चिपळूणमधील तीन पत्रकारांचा उद्रेक !

स्वत:वर अन्याय झाल्यावर पेटून उठणारे पत्रकार जनतेच्या समस्यांविरुद्ध पेटून उठतील तो सुदिन !

चिपळूणमधील तीन पत्रकारांना हातभट्टीवाल्यांनी मारहाण केल्यानंतर पत्रकारांनी संघटित होऊन शहरातील १५ हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्याची घटना दुर्मिळ व सामाजिक बदलाचे सुचिन्ह म्हणावी लागेल.

 

वास्तविक अवैध दारूधंदे उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी उत्पादन शुल्क व पोलीस खात्यांची असते; मात्र चिपळूणात हातभट्ट्यांचे पेव फुटले, तरीही ही दोन्ही खाती `खात’ राहिल्यामुळे व हातभट्टीवाल्यांनी पत्रकारांना मारहाण केल्यामुळे पत्रकार कोपले व त्यांनी कायद्याचे शस्त्र उचलले. पत्रकारांनी मनावर घेतले, तर त्यांची भूमिका किती मोलाची ठरू शकते, याचा प्रत्यय चिपळूणमध्ये एकापाठोपाठ घडणार्‍या या घटनांतून येत आहे.

पत्रकारांनी मानसिक मर्यादांचे उल्लंघन करावे !
हल्लीच्या पत्रकारांनी वृत्तपत्रांत बातम्या देणे, इथपर्यंतच स्वत:च्या कार्यकर्तृत्वाला कुंपण घातलेले आहे. वास्तविक मराठी पत्रकारितेसमोर लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांसारख्या पत्रकारितेतील दिग्गजांनी समाजप्रबोधनाचा एक मोठा आदर्श निर्माण केला. पत्रकार वृत्तपत्र चालवण्याच्या पलीकडे जाऊनही मोठी सामाजिक क्रांती करू शकतो, हे या प्रभृतींनी देशाला दाखवून दिले. चिपळूण येथील पत्रकारांनी सहकार्‍यांना मारहाण करणार्‍यांच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्याचे धारिष्ट्य दाखवून पत्रकारांमधील वैचारिक क्रांतीचा एक नवा पैलू दाखवला आहे. अर्थात त्यांनी हीच कृती सहकार्‍यांना मारहाण केली म्हणून नव्हे, तर निखळ सामाजिक जाणिवेतून केली असती, तर त्याचे मोल आणखी वाढले असते. तरीही त्यांच्या कृतीतून इतरत्रच्या पत्रकारांनी बोध घ्यायलाच हवा; कारण अशा किंबहुना याहीपेक्षा गंभीर अशा अनेक बेकायदेशीर घटना गावोगावी, गल्लीबोळांत घडत असल्याचे अनेक पत्रकार अनुभवत आहेत; मात्र `बातमी देण्याच्या पलीकडे आम्ही काय करणार’, या मानसिक बंधनात त्यांनी स्वत:ला गुरफटून घेतले आहे. देशासमोरील संकटांकडे अशाच हतबल नजरेतून पहाणार्‍या साहित्यिकांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी `लेखण्या मोडा व बंदुका हाती घ्या’, असे आवाहन साहित्यिकांच्याच व्यासपिठावरून केले होते. तेव्हापेक्षा आजची सामाजिक व राजकीय परिस्थिती अधिक भयंकर आहे. राज्यकर्ते देश विकायला निघाले आहेत, दहशतवादी व नक्षलवादी यांनी देश पोखरला आहे, महागाई व भ्रष्टाचार यांच्यापुढे जनता हतप्रभ झाली आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांनी केवळ बातम्या लिहिण्याच्या भूमिकेत रमणे, हा अप्पलपोटेपणा आहे. म्हणूनच सर्व मानसिक बंधने तोडून समाज बदलण्यासाठी पत्रकारांनी स्वत:ला नव्या भूमिकेत समाजासमोर आणले पाहिजे. गुन्हेगारी कृत्यांची झळ स्वत:ला बसल्यावर काय ते पाहून घेऊ, या भूमिकेत न रहाता, पत्रकारांनी दररोज दिसणारे अनेक गैरप्रकार उखडून टाकण्यासाठी पत्रकारितेतील भूमिकेचा वापर करावा ! याची अल्पशी सुरुवात चिपळूणमधील पत्रकारांनी केली, हे अनेक अर्थांनी बरे झाले.

