सांगली, १८ जुलै – हिंदूंचे सण आले की, पर्यावरण रक्षणाचे तुणतुणे वाजवणार्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जोडीने यंदा केंद्र सरकार पुरस्कृत `हरितसेना’ कार्यरत होणार आहे. या दोन संघटना नागपंचमीच्या वेळी `सर्प पर्यावरण सप्ताह’ साजरा करणार आहेत.
(अंनिसचे पर्यावरण रक्षण म्हणजे हिंदूंच्या धर्माचरणावर अश्लाघ्य टीका करणे व होता होईल तितके हिंदूंना धर्माचरणापासून दूर नेणे होय. त्यात आता लाखो विद्यार्थी सहभागी असलेल्या केंद्र सरकार पुरस्कृत संघटनेची साथ मिळाली, तर अंनिस हिंदूंच्या धार्मिक आचारांचे पार उच्चाटन करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करील, यात शंका नाही. तेव्हा हिंदूंनो, सावधान ! – संपादक) पर्यावरणाचा र्हास होत असतांना शाळा आणि विद्यार्थी या अत्यंत महत्त्वाच्या घटकांकडून त्याचे संगोपन व्हावे, यासाठी केंद्र सरकारने सामाजिक वनीकरण विभागाच्या साहाय्याने प्रत्येक शाळेमध्ये हरितसेनेची स्थापना केली आहे. (असले उपक्रम राबवून `आम्ही पर्यावरणासाठी काहीतरी करतो’, असे दाखवणारे केंद्र सरकार ! सर्व सत्ता हाताशी असलेल्या सरकारला पर्यावरणाची एवढी काळजी आहे, तर प्रदूषण निर्माण करणार्या कारखान्यांच्या विरोधात ठोस कारवाई का करत नाही ? शाळा व विद्यार्थी हा तुलनेने अत्यंत दुर्बल आणि कोणतेही अधिकार नसलेला घटक या संदर्भात काय करणार आहे ? – संपादक) राज्यात हरितसेनेचे ८ हजार गट असून
४ लाख विद्यार्थी तीत सहभागी झालेले आहेत. अंनिसही हेच काम करत असल्याने अंनिस व हरितसेना यांनी एकत्र येऊन मोहीम चालवण्याचे ठरवले आहे. येत्या नागपंचमीच्या सणाच्या वेळी सदर `सर्प पर्यावरण सप्ताह’ साजरा करण्याचा आम्ही निश्चय केला आहे, असे सामाजिक वनीकरण विभागाचे संचालक श्री. प्रकाश ठोसर यांनी सांगितले.
| मित्रांना पाठवा | 31 – वाचक संख्या | छापील प्रत
निगडीत वृत्त : हिंदूंनो सावधान!


