हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे अंनिसला आश्‍वासन

हिंदूंनो, सावधान ! तुमच्या धर्माचरणावर घाला घालणारा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पुन्हा डोके वर काढत आहे !

मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी (अंध)श्रद्धा निर्मूलन कायदा सरकारने त्वरित करावा, या
मागणीसाठी आज आझाद मैदान येथे आयोजित केलेल्या `थोबाडीत मारा’ आंदोलनाचा विचका झाला.

हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या प्रमाणात असलेल्या अंनिसच्या कार्यकर्त्यांना अखेर आंदोलन गुंडाळावे लागले; मात्र घाईघाईने भेट देणारे उपमुख्यमंत्री श्री. रा.रा. पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मंजुरीसाठी मांडण्यात येईल, असे आपल्याला आश्‍वासन दिल्याचे डॉ. दाभोलकर यांनी या वेळी सांगितले. (हिंदूंनो, हिंदु धर्मावर घाला घालणार्‍या या धर्मद्रोही अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध करण्यासाठी स्थानिक आमदारांना भेटा ! – संपादक)
आंदोलनाच्या वेळी अंनिसच्या शिष्टमंडळाने आज सामाजिक न्यायमंत्री श्री. चंद्रकांत हंडोरे यांची भेट घेतली. या भेटीबाबत कार्यकर्त्यांना माहिती देतांना डॉ. दाभोलकर म्हणाले, “हंडोरे यांच्याशी माझा वाद झाला. `तुम्ही संयुक्‍त चिकित्सा समितीचे कामकाज १५ महिन्यांत पूर्ण केले नाही. तुमच्यात हिंमत असेल, तर हिवाळी अधिवेशनापूर्वी कामकाज पूर्ण करण्याचे आश्‍वासन द्या’, असे मी श्री. हंडोरे यांना सांगितले; मात्र ते आपली तबकडी वाजवत बसले. या वेळी श्री. हंडोरे यांनी, `मी कायद्याच्याच बाजूने आहे; म्हणूनच कायदा इथपर्यंत आला. कायद्यासाठी सर्वांनीच मिळून काम केले पाहिजे. कायद्याबाबत जे गैरसमज आहेत, ते दूर केले पाहिजेत’, असे सांगितले. या वेळी श्री. हंडोरे यांनी चांगला प्रतिसाद दिला नाही; मात्र कायदाविरोधी लोकांची समजूत काढता येईल व हिवाळी अधिवेशनात कायदा मंजुरीसाठी आणण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दर १५ दिवसांनी श्री. हंडोरे यांचे सचिव अंनिसला कायद्याविषयी माहिती देत रहातील, असे शेवटी ठरले”, असे डॉ. दाभोलकर यांनी सांगितले.
डॉ. दाभोलकर पुढे म्हणाले, “राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. रा.रा. पाटील यांच्याशी भेट ठरलेली नसतांनाही त्यांनी आमच्याकडे भेट मागितली होती. श्री. पाटील यांच्याशी आमची फक्‍त ३ मिनिटेच भेट झाली. या वेळी श्री. पाटील म्हणाले की, कायदा अधिवेशनात व्हावा, यासाठी कामकाज बैठकीत आपण मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनीही तसे मान्य केले होते; मात्र संयुक्‍त चिकित्सा समितीचे कामकाज पूर्ण झालेले नाही. अधिवेशनानंतर आगामी ४ ऑगस्टच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या वेळी तुम्ही या आपण मुख्यमंत्र्यांकडे वेगळे बसून चर्चा करू. कायदा व्हावा, असे मलाही वाटते.”
विधानसभा अध्यक्ष श्री. बाबासाहेब कुपेकर यांनीही मुख्यमंत्र्यांशी त्यांची वेगळया विषयावर बैठक असल्याचे सांगून या बैठकीत मी कायद्याविषयी त्यांच्याशी चर्चा करीन, असे आश्‍वासन दिले असल्याचे डॉ. दाभोलकर यांनी सांगितले.


अंनिसच्या आंदोलनाचे खरे स्वरूप !


अंनिसच्या आंदोलनाच्या मंडपाशेजारीच शेकापचे नेते श्री. एन्.डी. पाटील यांचे रायगड जिल्ह्यातील `सेझ’च्या विरोधात आंदोलन सुरू होते. तेथे आलेल्या शेतकर्‍यांना अंनिसवाले त्यांच्या मंडपात बोलावत असल्याचे दिसले. अंनिसच्या मंडपात जेमतेम ४० कार्यकर्तेच उपस्थित होते.

 |  मित्रांना पाठवा |  39 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : धर्मद्रोही अंधश्रध्दा निर्मूलन कायदा

Leave a Reply