विनाशाला कवटाळणारे भारतीय राज्यकर्ते !
नवी दिल्ली, १३ जुलै (प्रे.ट्र.) – भारत-पाकिस्तान शांतता चर्चा पुन्हा सुरू होत असून १८ जुलै रोजी दोन्ही देशांचे अधिकारी इस्लामाबादमध्ये भेटणार आहेत. या भेटीत होणार्या प्रस्तावित चर्चेमध्ये काश्मीरमधील श्रीनगर ते पाकमधील मुझफ्फराबाद यांच्यामध्ये ट्रकद्वारे वाहतूक सेवा सुरू करण्याबाबत चर्चा होईल.
(देशात पाकपुरस्कृत दहशतवाद फोफावला असतांना व पाकची गुप्तचर यंत्रणा आयएस्आय भारताच्या विरोधात उत्पात माजवत असतांना वाहतूक सेवा सुरू करून त्यांच्या भारतविरोधी कारवाया अधिक सोप्या करून देणारे मतांध भारतीय राज्यकर्ते ! – संपादक)
.


