मेरा भारत महान !
सांगली, ६ जुलै (संकेतस्थळ) – सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शासनाने तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणात सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
असे असले, तरी देशात तब्बल ८ लाख शिक्षकांची कमतरता असल्याची माहिती जिल्हा माहिती यंत्रणेने जाहीर केली आहे. त्यामुळे भारताच्या विकासावर मोठा परिणाम होणार आहे, असे शिक्षणतज्ञांचे मत आहे.
याबाबत २००६ सालच्या आकडेवारीनुसार पहिली ते आठवी या इयत्तांत शिकणार्या विद्यार्थ्यांची संख्या २४ कोटी होती. ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हे आदर्श प्रमाण मानले जाते. त्यानुसार देशात ६० लाख शिक्षक हवेत; मात्र प्रत्यक्षात ही संख्या ५२ लाख इतकीच आहे. त्यातूनही यांतील १० टक्के शिक्षक ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असून दरवर्षी ६.५ टक्के शिक्षक निवृत्त होतात किंवा इतर व्यवसाय करू लागतात.


