पाकिस्तानमधील तालिबानच्या मदरशांत ८० अमेरिकी विद्यार्थी

वॉशिंग्टन, १९ जुलै – पाकिस्तानच्या कबाइली या भागात तालिबान चालवत असलेल्या मदरशांत ८० अमेरिकी विद्यार्थी प्रशिक्षण घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अमेरिकी संसदेतील प्रतिनिधी चिंतेत आहेत. या संदर्भात नुकत्याच झालेल्या संसदेतील प्रतिनिधींच्या बैठकीत देशाच्या सुरक्षेसाठी ही अत्यंत धोकादायक बाब असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानच्या मदरशांत शिक्षण घेणार्‍या या विद्यार्थ्यांकडे अधिकृत पारपत्र आहे. प्रशिक्षण झाल्यावर पुन्हा देशात परतण्याची या विद्यार्थ्यांची योजना आहे. `या विद्यार्थ्यांचे मदरशांतील प्रशिक्षण अमेरिका व युरोप यांच्या सुरक्षेला थेट प्रभावित करणारे आहे’, असे अमेरिकी संसदेतील प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

दैनिक सनातन प्रभात

अमरनाथ यात्रेच्या कालावधीत कपात करण्याची काँग्रेसच्या सैफुद्दीन सोझ यांची मागणी

हिंदूंनो, तुमच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करणार्‍या राज्यकर्त्यांना वेळीच रोखा !

हिंदूंच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसणारे मुसलमान नेते !

जम्मू, १९ जुलै (प्रे.ट्र.) – अमरनाथ यात्रेचा कालावधी दोन महिन्यांऐवजी १ महिन्याचा करावा, तसेच यात्रेकरूंची संख्याही ७५ हजारापर्यंत असावी, अशी मागणी केंद्रीय जलस्रोत राज्यमंत्री सैफुद्दीन सोझ यांनी केली.

(हज यात्रेचा कालावधी व भारतातून तेथे जाणार्‍या मुसलमान यात्रेकरूंची संख्या कमी करण्याची मागणी सोझ यांनी केली असती का ? हिंदूंच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करणार्‍या मुसलमान नेत्यांना आता हिंदूंनीच संघटित होऊन जाब विचारावा. – संपादक) अमरनाथ यात्रेबाबत काँग्रेस सरकारने नितिश सेनगुप्‍ता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने काही शिफारसी मांडल्या होत्या. या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी काँग्रेस सरकार विचाराधीन आहे त्या शिफारसींच्या आधारावर हे वक्‍तव्य केल्याचे सोझ यांनी म्हटले आहे. (सरकारमध्ये हिंमत असेल, तर त्याने हाज यात्रेला जाणार्‍या यात्रेकरूंच्या संख्येत कपात करून दाखवावी. हिंदूंनो, हिंदु धर्माच्या मुळावर उठलेल्या सरकारला निवडणुकीच्या वेळी लक्षात ठेवा. – संपादक) सोझ यांच्या वक्‍तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. अशोक खजुरिया यांनी सोझ यांच्यावर टीका केली आहे. “सोझ यांनी असे वक्‍तव्य करून हिंदु धर्मातील अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्‍न चालवला आहे”, असे खजुरिया म्हणाले. सेनगुप्‍ता आयोगाच्या शिफारसींबाबत बोलतांना श्री. खजुरिया म्हणाले,“या आयोगाने १९९७ साली त्याच्या शिफारसी मांडल्या होत्या; मात्र त्यानंतर सरकार अथवा श्री अमरनाथ देवस्थान मंडळ या दोघांनीही या शिफारशींची अंमलबजावणी केली नाही. सोझ यांनी असे वक्‍तव्य करून हिंदु धर्मावर हल्ला केला आहे. त्यांच्या या वक्‍तव्यावरून त्यांना काश्मीरमधील मूलतत्त्ववादी व विघटनवादी यांचा पुळका आला आहे, असे दिसून येते”, असे ते म्हणाले. “हिंदूंच्या अंतर्गत बाबींमध्ये सोझ व काश्मीरमधील काँग्रेसच्या इतर नेत्यांनी नाक खुपसू नये”, असा इशाराही श्री. खजुरिया यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे.

 |  मित्रांना पाठवा |  35 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!

गडचिरोली जिल्ह्यातील विवाह सोहळयात सोन्याऐवजी पितळेची मंगळसूत्रे देण्यात आल्याची आदिवासी विकास मंत्र्यांची कबुली !