पत्रकारांनी राज्यकर्त्यांनाच जाब विचारावा !
पत्रकारांना हातभट्टीवाल्यांनी मारहाण केल्यावर पत्रकार प्रशासनाच्या हात धुवून मागे लागले व चिपळूणमध्ये गावठी दारू करण्यासाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात जप्‍त केला. तब्बल २५ ट्रक लाकूड वनखात्याने जप्‍त केले व रॉकेलचा मोठा साठाही शोधून काढला. हातभट्टीवाले व पोलीस यांचे सख्ख्य असूनही १६ हातभट्टीवाल्यांना अटक करणे पोलिसांना भाग पडले. चिपळूणमधील प्रकरणात गुन्हेगारांवर कारवाई करण्यात प्रशासन आज जी तत्परता दाखवत आहे, ती केवळ अब्रू वाचवण्यासाठी केला जाणारा खटाटोप आहे. कारवाईचा देखावा निर्माण करून पत्रकारांची सहानुभूती मिळवायची व प्रकरण दडपून टाकण्याची नामी शक्कल प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यांना अवगत आहे. मात्र पत्रकारांनी उद्ध्वस्त केलेल्या १५ हातभट्ट्या पोलीस व अबकारी खात्यांना का दिसल्या नाहीत, याचा जाब पत्रकारांनी राज्यकर्त्यांनाच विचारायला हवा !

 

दैनिक सनातन प्रभात

येशूचे विडंबनात्मक चित्र छापल्याच्या निषेधार्थ ख्रिस्त्यांचा `तेलगू डेली’ या वर्तमानपत्राच्या कार्यालयांवर हल्ला

हिंदूंनो, ख्रिस्त्यांकडून धर्माभिमान शिका !

हैद्राबाद, २० जुलै (वृत्तंसस्था) – येथील मुख्यमंत्री वाय्. सॅम्युअल राजशेखर रेड्डी यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या `तेलगू डेली’ या वर्तमानपत्रामध्ये रविवारच्या पुरवणीत येशू िख्र्तासचे विडंबनात्मक चित्र छापले होते. याचा निषेध करण्यासाठी या वर्तमानपत्राच्या राज्यातील वेगवेगळया शहरांत असलेल्या कार्यालयांवर ख्रिस्ती गटांनी हल्ले केले. या चित्रात येशूच्या एका हातात बिअरचा मग व दुसर्‍या हातात सिगारेट आहे, असे दाखवले आहे.

असे चित्र छापल्याबद्दल या वर्तमानपत्राचे मालक व मुख्यमंत्र्याचे पुत्र वाय्. सॅम्युअल जगमोहन रेड्डी व मुख्यमंत्र्यांच्या पत्‍नी सौ. विजयालक्ष्मी यांनी ख्रिस्ती समाजातील लोकांची माफी मागितली. या वर्तमानपत्रात असे चित्र छापून आल्यानंतर येथील प्रकासम, श्रीकाकुलम, विजयवाड, निजामाबाद आणि इतर शहरात असलेल्या या वर्तमानपत्राच्या कार्यालयांवर ख्रिस्ती गटांनी हल्ले केले. या वर्तमानपत्राविरुद्ध घोषणा देत ते कार्यालयांत घुसले व त्यांनी कार्यालयांतील सामानाची नासधूस केली. हैद्राबाद येथील या वर्तमानपत्राच्या कार्यालयासमोर निदर्शने करणार्‍या एका ख्रिस्ती गटाला पोलिसांनी अटक केली. या वर्तमानपत्राच्या व्यवस्थापकीय कार्यालयाने `इंटरनेटवरून चित्र घेतांना उपसंपादकाने चूक केली’, असे स्पष्टीकरण दिले आहे. येथील `कॅथॉलिक डायोसिस’ या संस्थेने त्या संस्थेतर्फे प्रकाशित होणार्‍या पुस्तिकेत हे चित्र छापून ख्रिस्ती समाजातर्फे या घटनेचा निषेध केला आहे.

 |  मित्रांना पाठवा |  44 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : हिंदूंनो, यांच्याकडून शिका!

विद्यार्थ्यांनी बृहन्मुंबईतील १५ अनधिकृत शाळांत प्रवेश घेऊ नये

अनधिकृत शाळांवर कारवाई न करता पालकांनाच दक्षतेच्या सूचना करणारे राज्यशासन !

