कत्तलखान्यात गायी घुसवाव्यात तसे मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत कोंबणे तात्काळ थांबवा !
दाऊद इब्राहीम आणि मेमन बंधू महाराष्ट्राची पोलीसयंत्रणा चालवण्याची समांतर व्यवस्था करतात, ते गृहमंत्री आबा पाटलांना चालते; पण त्यांना संभाजीराव भिडे हिंदुत्वासाठी आंदोलन करतात, ते सहन होत नाही. आपणच खरे पुरोगामी असा भ्रम श्रीराम लागूंपासून दाभोलकरांपर्यंत अनेक समाजवाद्यांना झाला आहे. त्यांचा समांतर संस्कृती स्थापण्याचा प्रयत्न आहे; परंतु या देशात समांतर यंत्रणा मुसलमानांनी आणि नेहरूंनी केली तशी कोणाला जमली नाही.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्यासाठी आंदोलन करण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. त्यावर “तशी अनिवार्यता राज्य सरकारने पूर्वीच निर्माण केली असून कोणीही आंदोलन करण्याची आवश्यकता नाही”, असे मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांनी स्पष्ट केले. “मराठीचे काय करायचे, ते ठरवायला राज्य सरकार समर्थ असतांना राज सरकार नावाची समांतर यंत्रणा आम्ही चालवून घेणार नाही”, अशी कोटी करत त्यांनी दम दिला. मुख्यमंत्र्यांनी अगदी कळीचा मुद्दा उपस्थित केला आहे. समांतर सरकार, समांतर यंत्रणा निर्माण झाल्या की, मूळ संस्थांना काम करणे कठीण जाते. महाराष्ट्राचा गाडा चालवतांना नारायण राण्यांच्या समांतर सरकारने विलासरावांना त्रास होतोच आहे. त्यामुळे समांतर सरकारविरोधात मुख्यमंत्र्यांनी कडवटपणे बोलणे साहजिकच आहे. तथापी राज ठाकरे लहान शक्ती आहे. मोठ्या शक्ती समांतर सरकारे चालवायला स्वत:हून मोकळीक घेत आहेत, हे देशमुखांना माहीत असणारच. मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळातील अनेकांना समांतर सरकारे चालवण्यास सोनिया गांधींनी मोकळीक दिली आहे. `भारतियांचे ख्रिस्तीकरण आणि पाश्चात्त्यीकरण करण्याच्या छुप्या प्रयत्नांकडे डोळेझाक करणार असाल, तर समांतर सरकार चालवून जनतेची लूट चालवलीत, तरी मी बोलणार नाही’, असे सोनियाजींनी सूचित केले आहे आणि अनेक मंत्री या सोनिया गांधींच्या मनमोहन समांतर योजनेचा लाभ घेत आहेत. केंद्र सरकारातील अनेक मंत्र्यांच्या मुलांनी उद्योगधंदे काढले असून त्यांच्या दु्रत प्रगतीसाठी मंत्रालयातील यंत्रणा राबवली जात आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या होत असतांना कृषीमंत्री क्रिकेटच्या पटांगणावर रमतात, हा समांतर सरकारचाच प्रकार आहे. दाऊद इब्राहीम आणि मेमन बंधू महाराष्ट्राची पोलीसयंत्रणा चालवण्याची समांतर व्यवस्था करतात, ते गृहमंत्री आबा पाटलांना चालते; पण त्यांना संभाजीराव भिडे हिंदुत्वासाठी आंदोलन करतात, ते सहन होत नाही. `आपणच खरे पुरोगामी’, असा भ्रम श्रीराम लागूंपासून दाभोलकरांपर्यंत अनेक समाजवाद्यांना झाला आहे. त्यांचा समांतर संस्कृती स्थापण्याचा प्रयत्न आहे; परंतु या देशात समांतर यंत्रणा मुसलमानांनी आणि नेहरूंनी केली, तशी कोणाला जमली नाही. मुसलमानांची समांतर न्याययंत्रणा आणि शिक्षणप्रणाली अस्तित्वात आहे. आपले भारतियीकरण होऊ नये आणि आपले मुसलमानपण कायम रहावे, म्हणून या अहमदानुयायींनी भारतात कितीतरी समांतर यंत्रणा उभ्या केल्या आहेत. भारताला समांतर असे घुसखोर बांगलादेशींचे नवे राष्ट्र निर्माण करणे, इतर ठिकाणी समांतर छोटे पाकिस्तान निर्माण करणे, अशा कितीतरी महत्त्वाकांक्षी योजना मुसलमान राबवत आहेत. पहिले पंतप्रधान नेहरू यांनी इंग्रजीला समांतर असे हिंदी भाषेचे प्रभुत्व निर्माण होऊ नये, अशी पक्की व्यवस्था केली. आज कत्तलखान्यात गायी घुसवाव्यात, तसे पालक स्वत:ची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांत कोंबत आहेत. त्याविषयी देशमुखांना राग येतो का ?
- सुघोष