भ्रष्टाचारग्रस्त महाराष्ट्र !

मुंबई, १८ जुलै (वार्ता.) – आदिवासी विकास विभागातर्फे ३० मार्च २००८ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात कन्यादान योजनेच्या माध्यमातून पात्र जोडप्यांचे सामूहिक विवाह पार पडले. या विवाह सोहळयात वधूंना सोन्याच्या मंगळसूत्रांऐवजी पितळेची व त्यांवर सोन्याचा मुलामा दिलेली मंगळसूत्रे देण्यात आली, तसेच त्यांना देण्यात आलेली संसारोपयोगी भांडी निकृष्ट दर्जाची असल्याचेही निदर्शनास आले आहे, अशी स्पष्ट कबुली आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज विधान परिषदेत दिली.

(जनतेच्या पैशांतून कोट्यवधी रुपयांच्या योजना चालवायच्या आणि त्यांत भ्रष्टाचार करून स्वत:च्या तुंबड्या भरायच्या, असा भ्रष्ट कारभार करणारे प्रशासन ! – संपादक) या प्रकरणी संबंधित प्रकल्प अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेचे सदस्य श्री. अरविंद सावंत, श्री. परशुराम उपरकर व डॉ. नीलम गोर्‍हे यांनी या प्रकरणी तारांकित प्रश्‍न उपस्थित करून या भ्रष्टाचाराबाबत शासनाला धारेवर धरले.

 |  मित्रांना पाठवा |  13 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : भ्रष्टाचाराचा भस्मासूर

धर्मद्रोही उपक्रम राबवणार्‍या अंनिसच्या जोडीला आता केंद्र सरकार पुरस्कृत `हरितसेना’ येणार !

सांगली, १८ जुलै – हिंदूंचे सण आले की, पर्यावरण रक्षणाचे तुणतुणे वाजवणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जोडीने यंदा केंद्र सरकार पुरस्कृत `हरितसेना’ कार्यरत होणार आहे. या दोन संघटना नागपंचमीच्या वेळी `सर्प पर्यावरण सप्‍ताह’ साजरा करणार आहेत.

(अंनिसचे पर्यावरण रक्षण म्हणजे हिंदूंच्या धर्माचरणावर अश्लाघ्य टीका करणे व होता होईल तितके हिंदूंना धर्माचरणापासून दूर नेणे होय. त्यात आता लाखो विद्यार्थी सहभागी असलेल्या केंद्र सरकार पुरस्कृत संघटनेची साथ मिळाली, तर अंनिस हिंदूंच्या धार्मिक आचारांचे पार उच्चाटन करण्यासाठी पूर्ण प्रयत्‍न करील, यात शंका नाही. तेव्हा हिंदूंनो, सावधान ! – संपादक) पर्यावरणाचा र्‍हास होत असतांना शाळा आणि विद्यार्थी या अत्यंत महत्त्वाच्या घटकांकडून त्याचे संगोपन व्हावे, यासाठी केंद्र सरकारने सामाजिक वनीकरण विभागाच्या साहाय्याने प्रत्येक शाळेमध्ये हरितसेनेची स्थापना केली आहे. (असले उपक्रम राबवून `आम्ही पर्यावरणासाठी काहीतरी करतो’, असे दाखवणारे केंद्र सरकार ! सर्व सत्ता हाताशी असलेल्या सरकारला पर्यावरणाची एवढी काळजी आहे, तर प्रदूषण निर्माण करणार्‍या कारखान्यांच्या विरोधात ठोस कारवाई का करत नाही ? शाळा व विद्यार्थी हा तुलनेने अत्यंत दुर्बल आणि कोणतेही अधिकार नसलेला घटक या संदर्भात काय करणार आहे ? – संपादक) राज्यात हरितसेनेचे ८ हजार गट असून
४ लाख विद्यार्थी तीत सहभागी झालेले आहेत. अंनिसही हेच काम करत असल्याने अंनिस व हरितसेना यांनी एकत्र येऊन मोहीम चालवण्याचे ठरवले आहे. येत्या नागपंचमीच्या सणाच्या वेळी सदर `सर्प पर्यावरण सप्‍ताह’ साजरा करण्याचा आम्ही निश्चय केला आहे, असे सामाजिक वनीकरण विभागाचे संचालक श्री. प्रकाश ठोसर यांनी सांगितले.

 |  मित्रांना पाठवा |  31 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : हिंदूंनो सावधान!