मुंबई, २० जुलै (वार्ता.) – बृहन्मुंबई पश्चिम विभागाच्या शिक्षण निरीक्षकांच्या कार्यक्षेत्रात १३ शैक्षणिक संस्थांनी शासनाची परवानगी न घेता अनधिकृत माध्यमिक शाळा सुरू केल्या आहेत. या अनधिकृत शाळांत पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी प्रवेश घेतल्यास संबंधित विद्यार्थ्यांच्या होणार्‍या शैक्षणिक नुकसानास ते स्वत: जबाबदार असतील, असा इशारा राज्यशासनाने वृत्तविशेषाच्या माध्यमातून दिला आहे.

(शाळा अनधिकृत असूनही राज्यशासन त्यांच्यावर कारवाई का करत नाही ? – संपादक)

अनधिकृत माध्यमिक शाळांची यादी
मालवणी, मालाड येथील रोझमेरी हायस्कूल, इन्फंट जीसस हायस्कूल, होली फॅमिली हायस्कूल, सेंट मॅथ्युज हायस्कूल; दहिसर येथील विश्‍वकर्मा इंग्रजी हायस्कूल, शक्‍ती सेवा मिश्रा हायस्कूल; अंधेरी येथील सेंट रॉक्स हायस्कूल; कांदिवली येथील दुर्गामाता एज्यु. ट्रस्ट संचालित शाळा, एम्.बी. झा. हायस्कूल, अनुपम विद्यालय, शिव शक्‍ती विद्यालय; गोरेगाव येथील हर्ष पब्लिक हायस्कूल; बोरीवली (प.) येथील सरस्वती विद्यामंदिर

 |  मित्रांना पाठवा |  28 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : शिक्षणक्षेत्राचा भोंगळ कारभार

२६ हजार क्षमतेच्या तुरुंगांत ४० हजार कैदी – गृहमंत्री

तासगाव, २० जुलै (वार्ता.) – सध्या राज्यातील २६ हजार क्षमतेच्या तुरुंगांमध्ये ४० हजार कैदी आहेत. गेल्या वर्षभरात राज्यातील व राज्याबाहेरील गुन्हेगारांकडून २१ कोटी रुपयांची लूट झाली आहे, तर विविध घोटाळे, `सायबर क्राईम’ यांसारख्या मार्गांनी प्रतिष्ठित सुशिक्षित नागरिकांकडून २२ कोटी रुपयांची लूट झाली आहे, अशी माहिती आज गृहमंत्री श्री. रा.रा. पाटील यांनी दिली.

(ही परिस्थिती बदलण्यासाठी वैचारिक क्रांतीच हवी ! – संपादक) येथील पोलीस प्रशिक्षण विद्यालयाच्या कोनशीला अनावरण समारंभात ते बोलत होते. या विद्यालयाला `एकलव्य विद्यालय’ असे नाव देण्यात आले असून त्यासाठी ५० कोटी रुपये खर्च होणार आहेत. श्री. पाटील पुढे म्हणाले की, `सायबर क्राईम’सारखे आणि प्रतिष्ठितांकडून होणारे गुन्हे रोखण्याचे आव्हान पेलण्यासाठी पोलिसांनी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. पोलिसांवर १४ तासांच्या कामामुळे येणारा ताण व त्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी समित्या नेमण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या ५५ हजार जागा वाढवण्याबाबत सुचवण्यात आले आहे. पावसाळयानंतर १४ हजार ७५० जागा भरण्यात येणार आहेत. सावकारीशी व सहकाराशी संबंधित कायदा संमत झाल्यावर त्या क्षेत्रातील गुन्हेगारांसाठी नवीन तुरुंग उभारावे लागणार आहेत.

पोलिसांकडे ढकलगाड्या आणि जुन्या बंदुका – डॉ. कदम
या वेळी सहकारमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले की, पोलिसांची गुन्हेगारांना भिती व जनतेला मैत्री वाटायला हवी; मात्र काही ठिकाणी गुन्हेगार व पोलीस एकत्र असल्याने जनतेत संभ्रमावस्था निर्माण होते. पोलिसांच्या गाड्या ढकलगाड्या असून त्यांच्याकडे असणार्‍या जुन्या बंदुका बदलून त्यांना अद्ययावत साधने द्यायला हवीत. या वेळी अर्थमंत्री श्री. जयंत पाटील, गृहराज्यमंत्री श्री. सिद्धराम म्हेत्रे, पोलीस महासंचालक श्री. अनामी रॉय आदी मान्यवर उपस्थित होते.

 |  मित्रांना पाठवा |  36 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : देशाचे वाटोळे करणार्‍या सर्वच राजकीय पक्षांना नष्ट करा !