जम्मूस्थित राजकीय पक्षांची स्वतंत्र जम्मू राज्याची मागणी

जम्मू, ११ जुलै (वृत्तसंस्था) – जम्मू-काश्मीरमधील राज्यकर्ते काश्मीरला केंद्रबिंदू ठरवून राज्यकारभार करत असल्याची टीका करत जम्मूस्थित राजकीय पक्षांनी स्वतंत्र जम्मू राज्याची मागणी केली आहे. `मुसलमानांच्या दबावाला बळी पडून अमरनाथ देवस्थान मंडळाला दिलेली जमीन काढून घेण्याचा काँग्रेस सरकारने दिलेला आदेश जोपर्यंत रद्द केला जात नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्यात येईल’, असा इशारा प्रजा परिषदेचे अध्यक्ष श्री. चंदरमोहन शर्मा यांनी दिला आहे.

जम्मूतील जनतेने काश्मीरकेंद्रित राजकारणाच्या विरोधात लढा उभारला पाहिजे. या भेदभावाच्या विरोधात जम्मूमधील जनतेने गेल्या ६० वर्षांपासून लढा दिलेला आहे. जम्मूतील राजकीय नेत्यांनी काश्मीरच्या नेत्यांपुढे नेहमीच मान तुकवली आहे. त्यामुळेच जम्मूला विकासाला मुकावे लागले आहे. जम्मूतील जनतेच्या अस्तित्व टिकवायचे असल्यास जम्मूसाठी वेगळे राज्याचा दर्जा हाच त्यासाठी एकमेव पर्याय आहे, असे जम्मू टायगरचे अध्यक्ष श्री. कुलजित सिंग यांनी सांगितले. `जम्मूच्या उज्ज्वल भवितव्यासाठी वेगळया राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी आम्ही लढा देणार आहोत व त्यासाठी शक्य असल्यास ३७० वे कलम रद्द केले तरी चालेल’, असे श्री. सिंग यांनी सांगितले.

दैनिक सनातन प्रभात

Leave a Reply