गुजरातमध्ये धर्मांतरविरोधी कायदा लागू

हिंदूंना अभिमानास्पद वाटेल अशी गुजरात सरकारची कृती !

गांधीनगर, १६ जुलै (प्रे.ट्र.) – जबरदस्ती, प्रलोभन किंवा फसवणूक यांद्वारे धर्मांतर घडवून आणणार्‍यांच्या विरोधात कडक कारवाईची तरतूद असलेला गुजरात धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात आजपासून लागू करण्यात आला. गुजरात धर्मस्वातंत्र्य कायद्याविषयीचे विधेयक २००५ मध्ये विधानसभेत संमत करण्यात आले होते.

काही पंथांनी सदर विधेयकाला विरोध केल्याने राज्यपाल नवलकिशोर शर्मा यांनी त्यावर स्वाक्षर्‍या करण्यास नकार दिला होता. राज्यपालांनी सूचवलेल्या दुरस्त्यासह राज्य सरकारने हे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा संमत करून घेतले व राज्यपालांकडे पाठवले. राज्यपालांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपताच त्यावर स्वाक्षरी केली, असे राजभवनाच्या सूत्रांनी सांगितले. या कायद्यानुसार एखाद्या व्यक्‍तीला धर्मांतर करण्याची इच्छा असल्यास तिला जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज करावा लागेल. जिल्हाधिकार्‍यांनी एका महिन्याच्या आत संमती दिल्यास त्या व्यक्‍तीची धर्मांतराची वाट मोकळी होईल. त्यानंतर त्या व्यक्‍तीला १० दिवसांच्या आत बदलेल्या धर्माची माहिती जिल्हाधिकार्‍यांना द्यावी लागेल.

दैनिक सनातन प्रभात

Leave a Reply