काँग्रेस आणि समविचारी पक्ष या भूमीवर राज्य करण्याचा मुसलमानांचा हक्क आहे, हे मान्य करतात. हे भीतीपोटी ते मान्य करतात; परंतु आपली भूमी दुसर्याला वापरायला द्यायची सवय लागली की कधी भीतीपोटी, तर कधी पैशांसाठी भूमीचा सौदा केला जातो. काँग्रसने भूमीचा सौदा प्रथम मुसलमानांशी केला. आता तो अमेरिकेशी केला जात आहे. हिंदी राष्ट्रवाद अस्तित्वात आहे, तोपर्यंत या देशात सौदेबाज राज्य करणार आहेत; म्हणून लोकांनी हिंदुत्वाला मत दिले पाहिजे !
अमेरिकेसमवेत करावयाच्या संदर्भात अणूऊर्जासंधीसंबंधात मनमोहन सरकारवर जो विश्वास किंवा अविश्वास दाखवायचा आहे, त्याचे संध्याकाळपर्यंत काय झाले, ते कळेलच. मला जाणवलेले या वादंगातील विशेष म्हणजे `हिंदी राष्ट्रवाद’ या देशातील लोकांना एकत्र बांधून ठेवू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हिंदु राष्ट्रवाद, हिंदी राष्ट्रवाद, इस्लामी राष्ट्रवाद आणि कम्युनिस्टांचा भाषिक राष्ट्रवाद अशा चार प्रमुख विचारधारा आपल्याकडे अस्तित्वात आहेत. अणूऊर्जासंधी अमेरिकेशी होणे पसंत न पडून कम्युनिस्टांनी पाठिंबा काढून घेतला. मुसलमानांच्या संघटनांनी सावध भूमिका घेतली. सैद्धांतिक भूमिका न घेता थोड्या दूरवरचा स्थानिक स्वार्थ पाहून काहींनी काँग्रेसला, तर काहींनी कम्युनिस्टांना पाठिंबा दिला; परंतु मुसलमान अमेरिकेस शत्रू मानीत असल्याने अमेरिकेसमवेत केलेला करार त्यांना आवडणार नाही, असे गृहीत धरून मायावतींच्या बसपाने करारास विरोध केला. जे पक्ष स्वत:ला हिंदुत्वनिष्ठ म्हणवतात, त्यांची भूमिका त्यातल्यात्यात सुसंगत राहिली आहे. त्यांचा अणुपासून वीज बनवायला, अमेरिकेसमवेत युद्धरचनेच्या दृष्टीने (स्ट्रॅटेजिक) संबंध असायला आडकाठी नाही. त्यांचा आक्षेप हा आहे की, विजेच्या छोट्या लाभासाठी भारताची सुरक्षितता अमेरिकेकडे गहाण टाकली आहे. आपली परराष्ट्रनीती, अणूचाचणी इत्यादी विषयातील सार्वभौम राष्ट्र म्हणून जे अधिकार आहेत, ते आपण अमेरिकेच्या पायावर वाहिले आहेत. अण्वस्त्रसंपन्न राष्ट्र म्हणून मान्यता द्यायला अमेरिका सिद्ध नसतांना दुय्यम राष्ट्र म्हणून लाचारीने हा करार आपण केला आहे. हे का शक्य झाले; कारण सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. त्या भारताच्या नागरिक आहेत; परंतु भारतीय भावविश्वाशी परिचित नसल्याने भारतीय हित आणि अमेरिकेचे हित यांत अंतर आहे, हे त्यांच्या लक्षात आले नसावे. कम्युनिस्टांनी हिरावलेले बहुमत पुन्हा सांधण्यासाठी काँग्रेसने घोडाबाजार म्हणजे खासदार विकत घेण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येते. ज्याला ध्येयवाद नसतो, तो विकला जाऊ शकतो. गेल्या काही दिवसांत जे खासदार गेले ते हिंदी राष्ट्रवादी म्हणजे बेगडी सेक्युलर आहेत. काँग्रेसने मुसलमानांसाठी हिंदुत्वाचा त्याग करून हिंदी राष्ट्रवाद निर्माण केला; परंतु मुसलमानांनी हिंदी राष्ट्रवादाचाही धिक्कार करून भारताचे इस्लामीकरण करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे हिंदी राष्ट्रवाद पोरका झाला असून त्याच्या अनुयायांना सत्तेवाचून अस्तित्वासाठी दुसरी प्रेरणा उरलेली नाही. हिंदुत्वनिष्ठ सत्तेवाचून कितीही काळ जगू शकतात; कारण हिंदुत्वाचे विशाल आणि उदात्त तत्त्वज्ञान त्यांना जगण्याचे बळ देते. हिंदुत्वनिष्ठा स्वत:ला विकावू समजत नाहीत; कारण ते जननीरूपात देशाला पाहतात. काँग्रेस आणि समविचारी पक्ष या भूमीवर राज्य करण्याचा मुसलमानांचा हक्क आहे, हे मान्य करतात. हे भीतीपोटी ते मान्य करतात; परंतु आपली भूमी दुसर्याला वापरायला द्यायची सवय लागली की कधी भीतीपोटी, तर कधी पैशासाठी भूमीचा सौदा केला जातो. काँग्रसने भूमीचा सौदा प्रथम मुसलमानांशी केला. आता तो अमेरिकेशी केला जात आहे. हिंदी राष्ट्रवाद अस्तित्वात आहे, तोपर्यंत या देशात सौदेबाज राज्य करणार आहेत; म्हणून लोकांनी हिंदुत्वाला मत दिले पाहिजे !
- सुघोष
| मित्रांना पाठवा | 35 – वाचक संख्या | छापील प्रत
निगडीत वृत्त : शरसंधान
|



