवर बंदी घालूनही तिच्या कारवाया चालू आहेत, ही सरकारला बसलेली चपराकच होय. – संपादक)

दहशतवाद्यांचे षडयंत्र – तोगडिया
विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस श्री. प्रवीण तोगडिया यासंदर्भात प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, हे दहशतवाद्यांचे षडयंत्र आहे. पूर्व अहमदाबाद हा हिंदुबहुल परिसर असून त्याला लक्ष्य करण्यात आले आहे.

 |  मित्रांना पाठवा |  14 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : दहशतवादाने पोखरलेला भारत

(अंध)श्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधात वारकर्‍यांचे भर पावसात `टाळ वाजवा’ आंदोलन

मुंबई, २६ जुलै (वार्ता.) – धर्मद्रोही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नादाला लागून सरकार आणू पहात असलेल्या (अंध)श्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध करण्यासाठी व हा कायदा व्हावा, यासाठी अंनिसतर्फे करण्यात येणार्‍या `थोबाडीत मारा’ आंदोलनाला चोख उत्तर देण्यासाठी आज आझाद मैदान येथे ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज यांचे ज्ञानेश्‍वरी-हरिपाठ प्रसारक प्रतिष्ठान व वारकरी संप्रदाय यांच्यातर्फे समस्त हिंदूंनी संत-महंतांच्या उपस्थितीत `टाळ वाजवा’ प्रखर आंदोलन केले. या आंदोलनात विविध आध्यात्मिक संस्था, संघटना व धर्माभिमानी हिंदू मिळून ८० जण उपस्थित होते.

 

या वेळी समस्त वारकरी व हिंदू यांच्या वतीने मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री श्री. रा.रा. पाटील यांना प्रस्तावित कायदा रद्द करण्यासाठी संत, महंत व धर्माभिमानी हिंदू यांच्या स्वाक्षर्‍यांचे निवेदन शिष्टमंडळाने विधिमंडळात सादर केले. या शिष्टमंडळात ह.भ.प. विजय महाराज, ह.भ.प. पद्माकर महाराज, ह.भ.प. धाऊबुवा पाटील महाराज, हिंदु धर्माभिमानी श्री. शिवाजी वटकर यांचा समावेश होता.

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला सातासमुद्राच्या पलीकडे फेकून द्या – प.पू. किसन महाराज
हिंदुस्थानात हिंदूंच्या धार्मिक प्रथा, परंपरा व श्रद्धा यांच्या आड येणार्‍या (अंध)श्रद्धा निर्मूलन कायद्याला समस्त हिंदु धर्माभिमान्यांनी सातासमुद्राच्या पलीकडे फेकून द्यावे. झोपेचे सोंग घेणार्‍या शासनाला `टाळ वाजवा’ आंदोलनाने जागे करावे व डॉ. दाभोलकरांच्या श्रद्धा-अंधश्रद्धांचा पर्दाफाश करावा, असे आवाहन प.पू. किसन महाराज यांनी केले.

सध्याचे सक्षम कायदे अस्तित्वात असतांना नवा कायदा कशाला ? – ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज
भारतीय दंडविधान संहितेनुसार अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सक्षम कायदे अस्तित्वात आहेत. यानुसार महाराष्ट्रात गेल्या २५ वर्षांत अंधश्रद्धेचे १७ गुन्हे दाखल झाले असून त्यांपैकी १३ गुन्ह्यांवर कारवाई झाली आहे व ४ गुन्ह्यांवर सुरू आहे. अंनिस अंधश्रद्धेचा मोठा बाऊ करत असून महाराष्ट्रात खूप भयावह स्थिती असल्याचे चित्र लोकांसमोर निर्माण करत आहे; म्हणूनच अंनिसचा हा नवा कायदा कशाला, असे विचार ज्ञानेश्‍वरी-हरिपाठ प्रसारक प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज यांनी या वेळी `झी चोवीस तास’ व `सी टी.व्ही.’ या वृत्तवाहिन्यांशी बोलतांना मांडले.
अंनिसच्या या कायद्यानुसार आम्ही धार्मिक विधी करू शकणार नाही. जोपर्यंत हा कायदा होण्यासाठी अंनिसचा आग्रह असेल, तोपर्यंत हा कायदा न होण्याचा वारकरी संप्रदायाचा आग्रह असेल. हिंदु धर्म टिकवण्यासाठी अंनिसचा कायदा रद्द होणे आवश्यक आहे. हा कायदा हिंदु धर्मावरील मोठे धर्मसंकट आहे. या कायद्याच्या विरोधात आपण एकत्र यायला पाहिजे, अशा उद्बोधक विचारांद्वारे अनेक मान्यवरांनी त्यांची या कायद्याच्या संदर्भातील मते या वेळी मांडली.

क्षणचित्रे
* या आंदोलनात मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा व सोलापूर येथील वारकरी व धर्माभिमानी हिंदु सहभागी झाले होते.
* आंदोलनाच्या ठिकाणी असणार्‍या एका पोलिसाने टाळ वाजवून आंदोलनाला साथ दिली.
* `पुंडलिक वरदे हरि विठ्ठल । श्री ज्ञानदेव तुकाराम । पंढरीनाथ महाराज की जय’ व `बजरंगबली की जय’ हे जयघोष करण्यात आले.
* या वेळी वारकरी भजने व `जय जय रामकृष्ण हरि’ असा हरिनामाचा गजर करत होते.
* आंदोलन सुरू असतांना शेकापच्या तेथील आंदोलनकर्त्यांनी मोठ्या आवाजात पोवाडा म्हटला.
* `अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणू पहाणार्‍या शासनाचा निषेध असो’, `अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या’चा निषेध करण्यासाठी संघटीत व्हा’, `निषेध असो निषेध असो महाराष्ट्र शासनाचा निषेध असो’, अशा घोषणा या वेळी आंदोलकांनी दिल्या.
* काल अंनिसच्या आंदोलनाच्या वेळी डॉ. दाभोलकरांना स्वत:हून भेट देणार्‍या उपमुख्यमंत्र्यांनी आज वारकर्‍यांच्या शिष्टमंडळाला ४ तास ताटकळत ठेवले. (वारकर्‍यांनो, ही आहे उपमुख्यमंत्र्यांच्या लेखी तुमची किंमत ! – संपादक)


“शिवसेनेने या हिंदुविरोधी कायद्याला तीव्र विरोध केला आहे व यापुढेही विरोध रहाणार. हा कायदा न होण्यासाठी शिवसेना सर्व संप्रदायांच्या पाठिशी उभी राहील. कुठल्याही परिस्थितीत हा कायदा होऊ देणार नाही”, असे आश्‍वासन विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री. रामदास कदम यांनी या वेळी दिले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. पांडुरंग फुंडकर यांनाही या निवेदनाची प्रत देण्यात आली.


“कायदा होऊ नये, याबाबत तुमची बाजू सरकारला माहीत आहे. कायद्याचे समर्थन करणारे व विरोधक या दोघांची बाजू ऐकण्यासाठीचे हे प्रकरण संयुक्‍त चिकित्सा समितीकडे देण्यात आले आहे. कायदा करतांना कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल”, असे उपमुख्यमंत्री श्री. रा.रा. पाटील वारकर्‍याचे निवेदन स्वीकारतांना म्हणाले.

 |  मित्रांना पाठवा |  18 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : धर्मद्रोही अंधश्रध्दा निर्मूलन कायदा